RCB vs DC : आरसीबी विरुद्ध दिल्ली आमनेसामने, अक्षर पटेलने टॉस जिंकला
Royal Challengers Bengaluru vs Delhi Capitals Toss : दिल्ली कॅपिट्ल्स आणि रॉयल चॅलेंजर्स बंगळुरु दोन्ही संघांसाठी हा सामना करो या मरो असा आहे.

आयपीएलच्या 17 व्या मोसमातील 62 व्या सामन्यात रॉयल चॅलेंजर्स बंगळुरु विरुद्ध दिल्ली कॅपिट्ल्स आमनेसामने आहेत. प्लेऑफमधील आव्हान कायम राखण्यासाठी दोन्ही संघांसाठी हा सामना करो या मरो असा आहे. या सामन्याला संध्याकाळी 7 वाजून 30 मिनिटांनी सुरुवात होणार आहे. त्याआधी 7 वाजता टॉस झाला. दिल्लीच्या बाजूने नाणेफेकीचा कौल लागला. नियमित कर्णधार ऋषभ पंतच्या अनुपस्थितीत अक्षर पटेल याने पहिले फिल्डिंगचा निर्णय घेत आरसीबीला बॅटिंगसाठी भाग पाडलं आहे. त्यामुळे आता ऋषभ पंतच्या गैरहजेरीत आणि अक्षरच्या नेतृत्वात दिल्ली आरसीबीला किती धावांवर रोखण्यात यशस्वी ठरते, याकडे क्रिकेट चाहत्यांचं लक्ष असणार आहे.
आरसीबी आणि दिल्ली दोघांसाठी करो या मरो
आयपीएल प्लेऑफमधील आव्हान कायम राखण्यासाठी दिल्ली आणि आरसीबी दोन्ही संघांसाठी हा सामना करो या मरो असा आहे. पराभूत होणाऱ्या संघाचं आव्हान येथेच संपुष्टात येईल. त्यामुळे दोन्ही संघांकडून या सामन्यात विजयासाठी जोरदार चुरस पाहायला मिळणार आहे. या सामन्यासाठी आरसीबीने प्लेईंग ईलेव्हमध्ये कोणताही बदल केलेला नाही. कॅप्टन फाफ डु प्लेसीसने आपल्या त्याच 11 खेळाडूंवर विश्वास दाखवलेला आहे. याच 11 खेळाडूंसह आरसीबीने गेल्या सलग 4 सामने जिंकले आहेत. त्यामुळे आता आरसीबी विजयी पंच लगावणार का? याकडे आरसीबीची समर्थकांचं लक्ष असणार आहे.
तर दुसऱ्या बाजूला दिल्ली कॅपिट्ल्सने प्लेईंग ईलेव्हनमध्ये 2 बदल केले आहेत. एकूण 3 वेळा स्लो ओव्हर रेटमुळे दिल्लीचा नियमित कर्णधार ऋषभ पंत यावर एका सामन्याची बंदी घालण्यात आलीय. त्यामुळे पंतच्या जागी प्लेईंग ईलेव्हनमध्ये कुमार कुशाग्रा याचा समावेश करण्यात आला आहे. तर गुलाबदीन नाईब याच्या जागी रसिख धार याचा समावेश करण्यात आला आहे.
हेड टु हेड रेकॉर्ड्स
दरम्यान दिल्ली विरुद्ध आरसीबी दोन्ही संघ आयपीएलच्या इतिहासात एकूण 30 वेळा आमनेसामने आले आहेत. यामध्ये आरसीबीचा दबदबा राहिला आहे. आरसीबीने 30 पैकी 18 सामने जिंकले आहेत. तर दिल्लीने 11 वेळा आरसीबीला पराभवाची धुळ चारली आहे. तर एक सामन्याचा निकाल लागला नाही.
दिल्लीने टॉस जिंकला
🚨 Toss Update 🚨@DelhiCapitals win the toss and elect to bowl against @RCBTweets
Follow the Match ▶️ https://t.co/AFDOfgLefa#TATAIPL | #RCBvDC pic.twitter.com/Ljx8CVGrkv
— IndianPremierLeague (@IPL) May 12, 2024
रॉयल चॅलेंजर्स बेंगळुरू प्लेईंग ईलेव्हन : फाफ डू प्लेसिस (कर्णधार), विराट कोहली, विल जॅक्स, रजत पाटीदार, कॅमेरॉन ग्रीन, महिपाल लोमरोर, दिनेश कार्तिक (विकेटकीपर), कर्ण शर्मा, मोहम्मद सिराज, लॉकी फर्ग्युसन आणि यश दयाल.
दिल्ली कॅपिटल्स प्लेइंग ईलेव्हन : अक्षर पटेल (कॅप्टन), जेक फ्रेझर-मॅकगुर्क, अभिषेक पोरेल (विकेटकीपर), शाई होप, कुमार कुशाग्रा, ट्रिस्टन स्टब्स, कुलदीप यादव, रसिक दार सलाम, मुकेश कुमार, इशांत शर्मा आणि खलील अहमद.
