AQI
TV9 Network
User
Sign In

By signing in or creating an account, you agree with Associated Broadcasting Company's Terms & Conditions and Privacy Policy.

फक्त 1 रन आणि वादाला फोडणी..! आयपीएलच्या या नियमावर आर अश्विनने ठेवलं बोट, पंजाब झालं नुकसान

आयपीएल 2026 स्पर्धेतील 58व्या सामन्यात पंजाब किंग्स आणि मुंबई इंडियन्स यांच्यात लढत सुरू आहे. या सामन्यात ऑन फिल्ड पंचांच्या निर्णयामुळे पंजाब किंग्सचं नुकसान झालं. त्यामुळे आर अश्विनने आयपीएलच्या नियमावर बोट ठेवत बदलण्याची मागणी केली.

फक्त 1 रन आणि वादाला फोडणी..! आयपीएलच्या या नियमावर आर अश्विनने ठेवलं बोट, पंजाब झालं नुकसान
फक्त 1 रन आणि वादाला फोडणी..! आयपीएलच्या या नियमावर आर अश्विने ठेवलं बोट, पंजाब झालं नुकसानImage Credit source: PTI
| Updated on: May 14, 2026 | 10:45 PM
Share

R Ashwin On DRS reversal: आयपीएल 2026 स्पर्धेतील 58व्या सामन्यात पंजाब किंग्सने 20 षटकात 8 गडी गमवून 200 धावा केल्या. तसेच मुंबई इंडियन्ससमोर विजयासाठी 201 धावांचं आव्हान दिलं. असं असताना आर अश्विनने या सामन्यात पंजाब किंग्सचं एका धावेचं नुकसान संताप व्यक्त केला आहे. तसेच आयपीएलमधील एका वादग्रस्त नियमाकडे लक्ष वेधलं आहे. आर अश्विनच्या मते, आयसीसीने हा नियम बदलावा की नाही हा त्यांचा प्रश्न आहे. पण बीसीसीआयने आयपीएल स्पर्धेत हा नियम बदलण्याची गरज आहे. पंजाब किंग्सच्या डावाच्या 20व्या षटकाच्या शेवटच्या चेंडूवर हा प्रकार घडला. जसप्रीत बुमराह शेवटचं षटक टाकण्यासाठी आला होता. या षटकाच्या शेवटच्या चेंडूवर एलबीडब्ल्यूसाठी जोरदार अपील झाली आणि पंचांनी बाद दिलं. पण रिव्ह्यू घेतल्यानंतर एका धावेचं नुकसान झालं.

जसप्रीत बुमराह गोलंदाजी करत होता विष्णु विनोद स्ट्राईकला होता आणि फटका मारताना चुकला. त्या पॅडवर चेंडू आदळला आणि बुमराहने एलबीडब्ल्यूसाठी अपील केली. पण त्यानंतर पंजाब किंग्सने रिव्ह्यू घेतला आणि डीआरएसच्या बॉल ट्रॅकिंगमध्ये चेंडू इम्पॅक्ट ऑफ स्टम्पच्या बाहेर असल्याचं स्पष्ट झालं. त्यानंतर पंचांनी विष्णु विनोद नाबाद असल्याचं सांगितलं. या दरम्यान, विष्णु विनोदने एक धाव घेतली होती. पण धाव घेण्यापूर्वीच ऑन फिल्ड पंचांनी त्याला बाद दिलं होतं. त्यामुळे चेंडू डेड ढाला होता. त्यामुळे निर्णय बदलल्यानंतरही पंजाब किंग्सला एक धाव मिळाली नाही. यानंतर माजी फिरकीपटू आर अश्विनने टीकास्त्र सोडत सोशल मीडियावर तिखट प्रतिक्रिया नोंदवली आहे.

आर अश्विनने लिहिलं की, ‘चुकीच्या निर्णयामुळे पंजाब किंग्सच्या एका धावेचं नुकसान झालं. हा नियम लगेच बदलला पाहीजे. जसं की इम्पॅक्ट सब हा आयपीएलचा नियम आहे. तसंच डीआरस रिव्हर्सलवरही आयपीएमध्ये बदल केला पाहीजे. भले आयसीसीने हा नियम बदलण्यास विलंब केला तरी…’ आर अश्विनचं हे ट्वीट वेगाने व्हायरल होत आहे. कारण एक धाव किती महत्त्वाची आहे हे अनेक सामन्यात दिसून आलं आहे. एका धावेमुळे सुपर ओव्हरमध्ये सामना जाण्याची किंवा गमवण्याची वेळ येऊ शकते.

Follow Us
सचिन अहेर यांची आमदारकी राहणार की जाणार? कायदा काय सांगतो? असीम सरोदें
सचिन अहेर यांची आमदारकी राहणार की जाणार? कायदा काय सांगतो? असीम सरोदेंनी सगळं सांगितलं!
महापौर रितू तावडे यांची दुर्घटना स्थळाला भेट, दोषींवर कारवाई करणार
महापौर रितू तावडे यांची दुर्घटना स्थळाला भेट, दोषींवर कारवाई करणार
केतन-सिया प्रकरणाला वेगळंच वळण; तब्बल 10 कोटी... वकिलांच्या दाव्याने
केतन-सिया प्रकरणाला वेगळंच वळण; तब्बल 10 कोटी... वकिलांच्या दाव्याने एकच खळबळ
चेंबूर स्कुलबस अपघातानंतर शिंदे अ‍ॅक्शन मोडमध्ये, फोन करून दिला तातडीच
Eknath Shinde | चेंबूर स्कुलबस अपघातानंतर शिंदे अ‍ॅक्शन मोडमध्ये, फोन करून दिला तातडीचा आदेश!
राम मंदिर दानपेटी प्रकरणावर राज ठाकरेंचा भाजपवर थेट निशाणा
Raj Thackeray | राम मंदिर दानपेटी प्रकरणावर राज ठाकरेंचा भाजपवर थेट निशाणा; मोदींच्या मौनावर गंभीर सवाल
आमच्या पक्षाचे पण खासदार फोडण्याचे प्रयत्न... रोहित पवारांच्या विधान
Rohit Pawar | 'आमच्या पक्षाचे पण खासदार फोडण्याचे प्रयत्न... रोहित पवारांच्या विधानाने खळबळ
महाराष्ट्रात पुन्हा राजकीय भूकंप? अनेक बडे नेते काँग्रेसच्या संपर्कात
मोठी बातमी! महाराष्ट्रात पुन्हा राजकीय भूकंप? अनेक बडे नेते काँग्रेसच्या संपर्कात; विजय वडेट्टीवारांचा मोठा दावा
शाळेच्या बसवर भलेमोठं झाड कोसळलं; अनेक विद्यार्थी जखमी
मुंबईत भीषण दुर्घटना! शाळेच्या बसवर भलेमोठं झाड कोसळलं; अनेक विद्यार्थी जखमी, बचावकार्य युद्धपातळीवर सुरू
अजून अनेक मोठे चेहरे आमच्या संपर्कात; शिंदे गटातील नेत्याचा मोठा दावा
मोठी बातमी! अजून अनेक मोठे चेहरे आमच्या संपर्कात; सचिन अहिरांच्या प्रवेशानंतर शिंदे गटातील नेत्याचा मोठा दावा
मोठी बातमी! सचिन अहिर यांनी केवळ अर्ज भरलाय, पक्षप्रवेश केलेला नाही?
मोठी बातमी! सचिन अहिर यांनी केवळ अर्ज भरलाय, पक्षप्रवेश केलेला नाही? बड्या नेत्याच्या विधानाने खळबळ