AQI
Sign In

By signing in or creating an account, you agree with Associated Broadcasting Company's Terms & Conditions and Privacy Policy.

RCB vs DC : आरसीबी घरच्या मैदानात मोठी धावसंख्या करण्यात अपयशी, दिल्लीसमोर 164 रन्सचं टार्गेट, कोण जिंकणार?

Royal Challengers Bengaluru vs Delhi Capitals Ipl 2025 : रॉयल चॅलेंजर्स बंगळुरुला शानदार सुरुवात मिळाली होती. मात्र दिल्ली कॅपिट्ल्सच्या गोलंदाजांनी आरसीबीला ठराविक अंतराने झटके दिले. त्यामुळे आरसीबीला घरच्या मैदानात मोठी खेळी करता आली नाही.

RCB vs DC : आरसीबी घरच्या मैदानात मोठी धावसंख्या करण्यात अपयशी, दिल्लीसमोर 164 रन्सचं टार्गेट, कोण जिंकणार?
Kuldeep Yadav Delhi Capitals Ipl 2025Image Credit source: IPL X Account
| Updated on: Apr 10, 2025 | 9:42 PM
Share

रॉयल चॅलेंजर्स बंगळुरुने आयपीएलच्या 18 व्या मोसमातील 24 व्या सामन्यात घरच्या मैदानात खेळताना दिल्ली कॅपिटल्ससमोर 164 धावांचं आव्हान ठेवलं आहे. आरसीबीने 20 ओव्हरमध्ये 7 विकेट्स गमावून 163 धावा केल्या. आरसीबीसाठी फिलिप सॉल्ट आणि टीम डेव्हिड या दोघांनी सर्वाधिक 37 धावांची खेळी केली. टीम डेव्हिड याने फिनीशिंग टच दिला, ज्यामुळे आरसीबी दिल्लीसमोर सन्मानजनक आव्हान ठेवण्यात यशस्वी ठरली. तर त्या दरम्यान विराट कोहली कर्णधार रजत पाटीदार या दोघांनी छोटेखानी मात्र महत्त्वाची खेळी केली.

चांगली सुरुवात मात्र त्यानंतर डाव गडगडला

आरसीबीच्या फिलीप सॉल्ट आणि विराट कोहली या सलामी जोडीने कडक सुरुवात केली. या दोघांनी जोरदार फटकेबाजी करत दिल्लीच्या गोलंदाजांची धुलाई केली. मात्र फिलीप सॉल्ट रन आऊट झाला आणि सर्वच गणित बिघडलं. आरसीबीने 61 धावावंर पहिली विकेट गमावली. सॉल्टने 17 चेंडूत 4 चौकार आणि 3 षटकारांच्या मदतीने 37 धावा केल्या. इथून आरसीबीचा डाव गडगडला आणि दिल्लीने सामन्यात कमबॅक केलं. आरसीबीला पहिल्या विकेटनंतर कमबॅक करता आलंच नाही. दिल्लीने आरसीबीला ठराविक अंतराने झटके दिले, ज्यामुळे आरसीबीला मोठी धावसंख्या उभारता आली नाही.

सॉल्टनंतर देवद्दत पडीक्कल 1, विराट कोहली 22, लियाम लिविंगस्टोन 4, जितेश शर्मा 3, कर्णधार रजत पाटीदार 25 आणि कृणाल पंड्या 18 धावा करुन आऊट झाले. तर अखेरच्या क्षणी टीम डेव्हिड याने फटकेबाजी करत आरसीबीला 160 पार पोहचवलं. डेव्हीडने 20 चेंडूत 2 चौकार आणि 4 षटकारांच्या मदतीने नाबाद 37 धावा केल्या. तर भुवनेश्वर कुमारने नाबाद 1 धाव केली. तर दिल्लीकडून कुलदीप यादव आणि विपराज निगम या दोघांनी प्रत्येकी 2-2 विकेट्स घेतल्या. तर मुकेश कुमार आणि मोहित शर्मा या दोघांनी प्रत्येकी 1-1 विकेट घेतली.

रॉयल चॅलेंजर्स बेंगळुरू प्लेइंग ईलेव्हन : फिलिप सॉल्ट, विराट कोहली, देवदत्त पडिक्कल, रजत पाटीदार (कर्णधार), लियाम लिव्हिंगस्टोन, जितेश शर्मा (विकेटकीपर), टिम डेव्हिड, क्रुणाल पंड्या, भुवनेश्वर कुमार, जोश हेजलवुड आणि यश दयाल.

दिल्ली कॅपिटल्स प्लेइंग ईलेव्हन: फाफ डू प्लेसिस, जेक फ्रेझर-मॅकगुर्क, केएल राहुल (विकेटकीपर), ट्रिस्टन स्टब्स, अक्षर पटेल (कर्णधार), आशुतोष शर्मा, विपराज निगम, मिचेल स्टार्क, मोहित शर्मा, कुलदीप यादव आणि मुकेश कुमार.

फडणवीसांचा दरिंदा, जल्लाद अन् गजनी उल्लेख, काँग्रेस नेता पुन्हा बरळला
फडणवीसांचा दरिंदा, जल्लाद अन् गजनी उल्लेख, काँग्रेस नेता पुन्हा बरळला.
इंदू मिल स्मारकाबाबत CM फडणवीसांची मोठी घोषणा, थेट सांगितली डेडलाईन
इंदू मिल स्मारकाबाबत CM फडणवीसांची मोठी घोषणा, थेट सांगितली डेडलाईन.
तपोवन वृक्षतोडीविरोधात मनसे नाशिककरांच्या सोबतीला, चित्रपट सेना आक्रमक
तपोवन वृक्षतोडीविरोधात मनसे नाशिककरांच्या सोबतीला, चित्रपट सेना आक्रमक.
फडणवीस सरकारच 1 वर्ष, मुख्यमंत्र्यांना किती मार्क? काय सांगतो सर्व्हे?
फडणवीस सरकारच 1 वर्ष, मुख्यमंत्र्यांना किती मार्क? काय सांगतो सर्व्हे?.
फोडाफोडीन नाराजी, वाक् युद्धानंतर आज शिंदे-रवींद्र चव्हाण एकाच मंचावर?
फोडाफोडीन नाराजी, वाक् युद्धानंतर आज शिंदे-रवींद्र चव्हाण एकाच मंचावर?.
फडणवीसांच्या इशाऱ्याने इतर पक्ष चालतात, कुणाच्या वक्तव्याची होते चर्चा
फडणवीसांच्या इशाऱ्याने इतर पक्ष चालतात, कुणाच्या वक्तव्याची होते चर्चा.
CM सह शिंदे दादांची महत्त्वाची बैठक; पक्षांतर्गत प्रवेशबंदीवर तोडगा?
CM सह शिंदे दादांची महत्त्वाची बैठक; पक्षांतर्गत प्रवेशबंदीवर तोडगा?.
इंडिगोच्या विस्कळीत सेवेविरोधात प्रवाशांना मनस्ताप, थेट कोर्टात याचिका
इंडिगोच्या विस्कळीत सेवेविरोधात प्रवाशांना मनस्ताप, थेट कोर्टात याचिका.
रूपाली ठोंबरेंकडून बाळासाहेब अन् पवारांसोबत फोटो शेअर, चर्चांना उधाण
रूपाली ठोंबरेंकडून बाळासाहेब अन् पवारांसोबत फोटो शेअर, चर्चांना उधाण.
मुंबईत भाजपच्या महापौरामुळं कॉलर टाईट होणार! लोढांचं मोठं वक्तव्य काय?
मुंबईत भाजपच्या महापौरामुळं कॉलर टाईट होणार! लोढांचं मोठं वक्तव्य काय?.