AQI
TV9 Network
User
Sign In

By signing in or creating an account, you agree with Associated Broadcasting Company's Terms & Conditions and Privacy Policy.

IPL 2024 MI vs CSK Live Streaming : वानखेडेत मुंबई विरुद्ध चेन्नई महामुकाबला, रोहित-धोनी आमनेसामने

Mumbai Indians vs Chennai Super Kings Live Streaming : आयपीएलच्या इतिहासातील 2 यशस्वी संघ आमनेसामने भिडणार आहेत. मुंबई विरुद्ध चेन्नई या संघांपैकी कोण जिंकणार सामना?

IPL 2024 MI vs CSK Live Streaming : वानखेडेत मुंबई विरुद्ध चेन्नई महामुकाबला, रोहित-धोनी आमनेसामने
MI VS CSK Dhoni and Rohit,Image Credit source: BCCI/IPL
Sanjay patil
Sanjay patil | Updated on: Apr 14, 2024 | 3:36 PM
Share

आयपीएलच्या 17 व्या मोसमात 14 एप्रिल रोजी क्रिकेट चाहत्यांना डबल धमाका पाहायला मिळणार आहे. रविवारी डबल हेडरचं आयोजन करण्यात आलं आहे. पहिल्या सामन्यात कोलकाता विरुद्ध लखनऊ आमनेसामने आहेत. तर दुसरा सामना हा महामुकाबला आहे. दुसऱ्या सामन्यात मुंबई इंडियन्स विरुद्ध चेन्नई सुपर किंग्स आमनेसामने असणार आहेत. ऋतुराज गायकवाड चेन्नई सुपर किंग्सचं नेतृत्व करणार आहे. तर हार्दिक पंड्या पलटणचं कर्णधारपद सांभाळणार आहे. या सामन्यात क्रिकेट चाहत्यांच लक्ष हे दोन्ही संघाचे माजी कर्णधार महेंद्रसिंह धोनी आणि रोहित शर्मा या दोघांच्या कामगिरीकडे असणार आहे. या सामन्याबाबत जाणून घेऊयात.

मुंबई विरुद्ध चेन्नई सामना केव्हा?

मुंबई विरुद्ध चेन्नई सामना आज 14 एप्रिल रोजी खेळवण्यात येणार आहे.

मुंबई विरुद्ध चेन्नई सामना कुठे?

मुंबई विरुद्ध चेन्नई यांच्यातील सामना हा ऐतिहासिक वानखेडे स्टेडियममध्ये होणार आहे.

मुंबई विरुद्ध चेन्नई सामना किती वाजता सुरु होणार?

मुंबई विरुद्ध चेन्नई सामन्याला संध्याकाळी 7 वाजून 30 मिनिटांनी सुरुवात होईल. तर 7 वाजता टॉस होईल.

मुंबई विरुद्ध चेन्नई सामना टीव्हीवर कुठे पाहता येणार?

मुंबई विरुद्ध चेन्नई सामना टीव्हीवर स्टार स्पोर्ट्स नेटवर्कच्या चॅनेल्सवर पाहता येईल.

मुंबई विरुद्ध चेन्नई सामना मोबाईलवर फुकटात कुठे पाहता येणार?

मुंबई विरुद्ध चेन्नई सामना मोबाईलवर फुकटात जिओ सिनेमा एपवर पाहता येईल.

मुंबई इंडियन्स टीम : हार्दिक पंड्या (कॅप्टन), रोहित शर्मा, टीम डेव्हिड, इशान किशन, विष्णू विनोद, नेहल वढेरा, सूर्यकुमार यादव, देवाल्ड ब्रेविस, पियुष चावला, श्रेयस गोपाल, अंशुल कंबोज, मोहम्मद नबी, शम्स मुलानी, रोमॅरियो शेफर्ड, तिलक वर्मा, जसप्रीत बुमराह, जेराल्ड कोएत्झी, कुमार कार्तिकेय, आकाश मधवाल, अर्जुन तेंडुलकर, नुवान तुषारा, नमन धीर, शिवालिक शर्मा, ल्यूक वुड आणि क्वेना माफाका.

चेन्नई सुपर किंग्स टीम : ऋतुराज गायकवाड (कर्णधार), महेंद्रसिंह धोनी, अरावेली अवनीश, डेव्हॉन कॉनव्हे, अजिंक्य रहाणे, शेख रशीद, मोईन अली, शिवम दुबे, आरएस हंगरगेकर, रवींद्र जडेजा, अजय जादव मंडल, डॅरिल मिशेल, रचिन रवींद्र, मिचेल सँटनर, दीपकुमार सिंधू, निशांत सिंधू, दीपक चहर, तुषार देशपांडे, मुकेश चौधरी, मुस्तफिजुर रहमान, मथीशा पाथीराना, सिमरजीत सिंग, प्रशांत सोलंकी, शार्दुल ठाकूर, महेश तीक्षना आणि समीर रिझवी.

Follow Us
मराठवाड्याला दुष्काळमुक्त करण्यासाठी मोठी घोषणा!
Devendra Fadnavis | मराठवाड्याला दुष्काळमुक्त करण्यासाठी मोठी घोषणा! मुख्यमंत्री फडणवीसांनी सांगितला मोठा प्लॅन, Video बघाच
58 लाख कुणबी नोंदींपैकी फक्त... तायवाडेंचा मोठा दावा
Babanrao Taywade | 58 लाख कुणबी नोंदींपैकी फक्त... बबनराव तायवाडेंचा मोठा दावा, नेमकं काय म्हणाले?
मला कोंडून ठेवलं, दारू पाजली अन्... भाजपचे माजी आमदारांवर तरुणीने...
मला कोंडून ठेवलं, दारू पाजली अन्... भाजपचे माजी आमदार नरेंद्र पवारांवर तरुणीने केले गंभीर आरोप
दादांच्या NCP नं भाजपची साथ सोडल्यास...; रोहित पवारांचं मोठं वक्तव्य
Rohit Pawar | दादांच्या NCP नं भाजपची साथ सोडल्यास...; रोहित पवारांचं मोठं वक्तव्य
छत्रपती संभाजीनगरात फडणवीस-उद्धव ठाकरे एकाचवेळी!
Chhatrapati Sambhajinagar | छत्रपती संभाजीनगरात फडणवीस-उद्धव ठाकरे एकाचवेळी! मराठवाडा मुक्तीसंग्राम दिनाच्या पार्श्वभूमीवर राजकीय चर्चांना उधाण
मराठवाडा मुक्तीसंग्राम दिनी फडणवीसांकडून हुतात्म्यांना अभिवादन!
Devendra Fadnavis | मराठवाडा मुक्तीसंग्राम दिनी मुख्यमंत्री फडणवीसांकडून हुतात्म्यांना अभिवादन!
मुख्यमंत्री फडणवीसांच्या सहीची लेखी हमी द्या! उपोषण सोडल्यानंतर...
Manoj Jarange | मुख्यमंत्री फडणवीसांच्या सहीची लेखी हमी द्या! उपोषण सोडल्यानंतर जरांगे पाटलांची मोठी मागणी
20 दिवसांचं उपोषण सोडलं, पण प्रकृती खालावली! जरांगे पाटील उपचारासाठी..
Manoj Jarange Patil |  20 दिवसांचं उपोषण सोडलं, पण प्रकृती खालावली! जरांगे पाटील उपचारासाठी गॅलेक्सी रुग्णालयात दाखल होणार
90 दिवसांचा अल्टिमेटम देत जरांगे पाटलांनी उपोषण सोडलं!
Maratha Reservation | 90 दिवसांचा अल्टिमेटम देत जरांगे पाटलांनी उपोषण सोडलं! 58 लाख नोंदी अन् हैदराबाद गॅझेटवरही मोठी अपडेट
संतोष पंडित यांना अखेर जामीन मंजूर, चंद्रकांत पाटील व्हिडिओ प्रकरणात..
संतोष पंडित यांना अखेर जामीन मंजूर, चंद्रकांत पाटील व्हिडिओ प्रकरणात दिलासा