AQI
Sign In

By signing in or creating an account, you agree with Associated Broadcasting Company's Terms & Conditions and Privacy Policy.

DC vs KKR : कुलदीप यादवने पराभवानंतर रिंकूला कानाखाली मारली, सोशल मीडियावर मोठा वाद, पाहा व्हीडिओ

Kuldeep Yadav Slapped Rinku Singh Viral Video : दिल्ली कॅपिट्ल्स विरुद्ध कोलकाता नाईट रायडर्स यांच्यात अरुण जेटली स्टेडियम, नवी दिल्ली येथे सामना खेळवण्यात आला. या सामन्यानंतर कुलदीप यादवने रिंकू सिंहला कानशि‍लात लगावत भर मैदानात अपमानित करण्याचा प्रयत्ना केला. पाहा व्हीडिओ.

DC vs KKR : कुलदीप यादवने पराभवानंतर रिंकूला कानाखाली मारली, सोशल मीडियावर मोठा वाद, पाहा व्हीडिओ
Kuldeep Yadav Slapped Rinku SinghImage Credit source: Screenshot/JioHotstar
| Updated on: Apr 30, 2025 | 3:54 PM
Share

आयपीएलच्या 18 व्या मोसमातील 45 व्या सामन्यात 29 एप्रिलला दिल्ली कॅपिट्ल्स विरुद्ध कोलकाता नाईट रायडर्स आमनेसामने होते. कोलकाताने शेवटच्या चेंडूपर्यंत गेलेल्या सामन्यात दिल्लीवर 14 धावांनी विजय मिळवला. दिल्लीच्या या पराभवानंतर चायनामॅन गोलंदाज कुलदीप यादव आणि कोलकाताचा स्फोटक फलंदाज रिंकु सिंह हे दोघेही एकमेकांसह बोलत होते. कुलदीपने या दरम्यान रिंकूला कानाखाली मारली. कुलदीपने रिंकूला तब्बल 2 वेळा कानाखाली लगावली. कुलदीपच्या या अशा कृतीमुळे रिंकूचा चेहरा पडला. या सर्व प्रकाराचा व्हीडिओ सोशल मीडियावर व्हायरल झाला आहे. तसेच या प्रकारामुळे नेटकऱ्यांना हरभजन सिंह-एस श्रीसंथ या प्रकरणाची आठवण झाली. हरभजन यानेही श्रीसंथला अनेक वर्षांपूर्वी आयपीएल स्पर्धेत कानाखाली मारली होती.

नक्की प्रकरण काय?

आयपीएल स्पर्धेत सामन्यानंतर दोन्ही संघांचे खेळाडू हे परंपरेनुसार एकमेकांसह चर्चा करतात. त्यानुसारच रिंकु आणि कुलदीप हे दोघेही बोलत होते. रिंकू या दरम्यान कोणत्या तरी विषयावरुन जोरजोरात हसू लागला. तेव्हाच कुलदीपने रिंकूला कानशि‍लात लगावली. मात्र कुलदीपने हे सर्व मस्करीत केलं, असं व्हीडिओ पाहून म्हटलं जात आहे. मात्र रिंकूला हे सर्व आवडलं नाही. रिंकूला कुलदीपकडून हे असं अपेक्षित नव्हतं.

सोशल मीडियावर चर्चा

कुलदीपने हा सर्व प्रकार थट्टा मस्करीत केला असला तरी याचे तीव्र पडसाद सोशल मीडियावर उमटले आहेत. किती काही असलं तरी कुलदीपने रिंकू किंवा इतर कुणावरही हात उगारणं बरोबर नाही, असा नेटकऱ्यांचं म्हणणं आहे. एका नेटकऱ्याने तर थेट कुलदीपवर बंदी घालावी, अशी मागणी केली आहे.

दोघेही चांगले मित्र

रिंकू आणि कुलदीप हे दोघेही चांगले मित्र आहेत. दोघेही टीम इंडियासाठी खेळतात. तसेच देशांतर्गत क्रिकेटमध्ये रिंकू आणि कुलदीप उत्तर प्रदेशचं प्रतिनिधित्व करतात. त्यामुळे दोघेही घनिष्ठ मित्र आहे. मैत्रीत हे असं चालतं. मात्र सोशल मीडियावर नेटकऱ्यांनी या प्रकरणाचा बाऊ केलाय, असंही म्हटलं जात आहे.

कुलदीपने मर्यादा ओलांडली!

सामन्याचा धावता आढावा

दरम्यान केकेआरने सांघिक खेळीच्या जोरावर दिल्लीसमोर 205 धावांचं आव्हान ठेवलं होतं. मात्र प्रत्युत्तरात दिल्लीला 20 ओव्हरमध्ये 9 विकेट्स गमावून 190 धावांपर्यंतच मजल मारता आली. कोलकाता नाईट रायडर्स टीमने अशापक्रारे 14 धावांनी विजय मिळवला.

मुंबई अन ठाण्यात कोणचा महापौर? गंभीर आरोप करत मनसे नेत्याचा गंभीर आरोप
मुंबई अन ठाण्यात कोणचा महापौर? गंभीर आरोप करत मनसे नेत्याचा गंभीर आरोप.
फडणवीसांचा पुन्हा झंझावाती सभा, महापालिका जिंकण्यासाठी BJPचा मेगाप्लान
फडणवीसांचा पुन्हा झंझावाती सभा, महापालिका जिंकण्यासाठी BJPचा मेगाप्लान.
मतदानाआधीच विजयाचा गुलाल, भाजपचे 4 उमेदवार थेट नगरसेवक; कुठं चमत्कार?
मतदानाआधीच विजयाचा गुलाल, भाजपचे 4 उमेदवार थेट नगरसेवक; कुठं चमत्कार?.
सुधाकर बडगुजरांची भाजपात खेळी, घरातील तिघांना थेट महानगरपालिकेचं तिकीट
सुधाकर बडगुजरांची भाजपात खेळी, घरातील तिघांना थेट महानगरपालिकेचं तिकीट.
धुळे महानगरपालिका निवडणुकीत भाजपनं उघडलं पहिलं खातं, कोण बिनविरोध?
धुळे महानगरपालिका निवडणुकीत भाजपनं उघडलं पहिलं खातं, कोण बिनविरोध?.
15 मिनिटांमुळे स्वप्न भंगलं! भाजप उमेदवार उशिरा पोहोचला अन् घडलं काय?
15 मिनिटांमुळे स्वप्न भंगलं! भाजप उमेदवार उशिरा पोहोचला अन् घडलं काय?.
भाजप इच्छुक आक्रमक... मंत्र्यांच्या PA अन् नातेवाईकाला उमेदवारी!
भाजप इच्छुक आक्रमक... मंत्र्यांच्या PA अन् नातेवाईकाला उमेदवारी!.
कार्यालय फोडणाऱ्यांना ठाकरे सेनेकडून तिकीट, उदय सामंतांचं मोठं विधान
कार्यालय फोडणाऱ्यांना ठाकरे सेनेकडून तिकीट, उदय सामंतांचं मोठं विधान.
मनसेचा अनोखा प्रचार, राज ठाकरेंच्या शिवतीर्थबाहेर रेल्वे इंजिन अन्..
मनसेचा अनोखा प्रचार, राज ठाकरेंच्या शिवतीर्थबाहेर रेल्वे इंजिन अन्...
RPI आठवले गटाचा माजी जिल्हाध्यक्ष तुरुंगातून निवडणुकीच्या रिंगणात
RPI आठवले गटाचा माजी जिल्हाध्यक्ष तुरुंगातून निवडणुकीच्या रिंगणात.