SRH vs MI : आऊट न होताच इशान किशन तंबूत परतला, विचित्र विकेटमुळे रंगला ड्रामा Video
आयपीएल 2025 स्पर्धेतील 41व्या सामन्यात मुंबई इंडियन्सचा वरचष्मा दिसला. या सामन्यात मुंबईने सनरायझर्स हैदराबादला 144 धावांवर गुंडाळलं. त्यामुळे विजयी आव्हान सोपं मिळालं आणि फलंदाजीसाठी कोणतंही दडपण आलं नाही. पण मुंबई इंडियन्सला एक विकेट फुकटची मिळाली. पंचांनी केलेल्या चुकीचा फटका बसला.

आयपीएल 2025 स्पर्धेत 41वा सामना मुंबई इंडियन्स आणि सनरायझर्स हैदराबाद यांच्यात रंगला. या सामन्यावर मुंबई इंडियन्सची पकड दिसली. मुंबई इंडियन्सने नाणेफेकीचा कौल जिंकला आणि प्रथम गोलंदाजी करण्याचा निर्णय घेतला. मुंबईने दुसऱ्या षटकापासून आपला वरचष्मा दाखवला. ट्रेव्हिस हेडला ट्रेंटच बोल्टने तंबूचा रस्ता दाखवला आणि हैदराबादवर दडपण वाढलं. त्यानंतर फलंदाजीसाठी इशान किशन मैदानात उतरला होता. पहिल्या सामन्यात शतकी खेळी केल्यानंतर मात्र पूर्णपणे फेल गेला. त्यामुळे या सामन्यात त्याच्याकडून फार अपेक्षा होत्या. मात्र क्रीडारसिकांचा भ्रमनिरास झाला. तिसऱ्या क्रमांकावर आलेल्या इशान किशनने एक चूक केली आणि आऊट न होताच पॅव्हेलियनमद्ये परतला. इशान किशन ट्रेव्हिस हेड बाद झाल्यानंतर ट्रेंट बोल्टच्या तीन चेंडूचा सामना केला. तिसऱ्या चेंडूवर एक धाव घेतली त्यामुळे दीपक चाहरच्या गोलंदाजीचा सामना करण्यासाठी स्ट्राईकला आले.
मुंबई इंडियन्सकडून तिसरं षटक टाकताना दीपक चाहरने पहिला चेंडू टाकला. हा चेंडूवर फटका मारतात इशान किशन चुकला. इशान किशनच्या बॅटला चेंडू लागला नाही. पण थेट विकेटकीपर रियान रिकल्टनच्या हाती गेला. यावेळी मुंबई इंडियन्सच्या खेळाडूंनी फार काही अपील केली नाही. पण इशान किशन तंबूच्या दिशेने जाऊ लागला. पंचांनी पण काही शहनिशा करायच्या आतच संभ्रमात हात वर करून बाद असल्याचं घोषित केलं. पण हा चेंडू काही इशान किशनच्या बॅटला लागला नव्हता. पण डीआरएसची संधी असताना इशान किशन तसाच तंबूत परतला. त्याच्या नको त्या प्रामाणिकपणाचा फटका हैदराबादला बसला आणि टीम गोत्यात आली.
🚨 ISHAN KISHAN DISMISSAL MOMENT 🚨 pic.twitter.com/y75dm8v0bM
— Johns. (@CricCrazyJohns) April 23, 2025
मुंबई इंडियन्सचा कर्णधार हार्दिक पांड्या तंबूत परतणाऱ्या इशान किशनकडे गेला आणि पाठ थोपाटली. त्याला त्याच्या प्रामाणिकपणासाठी दाद दिली असंच वाटलं. पण तेव्हा स्निकोमीटरमध्ये पाहीलं गेलं तेव्हा सर्वांना आश्चर्याचा धक्का बसला. इशान किशनच्या बॅटला सोडा, त्याच्या शरीराच्या कोणत्याच भागाला लागला नव्हता. हा चेंडू वाइड होता. पण एक अवांतर धाव मिळवण्याऐवजी विकेट आणि चेंडूही निर्धाव गेला.
