AQI
TV9 Network
User
Sign In

By signing in or creating an account, you agree with Associated Broadcasting Company's Terms & Conditions and Privacy Policy.

IPL 2024 LSG vs DC Live Streaming : दिल्लीसमोर लखनऊचं आव्हान, कोण जिंकणार?

Lucknow Super Giants vs Delhi Capitals Live Streaming : दिल्ली कॅपिट्ल्ससमोर तगड्या लखनऊ सुपर जायंट्सचं आव्हान असणार आहे. दिल्लीसाठी प्लेऑफच्या हिशोबाने आता प्रत्येक सामना महत्त्वाचा असा आहे.

IPL 2024 LSG vs DC Live Streaming : दिल्लीसमोर लखनऊचं आव्हान, कोण जिंकणार?
Sanjay patil
Sanjay patil | Updated on: Apr 11, 2024 | 3:20 PM
Share

आयपीएल्या 17 व्या हंगामातील 26 व्या सामन्यात लखनऊ सुपर जायंट्स विरुद्ध दिल्ली कॅपिट्ल्स आमनेसामने असणार आहेत. ऋषभ पंत दिल्ली कॅपिट्ल्सचं नेतृत्व करणार आहे. तर केएल राहुल हा लखनऊ सुपर जायंट्सचं कर्णधारपद असणार आहे. लखनऊचा हा पाचवा आणि दिल्लीचा सहावा सामना असणार आहे. दिल्लीच्या तुलनेत लखनऊची आतापर्यंत सरस कामगिरी राहिली आहे. लखनऊने आतापर्यंत खेळलेल्या 4 पैकी 3 सामन्यात विजय मिळवला आहे. लखनऊ 6 गुणांसह तिसऱ्या स्थानी आहे. तर दिल्लीला 5 पैकी फक्त 1 सामनाच जिंकता आलाय. त्यामुळे दिल्ली 2 गुणांसह दहाव्या क्रमांकावर आहे. त्यामुळे दिल्लीवर विजयी ट्रॅकवर परतण्यासह लखनऊला लगाम लावण्याचं आव्हान असणार आहे.

लखनऊ सुपर जायंट्स विरुद्ध दिल्ली कॅपिट्ल्स सामना केव्हा?

लखनऊ विरुद्ध दिल्ली यांच्यातील सामना 12 एप्रिल रोजी होणार आहे.

लखनऊ विरुद्ध दिल्ली सामना कुठे?

लखनऊ विरुद्ध दिल्ली यांच्यातील सामना हा भारतरत्न अटलबिहारी वाजपेयी एकाना क्रिकेट स्टेडियम, लखनऊ येथे करण्यात आलं आहे.

लखनऊ विरुद्ध दिल्ली सामन्याला किती वाजता सुरुवात होणार?

लखनऊ विरुद्ध दिल्ली सामन्याला संध्याकाळी 7 वाजून 30 मिनिटांनी सुरुवात होईल. तर 7 वाजता टॉस होईल.

लखनऊ विरुद्ध दिल्ली सामना टीव्ही आणि मोबाईलवर कुठे पाहता येईल?

लखनऊ विरुद्ध दिल्ली सामना टीव्हीवर स्टार स्पोर्ट्स नेटवर्कवरील चॅनेल्सवर पाहता येईल. तर जिओ सिनेमा एपवर सामना फुकटात पाहता येईल.

लखनऊ सुपर जायंट्स टीम : केएल राहुल (कर्णधार), क्विंटन डी कॉक, युधवीर सिंग चरक, यश ठाकुर, मयंक यादव, मणिमारन सिद्धार्थ, शिवम मावी, रवी बिश्नोई, नवीन-उल-हक, शमर जोसेफ, डेव्हिड विली, मार्कस स्टॉइनिस, कृणाल पंड्या, काइल मेयर्स, प्रेराक मंकड, अर्शीन कुलकर्णी, दीपक होउ, कृष्णा हो गौथम, ॲश्टन टर्नर, निकोलस पूरन, देवदत्त पडिक्कल, आयुष बडोनी, अमित मिश्रा, अर्शद खान आणि मोहसीन खान.

दिल्ली कॅपिट्ल्स टीम : ऋषभ पंत (कॅप्टन), डेव्हिड वॉर्नर, अभिषेक पोरेल, रिकी भुई, यश धुल, शाई होप, पृथ्वी शॉ, ट्रिस्टन स्टब्स, कुमार कुशाग्रा, स्वस्तिक चिकारा, इशांत शर्मा, झ्ये रिचर्डसन, रसिक दार सलाम, विकी ओस्तवाल, एनरिक नॉर्टजे, मुकेश कुमार, कुलदीप यादव, प्रवीण यादव. दुबे, खलील अहमद, सुमित कुमार, अक्षर पटेल, मिचेल मार्श, ललित यादव आणि जेक फ्रेझर-मॅकगर्क.

Follow Us
ते सर्व आरोपी अजूनही... संजय राऊतांचं पोलिस अधिकाऱ्यांसमोर मोठं विधान
Sanjay Raut At Thane : ते आरोपी अजूनही... संजय राऊतांचं पोलिस अधिकाऱ्यांसमोर मोठं विधान
तर काय करणार? प्रदीप पूर्णेकर प्रकरणी संजय राऊतांचा आक्रमक पवित्रा...
तर काय करणार? प्रदीप पूर्णेकर प्रकरणी संजय राऊतांचा आक्रमक पवित्रा; कापूरबावडी पोलीस ठाण्यात नेमकं काय घडतंय?
MPSC च्या विद्यार्थ्यांसाठी सर्वात मोठी बातमी!CM फडणवीसांच्या बैठकीत..
MPSC च्या विद्यार्थ्यांसाठी सर्वात मोठी बातमी! CM फडणवीसांच्या बैठकीतील ‘हे’ 5 महत्त्वाचे निर्णय
सचिन वाझेचा तुरुंगात मुक्काम वाढला; नेमकं कारण काय?
Sachin Waze | सचिन वाझेचा तुरुंगात मुक्काम वाढला; नेमकं कारण काय?
गडचिरोलीतील लेकाची गगनभरारी! थेट 'लंडन स्कूल ऑफ इकॉनॉमिक्स'मध्ये निवड
गडचिरोलीतील लेकाची गगनभरारी! थेट 'लंडन स्कूल ऑफ इकॉनॉमिक्स'मध्ये निवड
धक्कादायक! विमानात वैमानिकांचा वाद, थेट हल्ला नंतर विमान क्रॅश...
धक्कादायक! विमानात वैमानिकांचा वाद, थेट हल्ला नंतर विमान क्रॅश करण्याचा प्रयत्न: पुढे जे घडलं ते...
भोंदू अशोक खरातला मोठा झटका! गंभीर फसवणूक प्रकरणात कोर्टाचे महत्त्वाचे
भोंदू अशोक खरातला मोठा झटका! गंभीर फसवणूक प्रकरणात कोर्टाचे महत्त्वाचे निर्देश काय?
मातोश्री'वर राजकीय हालचालींना वेग! आधी विभागप्रमुखायंची बैठक नंतर...
मातोश्री बंगल्यावर राजकीय हालचालींना वेग! आधी विभागप्रमुखायंची बैठक नंतर राऊत आणि नार्वेकर... नेमकं काय घडतंय?
सुप्रीम कोर्टाच्या कार्यपद्धतीवर इंडिया आघाडी नाराज; थेट दिला इशारा...
सुप्रीम कोर्टाच्या कार्यपद्धतीवर इंडिया आघाडी नाराज; थेट दिला इशारा आता...
ठाण्यात प्रदीप पुर्णेकर प्रकरणी कुटुंबीयांचा पोलीस ठाण्यासमोर ठिय्या,
ठाण्यात प्रदीप पुर्णेकर प्रकरणी कुटुंबीयांचा पोलीस ठाण्यासमोर ठिय्या, जोपर्यंत...