AQI
Sign In

By signing in or creating an account, you agree with Associated Broadcasting Company's Terms & Conditions and Privacy Policy.

Sunil Narine ची ऐतिहासिक कामगिरी, शतकासह महारेकॉर्डला गवसणी

Sunil Narine Century : सुनील नारायण याने इतिहास रचक महारेकॉर्ड केलाय. सुनीलने राजस्थान विरुद्ध शतक ठोकलं. सुनीलच्या टी 20 कारकीर्दीतील हे पहिलंवहिलं शतक ठरलं.

Sunil Narine ची ऐतिहासिक कामगिरी, शतकासह महारेकॉर्डला गवसणी
कोलकाता नाईट रायडर्सचा सुनील नरेन हा तिसऱ्या स्थानी आहे. नरेनने 6 सामन्यात 20 सिक्ससह एकूण 276 धावा केल्या आहेत.Image Credit source: BCCI/IPL
| Updated on: Apr 16, 2024 | 11:33 PM
Share

कोलकाता नाईट रायडर्सच्या सुनील नारायण याने इडन गार्डनमध्ये राजस्थान रॉयल्स विरुद्ध शतकी खेळी केली. आपल्या फिरकी गोलंदाजीसाठी प्रसिद्ध असलेल्या सुनीलने बॅटिंगने धमाका करत क्रिकेट विश्वाचं लक्ष पुन्हा एकदा वेधून घेतलं. सुनीलच्या टी 20 कारकीर्दीतील हे पहिलंवहिलं शतक ठरलं. तसेच सुनील केकेआरसाठी 49 चेंडूत शतक करणारा दुसरा फलंदाज ठरला. सुनीलआधी केकेआरच्या वेंकटेश अय्यर याने मुंबई इंडियन्स विरुद्ध 2023 साली शतक केलं होतं. सुनीलने 49 बॉलमध्ये 11 फोर आणि 6 सिक्सच्या मदतीने हे शतक पूर्ण केलं. सुनीलने 204.08 च्या स्ट्राईक रेटने शतक झळकावलं. सुनीलने 56 बॉलमध्ये 109 धावांची खेळी केली. सुनीलने या शतकी खेळीसह इतिहास रचला.

आयपीएलच्या इतिहासात पहिल्यांदाच

सुनील नारायण आयपीएलमध्ये या शतकासह आपल्या नावावर कीर्तीमान केला. सुनील आयपीएलमध्ये 1 शतक आणि 100 विकेट्स घेणारा पहिला खेळाडू ठरला. सुनीलच्याआधी अशी कामगिरी कोणत्याच खेळाडूला जमली नाही. तसेच सुनील शतक आणि हॅटट्रिक घेणारा तिसरा खेळाडू ठरलाय. सुनीलआधी आयपीएलमध्ये शतक ठोकण्याची आणि हॅटट्रिक घेण्याची किमया ही फक्त रोहित शर्मा आणि शेन वॉटसन या दोघांनीच केली आहे.

केकेआरसाठी शतक ठोकणारे फलंदाज

दरम्यान सुनील केकेआरसाठी आयपीएलमध्ये शतक करणारा तिसरा फलंदाज ठरला आहे. सुनीलआधी वेंकटेश अय्यर आणि ब्रँडन मॅक्युलम या दोघांनी शतकी खेळी केली होती. ब्रँडन मॅक्युलम याने आयपीएलच्या पहिल्या पर्वातील सलामीच्या सामन्यात शतक केलं होतं. त्यानंतर तब्बल 15 वर्षांनी 16 व्या हंगामात वेंकटेश अय्यरने केकेआरसाठी शतक ठोकलं. त्यानंतर आता सुनीलने ही कामगिरी केली आहे.

कोलकाता नाईट रायडर्स प्लेइंग ईलेव्हन : श्रेयस अय्यर (कॅप्टन), फिलिप सॉल्ट (विकेटकीपर), सुनील नारायण, आंग्रिश रघुवंशी, व्यंकटेश अय्यर, रिंकू सिंग, आंद्रे रसेल, रमणदीप सिंग, मिचेल स्टार्क, वरुण चक्रवर्ती आणि हर्षित राणा.

राजस्थान रॉयल्स प्लेइंग ईलेव्हन : संजू सॅमसन (कॅप्टन आणि विकेटकीपर), यशस्वी जयस्वाल, रियान पराग, ध्रुव जुरेल, शिमरॉन हेटमायर, रोवमन पॉवेल, रविचंद्रन अश्विन, ट्रेंट बोल्ट, आवेश खान, कुलदीप सेन आणि युझवेंद्र चहल.

Follow Us
गॅस तुटवडा नियंत्रणासाठी सरकारची नवीन नियमावली; कोणाला मिळणार....
गॅस तुटवडा नियंत्रणासाठी सरकारची नवीन नियमावली; कोणाला मिळणार.....
बदलापुरातील हॉटेल्समध्ये चुलीवर अन्न बनवण्याची वेळ
बदलापुरातील हॉटेल्समध्ये चुलीवर अन्न बनवण्याची वेळ.
संजय राऊतांचा मोदी सरकारवर घणाघाती हल्ला; केली खोचक टीका
संजय राऊतांचा मोदी सरकारवर घणाघाती हल्ला; केली खोचक टीका.
सिलेंडर टंचाईवर संजय राऊतांचा सरकारवर घणाघाती हल्ला
सिलेंडर टंचाईवर संजय राऊतांचा सरकारवर घणाघाती हल्ला.
बदलापूर स्त्री बीज प्रकरण संदर्भात रुपाली चाकणकरांनी दिली मोठी माहिती
बदलापूर स्त्री बीज प्रकरण संदर्भात रुपाली चाकणकरांनी दिली मोठी माहिती.
गॅस कनेक्शन बंद होण्याची भीती दाखवून 30 लाखांचा गंडा
गॅस कनेक्शन बंद होण्याची भीती दाखवून 30 लाखांचा गंडा.
गॅस सिलेंडरसाठी मुंबईकर रांगेत; कांदिवलीत बंदोबस्तात सिलेंडरचे वाटप
गॅस सिलेंडरसाठी मुंबईकर रांगेत; कांदिवलीत बंदोबस्तात सिलेंडरचे वाटप.
सिलेंडर तुटवड्यावरून सत्ताधारी-विरोधक आमने-सामने
सिलेंडर तुटवड्यावरून सत्ताधारी-विरोधक आमने-सामने.
युद्धाचा मोठा फटका गॅस सिलेंडरसाठी नागरिकांची गर्दी विविध शहरांमध्ये..
युद्धाचा मोठा फटका गॅस सिलेंडरसाठी नागरिकांची गर्दी विविध शहरांमध्ये...
मुख्यमंत्र्यांच्या अध्यक्षतेखाली सिंहस्थ कुंभमेळा समितीची बैठक
मुख्यमंत्र्यांच्या अध्यक्षतेखाली सिंहस्थ कुंभमेळा समितीची बैठक.