AQI
Sign In

By signing in or creating an account, you agree with Associated Broadcasting Company's Terms & Conditions and Privacy Policy.

IPL 2025, KKR vs CSK : कोलकात्यासाठी करो या मरोची लढाई, नाणेफेकीचा कौल जिंकताच रहाणे म्हणाला..

आयपीएल 2025 स्पर्धेतील 57वा सामना कोलकाता नाईट रायडर्स आणि चेन्नई सुपर किंग्स यांच्यात होत आहे. हा सामना कोलकाता नाईट रायडर्ससाठी खूपच महत्त्वाचा आहे. तर चेन्नई सुपर किंग्ससाठी हा सामना औपचारिक असून स्पर्धेतील आव्हान आधीच संपुष्टात आलं आहे.

IPL 2025, KKR vs CSK : कोलकात्यासाठी करो या मरोची लढाई, नाणेफेकीचा कौल जिंकताच रहाणे म्हणाला..
केकेआर विरुद्ध सीएसकेImage Credit source: IPL/BCCI
| Updated on: May 07, 2025 | 7:12 PM
Share

आयपीएल 2025 स्पर्धेतील 57व्या सामन्यात चेन्नई सुपर किंग्स आणि कोलकाता नाईट रायडर्स हे संघ आमनेसामने आले आहेत. हा सामना कोलकात्यासाठी करो या मरोची लढाई आहे. कारण प्लेऑफमध्ये स्थान मिळवायचं असेल तर प्रत्येक सामन्यात विजय महत्त्वाचा आहे. जर या सामन्यात पराभव झाला तर या स्पर्धेतून आऊट होणारा चौथा संघ ठरेल. दरम्यान नाणेफेकीचा कौल हा कोलकाता नाईट रायडर्सच्या बाजूने लागला. अजिंक्य रहाणे म्हणाला की, ‘ आम्ही प्रथम फलंदाजी करू. चांगली खेळपट्टी दिसते. गेल्या दोन सामन्यात आम्ही प्रथम फलंदाजी केली आणि खरोखरच चांगली कामगिरी केली. आम्हाला बोर्डवर धावा जमवायच्या आहेत आणि त्याचे रक्षण करायचे आहे. महत्त्वाचे म्हणजे एका वेळी एक सामना खेळणे. भविष्याबद्दल जास्त विचार न करत नाहीत. मागील सामन्यातून बरेच काही शिकण्यासारखे आहे, खेळाडू या सामन्याची वाट पाहत आहेत. तुम्ही जवळचे सामने गमावले. परंतु तुम्हाला आत्मविश्वास असणे आवश्यक आहे. जर संधी मिळाली तर आम्ही आमचे सर्वोत्तम देण्याचा प्रयत्न करू. वेंकटेश अय्यर नाही, त्याऐवजी मनीष पांडेला संधी मिळाली.’

महेंद्रसिंह धोनी म्हणाला की, ‘मी लहानपणी इथे खूप क्रिकेट खेळलो आहे, मी इथे जितके क्रिकेट खेळलो आहे तितकेच ते घरच्या मैदानासारखे आहे. जेव्हा झोनल ट्रॉफी होती, काही ऑफिस लीग होत्या, तेव्हा मी इथे आणि जवळपास खूप क्रिकेट खेळलो आहे. पुढच्या वर्षासाठी उत्तरे मिळवणे महत्त्वाचे आहे. स्पर्धेत आमच्यासाठी काय चांगले गेले नाही. ती उत्तरे मिळवण्याचा प्रयत्न करत आहोत. आम्ही खेळाडूंना संधी देत ​​आहोत, पण आम्हाला चांगला प्लेइंग इलेव्हन किंवा बारावा हवा आहे. तुम्ही शेवटपर्यंत अशा गोष्टी करून पाहू शकता. कोणते खेळाडू खेळतील. त्यांच्याकडे दोन दर्जेदार फिरकी गोलंदाज आहेत, त्यामुळे ते एक आव्हान असेल. रशीद आणि करनऐवजी कॉनवे आणि उर्विल पटेल येतात.’

दोन्ही संघ यापूर्वी 32वेळी आमनेसामने आले आहेत. यात चेन्नई सुपर किंग्सचा वरचष्मा दिसून आला आहे. चेन्नई सुपर किंग्सने 20 सामन्यात, तर कोलकाता नाईट रायडर्सने 12 सामन्यात विजय मिळवला आहे. कोलकात्याच्या ईडन गार्डनवर हे दोन्ही संघ 10 वेळा भिडले आहेत. यात कोलकात्याने होमग्राउंड असूनही 4 सामन्यात विजय, तर चेन्नई सुपर किंग्सने 6 सामन्यात विजय मिळवला आहे. दोन्ही या स्पर्धेत यापूर्वी भिडले असून हा सामना कोलकाता नाईट रायडर्सने 8 विकेट राखून जिंकला आहे.

दोन्ही संघांची प्लेइंग 11

कोलकाता नाईट रायडर्स (प्लेइंग इलेव्हन): रहमानउल्ला गुरबाज (विकेटकीपर), सुनील नरेन, अजिंक्य रहाणे (कर्णधार), अंगक्रिश रघुवंशी, मनीष पांडे, आंद्रे रसेल, रिंकू सिंग, मोईन अली, रमणदीप सिंग, वैभव अरोरा, वरुण चक्रवर्ती.

चेन्नई सुपर किंग्ज (प्लेइंग इलेव्हन): आयुष म्हात्रे, उर्विल पटेल, डेव्हॉन कॉनवे, रवींद्र जडेजा, डेवाल्ड ब्रेविस, रविचंद्रन अश्विन, एमएस धोनी (विकेटकीपर/कर्णधार), अंशुल कंबोज, नूर अहमद, खलील अहमद, मथीशा पाथिराना.

दादांच्या NCPतून पुण्यातील गुन्हेगारी पार्श्वभूमीच्या उमेदवारांना संधी
दादांच्या NCPतून पुण्यातील गुन्हेगारी पार्श्वभूमीच्या उमेदवारांना संधी.
भाजपच्या माजी आमदारांसमोर माजी नगरसेविकेचा गोंधळ, नेमकं घडलं काय?
भाजपच्या माजी आमदारांसमोर माजी नगरसेविकेचा गोंधळ, नेमकं घडलं काय?.
महायुती तुटताच शिंदेंच्या शिवसेनेत तुफान जल्लोष, कार्यकर्त्यांनी थेट..
महायुती तुटताच शिंदेंच्या शिवसेनेत तुफान जल्लोष, कार्यकर्त्यांनी थेट...
मातोश्रीच्या अंगणात बंडखोरी, ठाकरे सेनेतून राजीनामा सत्र अन् अपक्ष...
मातोश्रीच्या अंगणात बंडखोरी, ठाकरे सेनेतून राजीनामा सत्र अन् अपक्ष....
ठाकरेंची सेना मनसेच्या पाठीत खंजीर खुपसणार, कुणी केला मोठा दावा?
ठाकरेंची सेना मनसेच्या पाठीत खंजीर खुपसणार, कुणी केला मोठा दावा?.
ठाकरे सेनेच्या कार्यकर्त्यांचा संताप अनावर, पक्षाचं बॅनरचं फाडलं अन्..
ठाकरे सेनेच्या कार्यकर्त्यांचा संताप अनावर, पक्षाचं बॅनरचं फाडलं अन्...
संभाजीनगरात मोठा ड्रामा, तिकीट नाकराल्यानं भाजप कार्यकर्ते संतप्त
संभाजीनगरात मोठा ड्रामा, तिकीट नाकराल्यानं भाजप कार्यकर्ते संतप्त.
मंदा म्हात्रे संतापल्या, मुलाच्या AB फॉर्मवरून गणेश नाईकांना चॅलेंज
मंदा म्हात्रे संतापल्या, मुलाच्या AB फॉर्मवरून गणेश नाईकांना चॅलेंज.
राज्यातील 'या' 12 महापालिकांमध्ये शिवसेना-भाजप युती तुटली
राज्यातील 'या' 12 महापालिकांमध्ये शिवसेना-भाजप युती तुटली.
मनसेला पहिला मोठा धक्का, भांडुपमध्ये अनिशा माजगावकर अपक्ष लढणार
मनसेला पहिला मोठा धक्का, भांडुपमध्ये अनिशा माजगावकर अपक्ष लढणार.