AQI
TV9 Network
User
Sign In

By signing in or creating an account, you agree with Associated Broadcasting Company's Terms & Conditions and Privacy Policy.

IPL 2024, Playoff : प्लेऑफमध्ये आरसीबीचा संघ कसा पोहोचणार? जाणून घ्या उर्वरित सामन्यांचं गणित

आयपीएल स्पर्धेत मुंबई इंडियन्स आणि पंजाब किंग्स हे दोनच संघ अधिकृरित्या स्पर्धेबाहेर पडले आहेत. तर कोलकाता आणि राजस्थानचं स्थान जवळपास पक्कं आहे. या व्यतिरिक्त इतर सहा संघांना प्लेऑफची संधी आहे. सहा पैकी दोन संघ प्लेऑफमध्ये स्थान मिळवू शकतात.

IPL 2024, Playoff : प्लेऑफमध्ये आरसीबीचा संघ कसा पोहोचणार? जाणून घ्या उर्वरित सामन्यांचं गणित
| Updated on: May 11, 2024 | 5:36 PM
Share

आयपीएल 2024 स्पर्धेत प्लेऑफसाठी आता जोरदार रस्सीखेच सुरु झाली आहे. प्लेऑफसाठी तंगड्या एकमेकांमध्ये अडकल्या आहेत असं म्हणालं वावगं ठरणार नाही. सहा संघांना प्लेऑफमध्ये खेळण्याची संधी आहे. पण आता आपण सातव्या क्रमांकावर असलेल्या विराट कोहलीच्या आरसीबीचा विचार करणार आहोत. रॉयल चॅलेंजर्स बंगळुरुने 14 पैकी 12 सामने खेळले आहेत. त्यापैकी 7 सामन्यात पराभव, तर 5 सामन्यात विजय मिळवला आहे. आरसीबीचे 10 गुण असून गुणतालिकेत सातव्या स्थानावर आहे. म्हणजेच प्लेऑफमध्ये संधी मिळवण्यासाठी तीन संघांना मागे टाकावं लागेल. तरच टॉप 4 मध्ये स्थान मिळू शकतं. कोलकाता आणि राजस्थानचं गणित आरसीबीला लागू पडत नाही. तर मुंबई आणि पंजाबचं स्पर्धेतील आव्हान संपुष्टात आलं आहे. त्यामुळे उर्वरित संघांपैकी हैदराबाद, चेन्नई, दिल्ली, लखनौ आणि गुजरात या संघांची कामगिरी महत्त्वाची आहे.

आरसीबीचे पुढचे दोन सामने दिल्ली आणि चेन्नई सुपर किंग्ससोबत आहेत. हे दोन्ही सामने काहीही करून आरसीबीला जिंकायचे आहेत. एका सामन्यात पराभव झाला की आव्हान संपुष्टात येईल. म्हणजेच आरसीबीचे दोन सामने जिंकले की 14 गुण होतील. तर दिल्ली आणि चेन्नईला पराभूत केली त्यांची वाट बिकट होईल.

सनरायझर्स हैदराबाद 14 गुणांसह तिसऱ्या स्थानावर आहे. उर्वरित सामने गुजरात आणि पंजाबशी आहेत. हे दोन्ही सामने गमवल्यास आरसीबीला नेट रनरेटच्या आधारे संधी मिळू शकते. कारण दोघांचे समान 14 गुण होतील. पण एका सामन्यात विजय मिळवला तर प्लेऑफमध्ये स्थान मिळवणारा तिसरा संघ ठरेल. हैदराबादने विजय मिळवलाच तर तो गुजरात विरुद्ध मिळवला तर आरसीबीला सर्वाधिक फायदा होईल.

चेन्नई सुपर किंग्स संघ 12 गुणांसह चौथ्या स्थानी आहे. दोनपैकी एक सामना आरसीबीसोबत आहे. तर दुसरा सामना राजस्थानसोबत आहे. आरसीबीच्या दृष्टीने विचार करायचा तर या दोन्ही सामन्यात चेन्नईने पराभूत होणं फायद्याचं आहे. आरसीबीने पराभूत केलं आणि राजस्थान हरलं तर मात्र गणित नेट रनरेटवर येईल.

दिल्ली कॅपिटल्सचंही चेन्नईसारखंच आहे. एक सामना आरसीबी आणि दुसरा सामना लखनौ सुपर जायंट्ससोबत आहे. आरसीबीच्या दृष्टीने हा दिल्लीला पराभूत केलं पाहीजे. पण दिल्ली आणि लखनौ सामन्यात दोघंही प्लेऑफच्या रेसमध्ये आहे. यात आरसीबीपेक्षा नेट रनरेट कमी असलेला संघ जिंकला तर फायदेशीर ठरेल.

लखनौ सुपर जायंट्सचे पुढील सामने दिल्ली कॅपिटल्स आणि मुंबई इंडियन्ससोबत आहे. वरील गणिताप्रमाणे दिल्ली आणि लखनौपैकी आरसीबीपेक्षा नेट रनरेट कमी असलेला संघ जिंकावा. तर मुंबई इंडियन्सने काहीही करून लखनौला पराभूत करणं गरजेचं आहे.

गुजरात टायटन्सचा पुढील सामना कोलकाता आणि सनरायझर्स हैदारबाद सोबत आहे. हे दोन्ही सामन्यापैकी कोलकात्याने गुजरातला पराभूत करावं. त्यामुळे हा संघ रेसमधून बाहेर पडेल. तर गुजरातने हैदराबादला पराभूत केल्यास आरसीबीला संधी मिळेल.

Follow Us
मुंबई–पुणे एक्सप्रेसवेवर पुन्हा दरड कोसळली; वाहतूक एकाच लेनवर
Breaking! मुंबई–पुणे एक्सप्रेसवेवर पुन्हा दरड कोसळली; वाहतूक एकाच लेनवर, प्रशासन अॅक्शन मोडमध्ये
'दादांच्या आठवणी कुठे नाहीत...' पंढरपूर वारीदरम्यान सुनेत्रा पवारांचं
Sunetra Pawar | 'दादांच्या आठवणी कुठे नाहीत...' पंढरपूर वारीदरम्यान सुनेत्रा पवारांचं भावनिक विधान
कल्याण-डोंबिवलीत पुन्हा पावसाचा कहर! मुसळधार सरींनी नागरिकांची धावपळ
Heavy Rain | कल्याण-डोंबिवलीत पुन्हा पावसाचा कहर! अचानक मुसळधार सरींनी नागरिकांची धावपळ
जयंत पाटील–विनोद तावडे भेटीमुळे महाराष्ट्राच्या राजकारणात मोठी खळबळ
NDAमध्ये शरद पवारांची एन्ट्री? जयंत पाटील–विनोद तावडे भेटीमुळे महाराष्ट्राच्या राजकारणात मोठी खळबळ
इतका भयंकर वेग की मोठमोठे कंटेनर फरफटले गेले, दोघांचा मृत्यू अन्...
इतका भयंकर वेग की मोठमोठे कंटेनर फरफटले गेले, दोघांचा मृत्यू अन्... भुस्खलनाचा थरारक व्हिडीओ समोर
मृत्यूवर हसलो नाही! अमित साटम यांचा सभागृहात मोठा खुलासा; म्हणाले...
Amit Satam | मृत्यूवर हसलो नाही! अमित साटम यांचा सभागृहात मोठा खुलासा; म्हणाले...
देवस्थानाच्या पाहणीला गेले अन् कार चिखलातच अडकली; गिरीश महाजन यांनाही
देवस्थानाच्या पाहणीला गेले अन् कार चिखलातच अडकली; गिरीश महाजन यांनाही पूरस्थितीचा फटका
खाली धावपट्टी आहे की नाही? हेच समजेना! अखेर वैमानिकाने... अंगावर काटा
Navi Mumbai | खाली धावपट्टी आहे की नाही? हेच समजेना! अखेर वैमानिकाने... अंगावर काटा आणणारा व्हिडीओ
स्थानिकांना दिलासा! वाऱ्यांची दिशा बदलेली अन् मोठं संकट टळलं, आता...
स्थानिकांना दिलासा! वाऱ्यांची दिशा बदलेली अन् मोठं संकट टळलं, आता या शहरावर ओढावलं ढगफुटीचं संकट
संत एकनाथ महाराजांची पालखी पंढरपूरकडे रवाना! 427 वर्षांची परंपरा...
Ashadhi Wari 2026 | संत एकनाथ महाराजांची पालखी पंढरपूरकडे रवाना! 427 वर्षांची परंपरा, विठ्ठल... विठ्ठलच्या गजरात दुमदुमलं पैठण