AQI
Sign In

By signing in or creating an account, you agree with Associated Broadcasting Company's Terms & Conditions and Privacy Policy.

CSK vs PBKS Toss : पंजाबने टॉस जिंकला, चेन्नईला 2 झटके

Chennai Super Kings vs Punjab Kings Toss : चेन्नई सुपर किंग्स आणि पंजाब किंग्स हे दोन्ही संघ या हंगामातल पहिल्यांदाच आमनेसामने आहेत. पंजाबने या सामन्यात टॉस जिंकला आहे.

CSK vs PBKS Toss : पंजाबने टॉस जिंकला, चेन्नईला 2 झटके
csk vs pbks toss ipl 2024,Image Credit source: सोशल मीडिया
| Updated on: May 01, 2024 | 7:28 PM
Share

आयपीएलच्या 17 व्या मोसमातील 49 व्या सामन्यात चेन्नई सुपर किंग्स विरुद्ध पंजाब किंग्स आमनेसामने आहेत. ऋतुराज गायकवाड चेन्नईचं तर सॅम करन पंजाब किंग्सचं नेतृत्व करत आहे. या सामन्याचं आयोजन हे चेन्नईतील एम ए चिदंबरम स्टेडियममध्ये करण्यात आलं आहे. या सामन्याला संध्याकाळी 7 वाजून 30 मिनिटांनी सुरुवात होणार आहे. त्याआधी 7 वाजता टॉस झाला. नाणेफेकीचा कौल पंजाबच्या बाजूने लागला. कॅप्टन सॅम करन याने फिल्डिंगचा निर्णय घेत चेन्नईला त्यांच्याच घरात पहिले बॅटिंगसाठी भाग पाडलं आहे. चेन्नईला या सामन्यात 2 झटके लागले आहे. चेन्नईचे 2 मॅचविनर गोलंदाज या सामन्यात खेळणार नाही. त्यामुळे चेन्नई सामन्याआधीच बॅकफुटवर गेली आहे.

मथीशा पथीराणा आणि तुषार देशपांडे आज चेन्नईच्या प्लेईंग ईलेव्हनचा भाग नाहीत. पथीराणा याला साधारण दुखापत आहे. तर तुषार देशपांडेची तब्येक ठीक नसल्याने ते खेळणार नसल्याची माहिती चेन्नईचा कॅप्टन ऋतुराज गायकवाडने टॉस दरम्यान दिली. या दोघांच्या जागी टीममध्ये शार्दूल ठाकुर याचं कमबॅक झालं आहे. तर रिचर्ड ग्लीसन याला पदार्पणाची संधी देण्यात आली आहे. तर पंजाब किंग्सने आपल्या त्याच 11 खेळाडूंवर विश्वास कायम ठेवत प्लेईंग ईलेव्हनमध्ये कोणताही बदल न करण्याचा निर्णय घेतला आहे. पंजाबचा कॅप्टन सॅम करन याने टॉसनंतर प्लेईंग ईलेव्हनमध्ये कोणताही बदल नसल्याचं सांगितलं.

हेड टु हेड रेकॉर्ड्स

चेन्नई सुपर किंग्स विरुद्ध पंजाब किंग्स यांच्यात आयपीएलच्या इतिहासात एकूण 28 सामने खेळवण्यात आले आहेत. चेन्नईने त्यापैकी 15 सामने जिंकले आहेत. तर पंजाबला 13 सामन्यात विजय मिळवण्यात यश आलं आहे. ताज्या आकडेवारीनुसार चेन्नई पॉइंट्स टेबलमध्ये 5 विजयासह चौथ्या स्थानी विराजमान आहे. तर पंजाबने 9 पैकी 3 सामने जिंकले आहेत. पंजाब पॉइंट्स टेबलमध्ये आठव्या स्थानी आहे.

चेन्नई विरुद्ध पंजाब आमनेसामने

चेन्नई सुपर किंग्ज प्लेइंग ईलेव्हन : ऋतुराज गायकवाड (कर्णधार), अजिंक्य रहाणे, डॅरिल मिशेल, मोईन अली, शिवम दुबे, रवींद्र जडेजा, महेंद्रसिंह धोनी (विकेटकीपर), शार्दुल ठाकूर, दीपक चहर, रिचर्ड ग्लीसन आणि मुस्तफिजुर रहमान.

पंजाब किंग्ज प्लेइंग ईलेव्हन : सॅम करन (कॅप्टन), जॉनी बेअरस्टो, रिली रोसो, शशांक सिंग, जितेश शर्मा (विकेटकीपर), आशुतोष शर्मा, हरप्रीत ब्रार, हर्षल पटेल, कगिसो रबाडा, राहुल चहर आणि अर्शदीप सिंग.

शरद पवार जे ठरवतील तेच माझ्यासाठी... सुप्रिया सुळे स्पष्टच म्हणाल्या..
शरद पवार जे ठरवतील तेच माझ्यासाठी... सुप्रिया सुळे स्पष्टच म्हणाल्या...
ठाकरेंच्या नेत्याने भाजपाच्या मुंबई अध्यक्षालाच घेरलं; बाहुली म्हणत...
ठाकरेंच्या नेत्याने भाजपाच्या मुंबई अध्यक्षालाच घेरलं; बाहुली म्हणत....
ठाकरे बंधूंची युती जाहीर...घोषणेनंतर राजकीय वर्तुळात आरोप-प्रत्यारोप
ठाकरे बंधूंची युती जाहीर...घोषणेनंतर राजकीय वर्तुळात आरोप-प्रत्यारोप.
जागावाटपाचा फॉर्म्युला फिक्स! शिंदे-चव्हाणांमध्ये 5 तास खलबतं
जागावाटपाचा फॉर्म्युला फिक्स! शिंदे-चव्हाणांमध्ये 5 तास खलबतं.
काँग्रेसचा सर्वात मोठा निर्णय, महत्त्वाच्या पक्षाशी थेट युतीची घोषणा
काँग्रेसचा सर्वात मोठा निर्णय, महत्त्वाच्या पक्षाशी थेट युतीची घोषणा.
राज ठाकरे अन् उद्धव ठाकरेंच्या युतीची घोषणा अन् मनसेला पहिला धक्का
राज ठाकरे अन् उद्धव ठाकरेंच्या युतीची घोषणा अन् मनसेला पहिला धक्का.
हे बडवे, कारकून कोण? 'लाव रे तो व्हिडीओ' म्हणत शेलारांचा ठाकरेंना सवाल
हे बडवे, कारकून कोण? 'लाव रे तो व्हिडीओ' म्हणत शेलारांचा ठाकरेंना सवाल.
नितेश राणे, प्रवीण दरेकर, प्रसाद लाड यांच्याविरोधात अटक वॉरंट जारी
नितेश राणे, प्रवीण दरेकर, प्रसाद लाड यांच्याविरोधात अटक वॉरंट जारी.
बाप, औकात अन ओम फट स्वाहा, मुंबईतील 'त्या' बॅनरनं राजकीय वर्तुळात खळबळ
बाप, औकात अन ओम फट स्वाहा, मुंबईतील 'त्या' बॅनरनं राजकीय वर्तुळात खळबळ.
ठाकरे बंधूंच्या युतीवर चित्रा वाघ यांची बोचरी टीका, बघा काय केलं ट्विट
ठाकरे बंधूंच्या युतीवर चित्रा वाघ यांची बोचरी टीका, बघा काय केलं ट्विट.