6,6,6,4,4,4,4,4, ऋषभ पंतचा शेवटच्या सामन्यात अर्धशतकी तडाखा, नितीश राणाची बरोबरी
Rishabh Pant Fifty Ipl 2025 : ऋषभ पंत याला आयपीएलच्या 18 व्या मोसमात धावांसाठी संघर्ष करावा लागला. मात्र शेवटच्या सामन्यात पंतने साखळी फेरीतील शेवटच्या सामन्यात वादळी अर्धशतक झळकावलं.

आयपीएलच्या 18 हंगामातील शेवटच्या सामन्यात लखनौ सुपर जायंट्स विरुद्ध रॉयल चॅलेंजर्स बंगळुरु आमनेसामने आहेत. लखनौचा हा या हंगामातील शेवटचा सामना आहे. तर आरसीबीने प्लेऑफमध्ये क्वालिफाय केलंय. त्यामुळे आरसीबी पुढे खेळत राहणार आहे. मात्र आरसीबी त्यांचं आव्हान टॉप 2 मध्ये संपवणार की नाही? हे या सामन्याच्या निकालावर अवलंबून आहे. आरसीबीला टॉप 2 मध्ये राहण्यासाठी लखनौ विरुद्धचा सामना जिंकावा लागणार आहे. आरसीबीने हा सामना जिंकला तर त्यांना अंतिम फेरीत पोहचण्यासाठी 2 संधी मिळतील. त्यामुळे आरसीबीसाठी हा एका प्रकारे करो या मरो असा सामना आहे. या अशा सामन्यात प्रतिस्पर्धी संघातील स्टार बॅट्समन ऋषभ पंत याने झंझावाती अर्धशतक झळकावत आरसीबीचं टेन्शन वाढवलं आहे.
एलएसजीचा कर्णधार आणि विकेटकीपर फलंदाज ऋषभ पंत याला या हंगामात त्याच्या लौकीकाला साजेशी कामगिरी करता आली नाही. त्यामुळे लखनौला प्लेऑफमध्येही पोहचता आलं नाही. अशात आता लखनौ शेवटच्या सामन्यात आरसीबीवर मात करुन मोहिमेचा शेवट विजयाने करण्याच्या प्रयत्नात आहे. अशात पंतने अर्धशतक ठोकून आरसीबीची धाकधूक वाढवली आहे.
चौकारासह ऋषभ पंतचं अर्धशतक पूर्ण
आरसीबीकडून सूर्यश शर्मा याने लखनौच्या डावातील 10 वी ओव्हर टाकली. पंतने या ओव्हरमधील पाचव्या बॉलवर फोर लगावला. पंतने यासह अर्धशतक पूर्ण केलं. पंतने 29 बॉलमध्ये 5 फोर आणि 3 खणखणीत सिक्ससह 179.31 च्या स्ट्राईक रेटने हे अर्धशतक केलं. पंतचं हे 18 व्या मोसमातील दुसरं तर आयपीएल कारकीर्दीतील 20 वं अर्धशतक ठरलं. पंतने यासह नितीश राणाच्या विक्रमाची बरोबरी केली. पंतने नितीशच्या 20 अर्धशतकांची बरोबरी केली.
पंतचं 18 व्या हंगामातील दुसरं अर्धशतक
Captain at it 😍
Second fifty of the season for Rishabh Pant 👏
Updates ▶ https://t.co/h5KnqyuYZE #TATAIPL | #LSGvRCB | @RishabhPant17 pic.twitter.com/tstdcMXu9Y
— IndianPremierLeague (@IPL) May 27, 2025
दुसऱ्या विकेटसाठी शतकी भागीदारी
दरम्यान ऋषभ पंतने अर्धशतकासह लखनौसाठी मिचेल मार्श याच्यासह दुसर्या विकेटसाठी नाबाद शतक भागीदारी केली. आरसीबीने टॉस जिंकून लखनौला बॅटिंगसाठी भाग पाडलं. मात्र मॅथ्यू ब्रीट्झके लखनौच्या 25 धावा असताना 14 रन्स करुन आऊट झाला. त्यानंतर पंतने मिचेल मार्शला अप्रतिम साथ दिली. या दोघांनी लखनौला सावरलं. दोघांनी घट्ट पाय रोवले. चौफेर फटकेबाजी केली. यासह या दोघांनी नाबाद शतकी भागदारी पूर्ण केली. त्यामुळे लखनौच्या चाहत्यांना या जोडीकडून आणख्या मोठ्या खेळीची अपेक्षा आहे. पंत जाता जाता ही अपेक्षा पूर्ण करणार का? हे काहीच वेळात स्पष्ट होईल.
