IPL 2025 SRH vs MI Live Streaming : सनरायजर्स हैदराबाद विरुद्ध मुंबई इंडियन्स हायव्होल्टेज सामना, कोण जिंकणार?
Sunrisers Hyderabad vs Mumbai Indians Live Streaming: मुंबई इंडियन्सकडे सनरायजर्स हैदराबादविरुद्ध सलग दुसरा आणि एकूण पाचवा विजय मिळवण्याची संधी आहे. तर हैदराबाद पराभवाची परतफेड करण्यासाठी मैदानात उतरणार आहे.

आयपीएलच्या 18 व्या मोसमातील 41 व्या सामन्यात सनरायजर्स हैदराबाद विरुद्ध मुंबई इंडियन्स आमनेसामने असणार आहेत. पॅट कमिन्स याच्याकडे हैदराबादच्या कर्णधारपदाची जबाबदारी आहे. तर हार्दिक पंड्या मुंबईचं नेतृत्व करणार आहे. मुंबईचा हा या मोसमातील नववा तर हैदराबादचा आठवा सामना असणार आहे. तसेच दोन्ही संघ या मोसमातील साखळी फेरीत दुसऱ्यांदा आमनेसामने असणार आहेत. याआधी उभयसंघात 17 एप्रिलला झालेल्या सामन्यात मुंबईने हैदराबादवर 4 विकेट्सने एकतर्फी विजय मिळवला होता. त्यामुळे आता हैदराबादकडे घरच्या मैदानात मुंबईवर मात करुन गेल्या पराभवाचा हिशोब बरोबर करण्याचा प्रयत्न असणार आहे.
सनरायजर्स हैदराबाद विरुद्ध मुंबई इंडियन्स सामना केव्हा?
सनरायजर्स हैदराबाद विरुद्ध मुंबई इंडियन्स सामना बुधवारी 23 एप्रिलला खेळवण्यात येणार आहे.
सनरायजर्स हैदराबाद विरुद्ध मुंबई इंडियन्स सामना कुठे?
सनरायजर्स हैदराबाद विरुद्ध मुंबई इंडियन्स सामना राजीव गांधी आंतरराष्ट्रीय स्टेडियम, हैदराबाद येथे होणार आहे.
सनरायजर्स हैदराबाद विरुद्ध मुंबई इंडियन्स सामन्याला किती वाजता सुरुवात होणार?
सनरायजर्स हैदराबाद विरुद्ध मुंबई इंडियन्स सामन्याला संध्याकाळी 7 वाजून 30 मिनिटांनी सुरुवात होणार आहे. तर 7 वाजता टॉस होणार आहे.
सनरायजर्स हैदराबाद विरुद्ध मुंबई इंडियन्स सामना टीव्हीवर कुठे पाहायला मिळेल?
सनरायजर्स हैदराबाद विरुद्ध मुंबई इंडियन्स सामना टीव्हीवर स्टार स्पोर्ट्स नेटवर्कवरील चॅनेल्सवर पाहायला मिळेल.
सनरायजर्स हैदराबाद विरुद्ध मुंबई इंडियन्स लाईव्ह मॅच मोबाईलवर कुठे पाहता येईल?
सनरायजर्स हैदराबाद विरुद्ध मुंबई इंडियन्स लाईव्ह मॅच मोबाईलवर जिओहॉटस्टार एपवर पाहायला मिळेल.
पॉइंट्स टेबलमधील दोन्ही संघांची स्थिती
मुंबई इंडियन्स पॉइंट्स टेबलमध्ये ताज्या आकडेवारीनुसार सहाव्या स्थानी आहे. तर सनरायजर्स हैदराबाद नवव्या स्थानी आहे. मुंबईने 8 पैकी 4 सामने जिंकले आहेत. तर हैदराबादला 7 पैकी फक्त 2 सामनेच जिंकता आले आहेत.
धावांचा पाऊस पडणार का?
दरम्यान मुंबई आणि हैदराबाद या दोन्ही संघात स्फोटक फलंदाज आहेत. हैदराबादच्या गोटात अभिषेक शर्मा, ट्रेव्हिस हेड, हेन्रिक क्लासेन, इशान किशन आणि नितीश कुमार रेड्डी 5 स्फोटक फलंदाज आहे. तर पलटणमध्ये सूर्यकुमार यादव, रोहित शर्मा, हार्दिक पंड्या, तिलक वर्मा, विल जॅक्स आणि रायन रिकेल्टन असे 6 फलंदाज आहेत. त्यामुळे आता कोण कुणावर वरचढ ठरणार? याची प्रतिक्षा क्रिकेट चाहत्यांना लागून आहे.
