AQI
Sign In

By signing in or creating an account, you agree with Associated Broadcasting Company's Terms & Conditions and Privacy Policy.

Suryakumar Yadav याची अखेर मुंबई इंडियन्समध्ये एन्ट्री, कुणाचा पत्ता कट होणार?

Suryakumar Yadav Mumbai Indians Ipl 2024 : मुंबई इंडियन्सच्या चाहत्यांना मोठा दिलासा मिळाला आहे. अखेर सूर्या भाऊची एन्ट्री झाली आहे.

Suryakumar Yadav याची अखेर मुंबई इंडियन्समध्ये एन्ट्री, कुणाचा पत्ता कट होणार?
| Updated on: Apr 05, 2024 | 6:17 PM
Share

आयपीएलच्या 17 व्या मोसमादरम्यान मुंबई इंडियन्सच्या गोटातून आनंदाची बातमी समोर आली आहे. मुंबईच्या चाहत्यांना गेले अनेक दिवस ज्या क्षणाची प्रतिक्षा होती, तो क्षण अखेर आला आहे. अनेक दिवसांनी अखेर मुंबई इंडियन्समध्ये सूर्यकुमार यादव यााची एन्ट्री झाली आहे. मुंबई इंडियन्सने सोशल मीडियावरुन याबाबतची माहिती दिली आहे. “आपला दादूस आला रे”, अशा कॅप्शनसह मुंबई इंडियन्सने सूर्याचा फोटो पोस्ट केलाय. सूर्या परतल्याने आतातरी मुंबई पहिला विजय मिळणार का? असा प्रश्नही सूर्याच्या कमबॅकमुळे उपस्थित केला जात आहे.

सूर्यकुमार यादव याला दक्षिण आफ्रिकेच्या दौऱ्यावर दुखापत झाली होती. तेव्हापासून सूर्या मैदानापासून दूर होता. सूर्या दुखापतीतून फिट होण्यादरम्यान अग्नीदिव्यातून पार पडला. सूर्यावर दुखापतीनंतर शस्त्रक्रिया पार पडली. त्यानंतर सूर्या एनसीएत पूर्णपणे कमबॅकवर भर देत होता. सूर्या फिटनेस टेस्टमध्ये अपयशी ठरला. मात्र त्यानंतर सूर्याने जोरदार मेहनत घेत फिटनेस टेस्ट पास केली. त्यानंतर अखेर सूर्याने मुंबई इंडियन्समध्ये कमबॅक केलं आहे.

सूर्यामुळे कुणाचा पत्ता कट?

दरम्यान आता सूर्यकुमार यादव याच्या एन्ट्रीमुळे प्लेईंग ईलेव्हनमधून कुणा एकाचा तरी पत्ता कट होणार आहे. सूर्याच्या अनुपस्थितीत पहिल्या 3 सामन्यांमध्ये नमन धीर याला संधी देण्यात आली. नमन धीर याने 3 सामन्यात 50 धावा केल्या.नमनला संधी मिळाली, मात्र त्याला छाप सोडता आली नाही.

आपला दादूस आला रे

टन टन टोल टोल... गुणरत्न सदावर्तेंकडून राज ठाकरेंच्या भाषणाची मिमिक्री
टन टन टोल टोल... गुणरत्न सदावर्तेंकडून राज ठाकरेंच्या भाषणाची मिमिक्री.
खूप गोष्टी बोलू शकत नाही... घोसाळकर भाजपात अन् ठाकरे गटाला मोठा धक्का
खूप गोष्टी बोलू शकत नाही... घोसाळकर भाजपात अन् ठाकरे गटाला मोठा धक्का.
तपोवनवर डॅमेज कंट्रोल? वृक्षबचाव आंदोलनानं नाशिकची बदनामी कशी?
तपोवनवर डॅमेज कंट्रोल? वृक्षबचाव आंदोलनानं नाशिकची बदनामी कशी?.
मुंबईसह 29 शहरांमध्ये पालिकेच्या निवडणुका, कुठं मैत्री अन कुठं कुस्ती?
मुंबईसह 29 शहरांमध्ये पालिकेच्या निवडणुका, कुठं मैत्री अन कुठं कुस्ती?.
मोदी तेरी कब्र खुदेगी घोषणांमुळे संसदेत हंगामा अन् भाजप आक्रमक
मोदी तेरी कब्र खुदेगी घोषणांमुळे संसदेत हंगामा अन् भाजप आक्रमक.
गुंडांनी खाकी वर्दीवर उचलला हात, रोहित पवार चांगलेच भडकले, म्हणाले...
गुंडांनी खाकी वर्दीवर उचलला हात, रोहित पवार चांगलेच भडकले, म्हणाले....
क्लासमध्ये वाद अन विद्यार्थ्याच्या मृत्यू, वडिलांची संतप्त प्रतिक्रिया
क्लासमध्ये वाद अन विद्यार्थ्याच्या मृत्यू, वडिलांची संतप्त प्रतिक्रिया.
मोठी बातमी.. दोन ते तीन दिवसांत ठाकरे बंधू एकत्र? काँग्रेसशिवाय युती..
मोठी बातमी.. दोन ते तीन दिवसांत ठाकरे बंधू एकत्र? काँग्रेसशिवाय युती...
फडणवीसांनी निवडणुकीची घोषणा होताच महायुतीची रणनीती सांगितली; म्हणाले..
फडणवीसांनी निवडणुकीची घोषणा होताच महायुतीची रणनीती सांगितली; म्हणाले...
'धुरंधर'वरून शिंदे-ठाकरेंमध्ये जुंपली, रहमान डकैतवरून तुफान टोलेबाजी
'धुरंधर'वरून शिंदे-ठाकरेंमध्ये जुंपली, रहमान डकैतवरून तुफान टोलेबाजी.