IPL 2025 : आयपीएलच्या 18व्या पर्वात होणार महत्त्वपूर्ण बदल! काय ते जाणून घ्या

आयपीएलचं 17वं पर्व नुकतंच संपलं असून जेतेपदावर कोलकाता नाईट रायडर्सने नाव कोरलं आहे. असं असताना 18व्या पर्वासाठी आतापासूनच मोर्चेबांधणी सुरु झाली आहे. आयपीएल 2025 मध्ये काही महत्त्वपूर्ण बदल होण्याची शक्यता आहे. एकूण सामन्यांची संख्या वाढू शकते.

IPL 2025 : आयपीएलच्या 18व्या पर्वात होणार महत्त्वपूर्ण बदल! काय ते जाणून घ्या
Follow us
| Updated on: May 29, 2024 | 12:53 PM

आयपीएल 2025 स्पर्धेसाठी आतापासून जोरदार तयारी सुरु झाली. पुढच्या दहा महिन्यांच्या कालावधीत बरेच मोठे बदल होणार आहेत. आयपीएलच्या 18व्या पर्वापूर्वी मेगा लिलाव होणार आहे. त्यामुळे फ्रेंचायसींना किती प्लेयर्स रिटेन करायचे आणि किती रिलीज करायचे याबाबत अजून निर्णय व्हायचा आहे. सध्यातरी फ्रेंचायसींना चार खेळाडू रिटेन करण्याची मुभा आहे. त्यामुळे फ्रेंचायसीची खेळाडू निवडण्यासाठी दमछाक होणार आहे. त्यामुळे पुढच्या पर्वात खेळाडू इतर संघात दिसले तर आश्चर्य वाटायला नको. मेगा लिलावात काही खेळाडूंना जबर भाव मिळण्याची शक्यता आहे.  आयपीएल इतिहासात मिचेल स्टार्क हा सर्वात महागडा खेळाडू ठरला आहे. 24.75 कोटी खर्च करून कोलकात्याने घेतला आहे. आता हा विक्रम मेगा लिलावात कोण मोडतं? याकडे लक्ष लागून आहे. दुसरीकडे आयपीएल स्पर्धेत एकूण 10 आणखी सामन्यांची भर पडणार आहे. आगामी आयपीएलमध्ये 74 ऐवजी एकूण 84 सामने होतील. आयपीएल 2025 आणि 2026 मध्ये हे 84 सामने खेळवले जातील. त्यानंतरही 2027 मध्ये ही संख्या 94 पर्यंत वाढवली जाण्याची शक्यता आहे. म्हणजेच 2027 मध्ये ही स्पर्धा लीग स्वरुपात होईल. सध्या आयपीएल स्पर्धा राउंड रॉबिन पद्धतीने होते.

आयपीएल 2021 मध्ये एकूण 60 सामने झाले. यात 56 साखळी फेरीचे सामने आणि 4 प्लेऑफच्या लढती झाल्या. यावेळी प्रत्येक संघांना एकमेकांविरुद्ध प्रत्येकी दोन सामने खेळले. सर्व संघांनी एकूण 14 सामने खेळेले. 2022 मध्ये दोन संघांची भर पडली आणि आयपीएलचं आयोजन राउंड रॉबिन पद्धतीने करण्यात आलं. आयपीएल 2025 आणि 2026 मध्येही असाच फॉर्मेट सुरु ठेवला जाईल. पण आयपीएल 2027 बीसीसीआयने लीग पद्धतीने आयोजित करण्याची योजना आखली आहे. म्हणजेच सर्व संघ एकमेकांविरुद्ध दोन सामने खेळतील.

आयपीएल 2027 मध्ये कोणताही गट नसेल. त्याऐवजी एक संघ उर्वरित 9 संघांविरुद्ध प्रत्येकी 2 सामने खेळेल. म्हणजेच एका संघाच्या वाटेला 18 सामने येतील. असे साखळी टप्प्यात 90 सामने खेळवले जातील. दुसरीकडे, येत्या पर्वात प्लेऑफ पॅटर्नमध्ये कोणताही बदल केला जाणार नाही. पहिला क्वॉलिफायर, एलिमिनेटर, दुसरा क्वॉलिफायर आणि अंतिम सामना आयोजित केला जाईल.

Non Stop LIVE Update
एकनाथ खडसे आणि गिरीश महाजन एकत्र आले तर... पाटलांचं वक्तव्य नेमकं काय?
एकनाथ खडसे आणि गिरीश महाजन एकत्र आले तर... पाटलांचं वक्तव्य नेमकं काय?.
काय कमावल अन काय गमावल हे 13 जुलैला...जरांगे पाटलांचा नेमका इशारा काय?
काय कमावल अन काय गमावल हे 13 जुलैला...जरांगे पाटलांचा नेमका इशारा काय?.
गायब असलेला पाऊस 'या' दिवशी पुन्हा करणार कमबॅक, IMD चं मोठं अपडेट
गायब असलेला पाऊस 'या' दिवशी पुन्हा करणार कमबॅक, IMD चं मोठं अपडेट.
जरांगे पाटलांना रेड कार्पेट आणि आमची दखलही नाही? ओबीसी नेता आक्रमक
जरांगे पाटलांना रेड कार्पेट आणि आमची दखलही नाही? ओबीसी नेता आक्रमक.
तोडीबाज नेता, ब्लॅकमेलिंग आणि वसुलीत नंबर वन काम; बच्चू कडूंवर टीका
तोडीबाज नेता, ब्लॅकमेलिंग आणि वसुलीत नंबर वन काम; बच्चू कडूंवर टीका.
शरद पवार यांचं मुख्यमंत्र्यांना थेट पत्र अन् केली महत्त्वाची मागणी
शरद पवार यांचं मुख्यमंत्र्यांना थेट पत्र अन् केली महत्त्वाची मागणी.
मरतुकडी म्हैस ध्यानीमनी नसताना गाभण राहावी तसा राणेंचा...सामनातून टीका
मरतुकडी म्हैस ध्यानीमनी नसताना गाभण राहावी तसा राणेंचा...सामनातून टीका.
Elon Musk याच्या दाव्यानंतर निवडणूक आयोगानं फटकारलं, नेमकं काय प्रकरण?
Elon Musk याच्या दाव्यानंतर निवडणूक आयोगानं फटकारलं, नेमकं काय प्रकरण?.
लालपरीने शाळेत जाणाऱ्यांसाठी आनंदाची बातमी, विद्यार्थ्यांना आता शाळेत
लालपरीने शाळेत जाणाऱ्यांसाठी आनंदाची बातमी, विद्यार्थ्यांना आता शाळेत.
Monsoon रखडला..आगेकूच मंदावली, विदर्भ प्रतिक्षेत तर कोकण, मराठवाड्यात
Monsoon रखडला..आगेकूच मंदावली, विदर्भ प्रतिक्षेत तर कोकण, मराठवाड्यात.