AQI
TV9 Network
User
Sign In

By signing in or creating an account, you agree with Associated Broadcasting Company's Terms & Conditions and Privacy Policy.

RR vs MI: मुंबई इंडियन्स आणि राजस्थान रॉयल्स सामना होणार रद्द? कारण की…

आयपीएल 2026 स्पर्धेच्या 13व्या सामन्यात मुंबई इंडियन्स आणि राजस्थान रॉयल्स संघ आमनेसामने येणार आहे. पण हा सामना होईल की नाही हे सांगणं आता कठीण झालं आहे. त्यामुळे दोन्ही संघाच्या चाहत्यांची धाकधूक वाढली आहे.

RR vs MI: मुंबई इंडियन्स आणि राजस्थान रॉयल्स सामना होणार रद्द? कारण की...
RR vs MI: मुंबई इंडियन्स आणि राजस्थान रॉयल्स सामना होणार रद्द? कारण की... Image Credit source: IPL/BCCI
| Updated on: Apr 07, 2026 | 4:44 PM
Share

RR vs MI Match Weather Forecast: आयपीएल 2026 स्पर्धेत मुंबई इंडियन्स आणि राजस्थान रॉयल्स हे संघ आमनेसामने येणार आहेत. या सामन्याकडे साऱ्या क्रीडाप्रेमींच्या नजरा लागून आहेत. कारण जसप्रीत बुमराह आणि वैभव सूर्यवंशी हे द्वंद्व या सामन्यात पाहायला मिळणार आहे. असं असताना हा सामना होईल की नाही याबाबत आता साशंकता आहे. हा सामना राजस्थान रॉयल्स होमग्राउंड असलेल्या गुवाहाटीत होणार आहे. त्यामुळे हा सामन्यावर रद्द होण्याचं सावट आहे. यापूर्वी 12व्या सामन्यात पावसाचं सावट आलं होतं. त्यामुळे सामना रद्द करावा लागला होता. कोलकाता नाईट रायडर्स आणि पंजाब किंग्स सामना पावसामुळे रद्द झाला. या सामन्यात फक्त 22 चेंडूंचा खेळ झाला. असं असताना दुसरा सामना रद्द होणार या चर्चेने क्रीडाप्रेमींमध्ये चर्चा रंगली आहे. पण या सामना हा रद्द होण्याचं कारण पाऊस नाही तर भलतंच असू शकते. हवामान खात्याकडून तसा अंदाज वर्तवण्यात आला आहे.

आयपीएलचा 13वा सामना गुवाहाटीच्या बरसापारा स्टेडियममध्ये हा सामना होणार आहे. या सामन्यात पावसाची शक्यता आहे. हवामान खात्याच्या अंदाजानुसार, सामन्यादरम्यान हलक्या सरी कोसळण्याची शक्यता आहे. पण पाऊस तर लगेच जाईल. पण वादळी वारा आणि वीज कोसळण्याची भीती आहे. हवामान खात्याने गुवाहाटीत मंगळवारी यलो अलर्ट जारी केला आहे. गुवाहाटीत वादळी वाऱ्याची शक्यता आहे. तसेच वीजही कडाडेल असा अंदाज वर्तवण्यात आला आहे. राजस्थान रॉयल्स आणि मुंबई इंडियन्स सामन्यावेळीच असं घडण्याची शक्यता आहे. त्यामुळे हा सामना सुरळीत पार पाडण्यात अडचणी येऊ शकतो. हा सामना थांबवण्याची वेळही येऊ शकतो. आता हा सामना पूर्ण होणार की नाही हे त्या वेळेलाच स्पष्ट होईल.

राजस्थान रॉयल्स आणि मुंबई इंडियन्सला हा सामना खूपच महत्त्वाचा आहे. कारण या सामन्यातील निकालामुळे गुणतालिकेवर प्रभाव पडणार आहे. मुंबई इंडियन्सने मागच्या सामन्यात पराभवाचं तोंड पाहिलं आहे. त्यामुळे हा सामना काहीही करून जिंकावं लागेल. तसेच राजस्थान रॉयल्स हा सामना जिंकून टॉप 4 मध्ये राहण्याचा प्रयत्न करेल. हा सामना रद्द झाला तर दोन्ही संघांना प्रत्येकी 1-1 गुण दिला जाईल. राजस्थान रॉयल्स या गुणासह पहिलं स्थान गाठेल. पण पुढे जाऊन एक गुण कमी मिळाल्याने चुरस वाढेल. तर मुंबईच्या हातून एक गुण गेल्याने गुणतालिकेत आरसीबी, दिल्ली आणि राजस्थान रॉयल्सची बरोबरी करण्याची संधी जाईल.

Follow Us
अंधेरीत भरधाव BEST बसच्या अपघाताचा थरार, अनेक वाहनांना उडवलं
Andheri Accident | अंधेरीत भरधाव BEST बसच्या अपघाताचा थरार, अनेक वाहनांना उडवलं, रिक्षांचा चुराडा
अजित पवार विमान दुर्घटना : CBI चौकशीवर फडणवीसांनी दिली सविस्तर माहिती
Devendra Fadnavis on Ajit Pawar Accident | अजित पवार विमान दुर्घटना : CBI चौकशीवर CM फडणवीसांनी दिली सविस्तर माहिती
कर्जमाफीने शेतकरी श्रीमंत होत नाही, पण... फडणवीस नेमकं काय म्हणाले?
Devendra Fadnavis | कर्जमाफीने शेतकरी श्रीमंत होत नाही, पण... मुख्यमंत्री फडणवीस नेमकं काय म्हणाले?
किती पोटदुखी... किती जळजळ... शरद पवार भेटीवरून शिंदेंचा ठाकरे गटावर...
किती पोटदुखी... किती जळजळ... शरद पवार भेटीवरून उपमुख्यमंत्री शिंदेंचा ठाकरे गटावर जोरदार हल्लाबोल
रमेश म्हात्रेंना मोठा झटका! कोर्टाने सुनावली पोलीस कोठडी; पक्षातूनही..
Ramesh Mhatre | डॉक्टर मारहाण प्रकरणात रमेश म्हात्रेंना मोठा झटका! कोर्टाने सुनावली पोलीस कोठडी; पक्षातूनही कारवाईचे संकेत?
सावरकरांना भारतरत्न देण्यावरून मुनगंटीवार संतापले, सरकारला घरचा आहेर
Sudhir Mungantiwar | सत्ता आली की वचन विसरलात?; सावरकरांना भारतरत्न देण्यावरून मुनगंटीवार संतापले, सरकारला घरचा आहेर
खाजेची पावडर टाकून वारकऱ्यांचे मोबाईल, पैसे लंपास; वारकऱ्याला अश्रू...
Pandharpur Wari Chori News | पालखी सोहळ्यात चोरट्यांचा सुळसुळाट! खाजेची पावडर टाकून वारकऱ्यांचे मोबाईल, पैसे लंपास; वारकऱ्याला अश्रू अनावर
सौरव सोनवणेला अटक करा, MCOCA लावा... म्हणत जनसागर रस्त्यावर
Beed kej Morcha | विलास घुले हत्या प्रकरण पेटलं! सौरव सोनवणेला अटक करा, MCOCA लावा... म्हणत जनसागर रस्त्यावर
5 कोटींचं आमिष अन् पक्षांतराची चर्चा! नाशिकच्या राजकारणात काय घडतंय?
5 कोटींचं आमिष अन् पक्षांतराची चर्चा! नाशिकच्या राजकारणात मोठं काय घडतंय? चर्चांना वेग
नगरसेवक कुठेही जाणार नाही, जे जातील... ठाकरे गटाची मोठी पोलखोल
Nashik Thackeray Nagarsevak | नगरसेवक कुठेही जाणार नाही, जे जातील त्यांना... ठाकरे गटाची पत्रकार परिषदेत मोठी पोलखोल