IPL 2025 MI vs CSK Live Streaming : मुंबई इंडियन्स वानखेडेत विजयी हॅटट्रिकसाठी सज्ज, यलो आर्मीचा धुव्वा उडवणार का?
Mumbai Indians vs Chennai Super Kings Live Streaming: प्रत्येकी 5-5 वेळा आयपीएल ट्रॉफी जिंकणारे 2 यशस्वी संघ रविवारी 20 मार्चला आमनेसामने असणार आहेत. मुंबई विरुद्ध चेन्नई यांच्यातील या महामुकाबल्याकडे क्रिकेट चाहत्यांचं लक्ष लागून आहे.

आयपीएल अर्थात इंडियन प्रीमियर लीग स्पर्धेतील 18 व्या मोसमात रविवारी 20 एप्रिलला 2 सामने खेळवण्यात येणार आहेत. पहिला सामना हा पंजाब किंग्स विरुद्ध रॉयल चॅलेंजर्स बंगळुरु यांच्यात होणार आहे. तर दुसऱ्या सामन्याची साऱ्या क्रिकेट चाहत्यांना प्रतिक्षा आहे. या सामन्यात आयपीएल स्पर्धेतील 2 यशस्वी संघ आमनेसामने असणार आहेत. मुंबई इंडियन्स विरुद्ध चेन्नई सुपर किंग्स या 2 सर्वात यशस्वी संघांमध्ये हा महामुकाबला होणार आहे. हा सामना कुठे आणि कधी होणार? याबाबत आपण जाणून घेऊयात.
मुंबई इंडियन्स विरुद्ध चेन्नई सुपर किंग्स सामना केव्हा?
मुंबई इंडियन्स विरुद्ध चेन्नई सुपर किंग्स सामना रविवारी 20 एप्रिलला होणार आहे.
मुंबई इंडियन्स विरुद्ध चेन्नई सुपर किंग्स सामना कुठे?
मुंबई इंडियन्स विरुद्ध चेन्नई सुपर किंग्स सामना वानखेडे स्टेडियम, मुंबई येथे होणार आहे.
मुंबई इंडियन्स विरुद्ध चेन्नई सुपर किंग्स सामन्याला किती वाजता सुरुवात होणार?
मुंबई इंडियन्स विरुद्ध चेन्नई सुपर किंग्स सामन्याला संध्याकाळी 7 वाजून 30 मिनिटांनी सुरुवात होईल. तर 7 वाजता टॉस होईल.
मुंबई इंडियन्स विरुद्ध चेन्नई सुपर किंग्स सामना टीव्हीवर कुठे पाहता येईल?
मुंबई इंडियन्स विरुद्ध चेन्नई सुपर किंग्स सामना टीव्हीवर स्टार स्पोर्ट्स नेटवर्कवरील चॅनेल्सवर पाहायला मिळेल.
मुंबई इंडियन्स विरुद्ध चेन्नई सुपर किंग्स लाईव्ह मॅच मोबाईलवर कुठे पाहता येईल?
मुंबई इंडियन्स विरुद्ध चेन्नई सुपर किंग्स लाईव्ह मॅच मोबाईलवर जिओहॉटस्टार एपवर पाहता येईल.
सीएसकेचा आयुष म्हात्रे डेब्यूसाठी सज्ज, संधी मिळणार का?
Ayush stepping into a new journey in #Yellove 💛 #WhistlePodu pic.twitter.com/5rcWx8I8tH
— Chennai Super Kings (@ChennaiIPL) April 19, 2025
मुंबई वानखेडेत सलग तिसरा विजय मिळवणार?
दरम्यान मुंबई इंडियन्सने आयपीएलच्या या 18 व्या मोसमात आतापर्यंत एकूण 3 सामने जिंकले आहेत. पलटणने त्यापैकी एकूण आणि सलग 2 सामने हे घरच्या मैदानात अर्थात वानखेडे स्टेडियममध्ये जिंकले आहेत. मुंबईने 31 मार्च रोजी कोलकाता नाईट रायडर्स आणि त्यानंतर 17 एप्रिलला सनरायजर्स हैदराबादवर विजय मिळवला. त्यामुळे मुंबईकडे आता चेन्नई सुपर किंग्सचा धुव्वा उडवून एकूण चौथा तर वानखेडे स्टेडियममधील सलग तिसरा विजय मिळवण्याची संधी आहे. आता पलटण या प्रयत्नात यशस्वी ठरणार की चेन्नई जिंकणार? हे पाहणं औत्सुक्याचं ठरणार आहे.
