AQI
Sign In

By signing in or creating an account, you agree with Associated Broadcasting Company's Terms & Conditions and Privacy Policy.

IPL 2024, MI vs PBKS : मुंबई इंडियन्स पंजाब किंग्सच्या या खेळाडूंवर असेल सामन्याची मदार, जाणून घ्या

आयपीएल 2024 स्पर्धेत आता करो या मरोची स्थिती निर्माण झाली आहे. अनेक संघांचं गणित हे एक दोन पराभवावर अवलंबून आहे. त्यामुळे प्रत्येक सामना जिंकणं आता महत्त्वाचं झालं आहे. मुंबई इंडियन्स आणि पंजाब किंग्सचंही तसंच काहीसं झालं आहे.

IPL 2024, MI vs PBKS : मुंबई इंडियन्स पंजाब किंग्सच्या या खेळाडूंवर असेल सामन्याची मदार, जाणून घ्या
| Updated on: Apr 17, 2024 | 3:32 PM
Share

आयपीएल 2024 स्पर्धा दिवसागणिक चुरशीची होत चालली आहे. प्रत्येक सामन्यानंतर गुणतालिकेत उलथापालथ होतान दिसत आहे. आता उर्वरित सामन्यांमध्ये प्लेऑफसाठी जोरदार चुरस असणार आहे. टॉप चारमध्ये कोण एन्ट्री मारणार याची उत्सुकता लागून आहे. आयपीएलमधील 33वा सामना पंजाब किंग्स आणि मुंबई इंडियन्स यांच्यात होत आहे. दोन्ही संघांना प्लेऑफमध्ये स्थान मिळवण्यासाठी या सामन्यातील विजय महत्त्वाचा आहे. गुणतालिकेत 4 गुण आणि -0.218 नेट रनरेटसह पंजाबचा संघ सातव्या, तर 4 आणि -0.234 नेट रनरेटसह मुंबईचा संघ आठव्या स्थानी आहे. दोन्ही संघांना प्लेऑफमध्ये स्थान मिळवण्यासाठी 8 पैकी 6 सामने जिंकायचे आहेत. त्यामुळे हा सामनाही महत्त्वाचा ठरणार आहे. मुंबई इंडियन्स आणि पंजाब किंग्स 31 वेळा आमनेसामने आले आहेत. यात 15 वेळा पंजाब किंग्सने, तर 16 वेळा मुंबई इंडियन्सने बाजी मारली आहे.

मुंबई इंडियन्सच्या पाच, पंजाब किंग्सच्या सहा खेळाडूंच्या हाती सामन्याची सूत्र असणार आहे. कोणत्याही क्षणी सामना फिरवण्याची ताकद या खेळाडूंमध्ये आहेत. मुंबई इंडियन्सकडून इशान किशन, रोहित शर्मा, सूर्यकुमार यादव, मोहम्मद नबी, हार्दिक पांड्या आणि जसप्रीत बुमराह हे खेळाडू टॉपला असतील. तर पंजाब किंग्सकडून शशांक सिंग, लियाम लिविंगस्टोन, सॅम करन, अर्शदीप सिंग आणि कगिसो रबाडा हे खेळाडू बाजी फिरवण्याची ताकद ठेवतात.

मुंबई इंडियन्स आणि पंजाब किंग्स यांच्यात मोहालीच्या महाराजा यादवेंद्र सिंग क्रिके स्टेडियममध्ये सामना होणार आहे. ही सर्वात वेगवान खेळपट्टी आहे.यात चेंडूला बऱ्यापैकी उसळी मिळते. त्यामुळे वेगवान गोलंदाजांचा बोलबाला असेल. या खेळपट्टी तग धरणं फलंदाजांना काही अंशी कठीण जातं. खासकरून नवीन चेंडूचा सामना करताना. तसेच दव फॅक्टरही महत्त्वाचा ठरतो. त्यामुळे नाणेफेकीचा कौल जिंकला की प्रथम गोलंदाजीला प्राधान्य दिलं जाईल.

दोन्ही संघांची संभाव्य प्लेइंग 11

पंजाब किंग्स : जॉनी बेअरस्टो, शिखर धवन/अथर्व तायडे, प्रभसिमरन सिंग, सॅम कुरान (कर्णधार), लियाम लिव्हिंगस्टोन, जितेश शर्मा (विकेटकीपर), शशांक सिंग, हरप्रीत ब्रार, हर्षल पटेल, अर्शदीप सिंग, कागिसो रबाडा.

मुंबई इंडियन्स : इशान किशन (विकेटकीपर), रोहित शर्मा, सूर्यकुमार यादव, तिलक वर्मा, हार्दिक पंड्या, मोहम्मद नबी, टीम डेव्हिड, रोमॅरियो शेफर्ड, जेराल्ड कोएत्झी, श्रेयस गोपाल, जसप्रीत बुमराह.

Follow Us
बदलापूर स्त्री बीज प्रकरण संदर्भात रुपाली चाकणकरांनी दिली मोठी माहिती
बदलापूर स्त्री बीज प्रकरण संदर्भात रुपाली चाकणकरांनी दिली मोठी माहिती.
गॅस कनेक्शन बंद होण्याची भीती दाखवून 30 लाखांचा गंडा
गॅस कनेक्शन बंद होण्याची भीती दाखवून 30 लाखांचा गंडा.
गॅस सिलेंडरसाठी मुंबईकर रांगेत; कांदिवलीत बंदोबस्तात सिलेंडरचे वाटप
गॅस सिलेंडरसाठी मुंबईकर रांगेत; कांदिवलीत बंदोबस्तात सिलेंडरचे वाटप.
सिलेंडर तुटवड्यावरून सत्ताधारी-विरोधक आमने-सामने
सिलेंडर तुटवड्यावरून सत्ताधारी-विरोधक आमने-सामने.
युद्धाचा मोठा फटका गॅस सिलेंडरसाठी नागरिकांची गर्दी विविध शहरांमध्ये..
युद्धाचा मोठा फटका गॅस सिलेंडरसाठी नागरिकांची गर्दी विविध शहरांमध्ये...
मुख्यमंत्र्यांच्या अध्यक्षतेखाली सिंहस्थ कुंभमेळा समितीची बैठक
मुख्यमंत्र्यांच्या अध्यक्षतेखाली सिंहस्थ कुंभमेळा समितीची बैठक.
पिंपरी-चिंचवडमध्ये गॅस टंचाईचा फटका; केटरिंग व्यवसाय अडचणीत
पिंपरी-चिंचवडमध्ये गॅस टंचाईचा फटका; केटरिंग व्यवसाय अडचणीत.
गॅस तुटवड्यावर पेट्रोलियम मंत्रालयाची पत्रकार परिषद
गॅस तुटवड्यावर पेट्रोलियम मंत्रालयाची पत्रकार परिषद.
नागपुरात गॅस सिलेंडरसाठी नागरिकांच्या लांबच लांब रांगा
नागपुरात गॅस सिलेंडरसाठी नागरिकांच्या लांबच लांब रांगा.
बीडमध्ये घरगुती गॅस वापरणाऱ्या हॉटेल्सवर छापेमारी; 28 सिलेंडर जप्त
बीडमध्ये घरगुती गॅस वापरणाऱ्या हॉटेल्सवर छापेमारी; 28 सिलेंडर जप्त.