AQI
TV9 Network
User
Sign In

By signing in or creating an account, you agree with Associated Broadcasting Company's Terms & Conditions and Privacy Policy.

Arjun Tendulkar | बाप बाप असतो! अर्जुन तेंडुलकर याच्या आयपीएल डेब्यूनंतर सचिन तेंडुलकर याचं ते ट्विट व्हायरल

सचिन तेंडुलकर याचा मुलगा अर्जुन तेंडुलकर याने आयपीएलमध्ये मुंबई इंडियन्सकडून 2 वर्षांच्या प्रतिक्षेनंतर अखेर कोलकाता नाईट रायडर्स विरुद्ध पदार्पण केलं. लेक अर्जुनच्या डेब्यूनंतर बाप सचिन तेंडुलकर याने खासं ट्विट केलं आहे.

Arjun Tendulkar |  बाप बाप असतो! अर्जुन तेंडुलकर याच्या आयपीएल डेब्यूनंतर सचिन तेंडुलकर याचं ते ट्विट व्हायरल
| Updated on: Apr 16, 2023 | 11:55 PM
Share

मुंबई | तेंडुलकर कुटुंबियांसाठी आजचा दिवस हा ऐतिहासिक ठरला. क्रिकेटचा देव सचिन तेंडुलकर याचा मुलगा अर्जुन तेंडुलकर याला गेल्या 2 वर्षांच्या प्रतिक्षेनंतर अखेर मुंबई इंडियन्सकडून पदार्पणाची संधी मिळाली. अर्जुनने कोलकाता नाईट रायडर्स विरुद्धच्या सामन्यातून आयपीएल कारकीर्दीची सुरुवात केली. अर्जुनने कोलकाताच्या डावातील पहिली ओव्हरही टाकली. अंजली, सचिन आणि सारा या तिघांनी आपल्या लेकाला-भावाला पहिल्या सामन्यात चिअरअप करण्यासाठी हजेरीही लावली. योगायोग म्हणा किंवा आणखी काही, सचिन ज्या स्टेडियममध्ये क्रिकेटचे असंख्य सामने खेळला, जिथे आपला कारकीर्दीतील 200 वा कसोटी सामना खेळला, वर्ल्ड कप जिंकला त्याच स्टेडियममध्ये अर्जुनने आयपीएल पदार्पण केलं. त्यामुळे अर्जुनचं पदार्पण हे सचिनसाठी एक क्रिकेटर आणि बाप म्हणून कायम लक्षात राहिल. अर्जुनच्या या पदार्पणानंतर सचिनने ट्विट केलं आहे.

अर्जुनने आयपीएल पदार्पण करताच अनोखा विक्रमाची नोंद आपल्या नावावर केली आहे. आयपीएलच्या इतिहासात बाप-बेट्याची जोडी खेळल्याची ही पहिलीच वेळ ठरली आहे. सचिन तेंडुलकर याने याआधी आयपीएलमध्ये मुंबई इंडियन्सचं प्रतिनिधित्व आणि नेतृत्वही केलं आहे. सचिनने एकूण 78 सामन्यांमध्ये मुंबईचं प्रतिनिधित्व केलं आहे. मुंबई इंडियन्सने पहिल्यांदा 2013 मध्ये आयपीएल ट्रॉफी जिंकली होती. या ऐतिहासिक विजयासह सचिनने आयपीएलला रामराम केला होता. त्यानंतर आता तब्बल 10 वर्षांनी अर्जुन क्रिकेटमध्ये परतला आहे.

सचिन तेंडुलकर काय म्हणाला?

सचिन तेंडुलकर याने लेकाच्या पदार्पणानंतर ट्विट करत मनातील भावनांना वाट मोकळी करुन दिली आहे. “अर्जुन, आज तू क्रिकेटपटू म्हणून तुझ्या प्रवासात आणखी एक महत्त्वाचं पाऊल टाकलं आहेस.तुझा वडील या नात्याने, तुमच्यावर प्रेम करणारे आणि खेळाबद्दल उत्कट प्रेम करणारे, मला माहित आहे की तु खेळाला योग्य तो आदर देत राहशील आणि क्रिकेटकडूनही तुला तसाच आदर मिळेल”, अशी आशा सचिनने व्यक्त केली.

“तु इथपर्यंत पोहोचण्यासाठी खूप मेहनत घेतली आहे. मला खात्री आहे की तु अशीच मेहनत करत राहशील. एका सुंदर प्रवासाची ही सुरुवात आहे. ऑल द बेस्ट”, अशा शब्दात सचिनने लेकाला क्रिकेटमधील नव्या प्रवासासाठी शुभेच्छा दिल्या आहेत.

सचिन तेंडुलकर याचं ट्विट

मुंबई इंडियन्स प्लेइंग इलेव्हन | सूर्यकुमार यादव (कॅप्टन), इशान किशन, कॅमरन ग्रीन, टिळक वर्मा, नेहल वढेरा, टिम डेविड, अर्जुन तेंडुलकर ऋतिक शौकीन, पियूष चावला, रिले मेरेडिथ आणि ड्वेन जॉनसन.

कोलकाता नाइट रायडर्स प्लेइंग इलेव्हन | नितीश राणा (कर्णधार), रहमानुल्लाह गुरबाज, नारायण जगदीशन, रिंकू सिंह, आंद्रे रसेल, सुनील नरेन, शार्दुल ठाकूर, उमेश यादव, लॉकी फर्ग्युसन, वरुण चक्रवर्ती आणि सुयश शर्मा.

Follow Us
अमित शाहांना मी फोनवर बोलताना पाहिलंय; दिल्ली लाठीचार्जबाबत...
अमित शाहांना मी फोनवर बोलताना पाहिलंय; दिल्ली लाठीचार्जबाबत राहुल गांधींचा धक्कादायक दावा
व्ही. शांताराम जीवनगौरव पुरस्काराची घोषणा! वाचा विजेत्यांची यादी
व्ही. शांताराम जीवनगौरव पुरस्काराची घोषणा! वाचा विजेत्यांची यादी
नुसती धावपळ... आंदोलक थेट गाड्यांवर चढले अन्... शेतकरी आंदोलनामुळे...
नुसती धावपळ... आंदोलक थेट गाड्यांवर चढले अन्... शेतकरी आंदोलनामुळे भोपाळ शहरात तणाव, नेमकं प्रकरण काय?
तुकाराम मुंढे यांचा मोठा निर्णय! आता विना परवाना शाळांमध्ये...
Tukaram Mundhe | तुकाराम मुंढे यांचा मोठा निर्णय! आता परवाना नसेल तर शाळांमध्ये अन्न पुरवठा करता येणार नाही; 50 मीटर परिसरात...
दिल्ली आंदोलनातील तरुणींवर कंगना रणौत यांची जहरी टीका; गटर जनरेशन...
दिल्ली आंदोलनातील तरुणींवर कंगना रणौत यांची जहरी टीका; गटर जनरेशन म्हणत केलं वादग्रस्त वक्तव्य!
दिलीप वळसे पाटील- शरद पवार भेट, आणखी कोण कोण होतं उपस्थित? Inside...
दिलीप वळसे पाटील- शरद पवार भेट, आणखी कोण कोण होतं उपस्थित? Inside Story समोर
हेच विद्यार्थी सरकार बदलतील; घरी परतताच दीपकेचा मोदी सरकारला थेट इशारा
Abhijeet Dipke | हेच विद्यार्थी सरकार बदलतील; घरी परतताच अभिजीत दीपकेचा मोदी सरकारला थेट इशारा
मोठी बातमी! NDA मध्ये येताच सुप्रिया सुळेंना मिळणार मोठं गिफ्ट?दावा...
मोठी बातमी! NDA मध्ये येताच सुप्रिया सुळेंना मिळणार मोठं गिफ्ट? दिल्लीतील हालचालीमागे... बड्या व्यक्तीच्या दाव्याने खळबळ
तो सुखरूप घरी परतला हे आमच्यासाठी... दीपकेंच्या वडिलांची प्रतिक्रिया
तो सुखरूप घरी परतला हे आमच्यासाठी... अभिजीत दीपकेंच्या वडिलांची प्रतिक्रिया चर्चेत
मोठी बातमी! दिलीप वळसे पाटील शरद पवारांच्या भेटीला, पुण्यात...
मोठी बातमी! दिलीप वळसे पाटील शरद पवारांच्या भेटीला, पुण्यात घडामोडींना वेग