IPL 2025 LSG vs RCB Live Streaming : बंगळुरु लखनौला पराभूत करत टॉप 2 मध्ये पोहचणार? कोण जिंकणार?
Lucknow Super Giants vs Royal Challengers Bengaluru Live Streaming : रॉयल चॅलेंजर्स बंगळुरुसाठी लखनौ सुपर जायंट्स विरुद्धचा सामना अतिशय निर्णायक असणार आहे. लखनौ या सामन्यात विजय मिळवून आरसीबीचं गणित बिघडवू शकते.

आयपीएलच्या 18 व्या मोसमात साखळी फेरीतील शेवटचा सामना लखनौ सुपर जायंट्स विरुद्ध रॉयल चॅलेंजर्स बंगळुरु यांच्यात होणार आहे. लखनौ आणि आरसीबी या दोन्ही संघांचा हा 14 वा सामना असणार आहे. लखनौचं या हंगामातील आव्हान संपुष्ठात आलं आहे. तर दुसऱ्या बाजूला रॉयल चॅलेंजर्स बंगळुरुने प्लेऑफसाठी क्वालिफाय केलंय. मात्र आरसीबीसाठी हा सामना टॉप 2 च्या दृष्टीने महत्त्वाचा आहे. त्यामुळे आरसीबीचा हा सामना जिंकण्याचा प्रयत्न असणार आहे. मात्र लखनौ आरसीबीला पराभूत करत त्यांच्या गेम करु शकते. त्यामुळे हा सामना कोण जिंकतं? याकडे क्रिकेट चाहत्यांचं लक्ष असणार आहे.
लखनौ विरुद्ध बंगळुरु सामना केव्हा?
लखनौ विरुद्ध बंगळुरु सामना मंगळवारी 27 मे रोजी खेळवण्यात येणार आहे.
लखनौ विरुद्ध बंगळुरु सामना कुठे?
लखनौ विरुद्ध बंगळुरु सामना भारतरत्न अटलबिहारी वाजपेयी एकाना क्रिकेट स्टेडियम, लखनौ येथे होणार आहे.
लखनौ विरुद्ध बंगळुरु सामन्याला किती वाजता सुरुवात होणार?
लखनौ विरुद्ध बंगळुरु सामन्याला संध्याकाळी 7 वाजून 30 मिनिटांनी सुरुवात होईल. तर 7 वाजता टॉस होईल.
लखनौ विरुद्ध बंगळुरु सामना टीव्हीवर कुठे पाहायला मिळेल?
लखनौ विरुद्ध बंगळुरु सामना टीव्हीवर स्टार स्पोर्ट्स नेटवर्कवरील चॅनेल्सवर पाहायला मिळेल.
लखनौ विरुद्ध बंगळुरु सामना मोबाईलवर कुठे पाहता येईल?
लखनौ विरुद्ध बंगळुरु सामना मोबाईलवर जिओ हॉटस्टार एपवर लाईव्ह पाहायला मिळेल.
आरसीबी आणि लखनौची स्थिती
आरसीबीने या मोसमात 13 पैकी 8 सामने जिंकले आहेत. तर आरसीबाला 4 वेळा पराभवाचा सामना करावा लागला आहे. तर 1 सामना हा पावसामुळे रद्द करण्यात आला होता. त्यामुळे आरसीबीच्या खात्यात 17 पॉइंट्स आहेत. आरसीबी पॉइंट्स टेबलमध्ये तिसर्या क्रमांकावर आहे. तर लखनौने 13 पैकी 6 सामने जिंकलेत. तर लखनौचा 7 वेळा पराभव झालाय. लखनौ 12 गुणांसह पॉइंट्स टेबलमध्ये सातव्या क्रमांकावर आहे.
रॉयल चॅलेंजर्स बंगळुरू : फिलिप सॉल्ट, विराट कोहली, मयंक अग्रवाल, रजत पाटीदार (कर्णधार), जितेश शर्मा (विकेटकीपर), रोमॅरियो शेफर्ड, कृणाल पंड्या, टीम डेव्हिड, भुवनेश्वर कुमार, यश दयाल, सुयश शर्मा, रसिक दार सलाम, मनोज भंडागे, स्वप्नील सिंग, लियाम लिव्हिंगस्टोन, मोहित राठी, स्वस्तिक चिकारा, अभिनंदन सिंग, जोश हेझलवूड, नुवान तुषारा आणि ब्लेसिंग मुझाराबानी.
लखनौ सुपर जायंट्स टीम : मिचेल मार्श, आर्यन जुयाल, निकोलस पूरन, ऋषभ पंत (कॅप्टन आणि विकेटकीपर), आयुष बडोनी, अब्दुल समद, हिम्मत सिंग, शाहबाज अहमद, आकाश दीप, आवेश खान, विल्यम ओरुर्क, आकाश महाराज सिंग, रवी बिश्नोई, मणिमरण सिद्धार्थ, डेव्हिड मिलर, अर्शिन कुलकर्णी, शार्दूल ठाकुर, दिग्वेश सिंग राठी, प्रिंस यादव, मॅथ्यू ब्रेट्झके, आरएस हंगरगेकर आणि युवराज चौधरी.
