AQI
Sign In

By signing in or creating an account, you agree with Associated Broadcasting Company's Terms & Conditions and Privacy Policy.

IPL 2024 | ‘जय शाह खेळत नसले तरी ‘गेम’ चांगला करू शकतात’, IPL च्या वेळापत्रकामध्ये ‘तो’ सामना ठरवून???

IPL 2024 UPDATE : आयपीएलचं बिगुल वाजलं खरं आणि वेळापत्रकही समोर आलं आहे. या वेळापत्रकामध्ये एक सामना असा आहे ज्याची तुफान चर्चा होताना दिसत आहे. हा सामना ठरवून आयोजित केल्याचं बोललं जात आहे. त्यासोबतच जय शहा यांचं नाव का जोडलं जात आहे जाणून घ्या.

IPL 2024 | 'जय शाह खेळत नसले तरी 'गेम' चांगला करू शकतात', IPL च्या वेळापत्रकामध्ये 'तो' सामना ठरवून???
| Updated on: Feb 23, 2024 | 9:14 PM
Share

मुंबई : गेल्या अनेक दिवासांपासून क्रीडा प्रेक्षकांना आयपीएलच्या तारखा जाहीर होतात याची आस लागली होती. अखेर आज आयपीएलच्या तारखा जाहीर झाल्या आहेत. आयपीएल पुढील महिन्यातील 22 मार्चपासून सुरू होत आहे. यंदाच्या मोसमातील पहिला सामना सीएके आणी आरसीबी या दोन संघांमध्ये सामना होणार आहे. यंदाची आयपीएल सुरू होण्याआधी मोठा उलटफेर पाहायला मिळाला होता. मुंबई इंडियन्सच्या कर्णधारपदाची हार्दिक पंड्या याच्याकडे धुरा सोपवण्यात आली आहे. गुजरात संघाचं कर्णधारपद असतानाही पंड्याने गुजरात संघाची साथ सोडली होती. आज वेळापत्रकामध्ये एक सामन्याने सर्वांच्या नजरा खेचल्या आहेत. सोशल मीडियावरही या सामन्यावरून अनेक तर्क वितर्क लावले जात आहेत.

यंदाच्या आयपीएलमध्ये वेळापत्रक तुम्ही नीट आणि बारकाईने पाहिलं असेल त्यामध्ये तुम्ही तर  24 मार्चला पाहा कोणत्या संघांमध्ये सामना होणार आहे. जर नीट नसेल पाहिलं तर बघा, 24 मार्चला मुंबई इंडियन्स आणि  गुजरात टायटन्स यांच्यात सामना होणार आहे. हा सामना ठरवून लावल्याचं नेटकऱ्यांचं म्हणणं आहे.  याचं  वेगळं कारण काही सांगायल नको.

काय असावं कारण?

हार्दिक पंड्या याने मुंबई सोडल्यावर तो गुजरात टायटन्स संघाचा कॅप्टन झाला होता. पहिल्याच मोसमात आपल्या संघाला त्याने विजेतेपद जिंकवून दिलं होतं. तर दुसऱ्या वर्षी फायनलमध्ये पराभव झाला होता. त्यानंतर यंदाच्या आयपीएलआधी पंड्याला मुंबईने आपल्याडकडे घेतलं. बरं फक्त घेतलंच नाहीतर थेट कॅप्टनसीचं ऑफरलेटरही दिलं.  मुंबईच्या टीम मॅनेजमेंटने रोहित शर्मा याला बाजूला करत हार्दिकला कॅप्टन केलं. मुंबईच्या चाहत्यांचा रोषाला सामोर जावं लागलं होतं. तरीही मुंबईने आपला निर्णय काही बदलला नाही.

आता आयपीएल सुरू होण्याआधी गुजरात संघाचा पहिला सामना मुंबईसोबत होणार आहे. या सामन्यामध्ये गुजरात संघाचा माजी कॅप्टन असलेला पंड्या मुंबईच्याबाजूने खेळणार आहे. नेटकऱ्यांनी याचाच धाग पकडत मीम्स व्हायरल केले आहेत. काहींनी तर बीसीसीआयचे सचिव जय शहा यांनीच हा सामना ठरवून पहिला ठेवल्याचं म्हटलं आहे.  सोशल मीडियावर पंड्यावर अनेक मीम्स केले जात असून त्याला ट्रोल केलं जात आहे.

दरम्यान, वर्ल्ड कपमध्ये दुखापत झाल्यावर पंड्याने अजुनही मैदानात यायचं काही नाव घेतलं नाही. मात्र बडोद्यामध्ये तो सराव करताना दिसला. देशांतर्गत क्रिकेटमध्येही पंड्या खेळला नसून आता थेट मुंबईकडूनच आयपीएलमध्ये खेळताना दिसणार आहे. याच पार्श्वभूमीवर हा सामना आज नियोजनबद्ध असल्याचं नेटकऱ्यांचं म्हणणं आहे.

शेवटी बाप हा बाप असतो! उदय सामंत यांचं ते विधान चर्चेत
शेवटी बाप हा बाप असतो! उदय सामंत यांचं ते विधान चर्चेत.
सुरेश धसांकडून तीन हल्ले! मेहबूब शेख यांचा गंभीर आरोप
सुरेश धसांकडून तीन हल्ले! मेहबूब शेख यांचा गंभीर आरोप.
इंडिगोला दणका! डीजीसीएची कारणे दाखवा नोटीस
इंडिगोला दणका! डीजीसीएची कारणे दाखवा नोटीस.
तो एक व्हिजन असलेला प्रतिनिधी! शिंदेंकडून लेकाचं कौतुक
तो एक व्हिजन असलेला प्रतिनिधी! शिंदेंकडून लेकाचं कौतुक.
सरकारच्या चहापानावर विरोधकांचा बहिष्कार
सरकारच्या चहापानावर विरोधकांचा बहिष्कार.
रवींद्र चव्हाणांशी चर्चेनंतर शिंदेंची आक्रमक देहबोली!
रवींद्र चव्हाणांशी चर्चेनंतर शिंदेंची आक्रमक देहबोली!.
चुनाभट्टीजवळ आंबेडकर अनुयायी अन् पोलिसांमध्ये वाद, थेट रस्ताच रोखला...
चुनाभट्टीजवळ आंबेडकर अनुयायी अन् पोलिसांमध्ये वाद, थेट रस्ताच रोखला....
इंडिगोची आजही 500 विमानं रद्द, प्रवाशांचा आक्रोश, कुठं काऊंटवर चढलं तर
इंडिगोची आजही 500 विमानं रद्द, प्रवाशांचा आक्रोश, कुठं काऊंटवर चढलं तर.
तपोवनातील प्रस्तावित प्रदर्शन केंद्राच्या निविदा प्रक्रियेला स्थगिती
तपोवनातील प्रस्तावित प्रदर्शन केंद्राच्या निविदा प्रक्रियेला स्थगिती.
शिंदेंमुळे 2022ला भाजप सत्तेत, शिवसेनेच्या मंत्र्याच्या दाव्यानं खळबळ
शिंदेंमुळे 2022ला भाजप सत्तेत, शिवसेनेच्या मंत्र्याच्या दाव्यानं खळबळ.