AQI
TV9 Network
User
Sign In

By signing in or creating an account, you agree with Associated Broadcasting Company's Terms & Conditions and Privacy Policy.

RCB vs SRH : विराटच्या निशाण्यावर पहिल्याच सामन्यात मोठा रेकॉर्ड, आशिया किंग होण्याची संधी, किती धावांची गरज?

Virat Kohli RCB vs SRH IPL 2026 : विराट कोहली याच्या नावावर आंतरराष्ट्रीय क्रिकेटसह टी 20 फॉर्मेटमध्ये असंख्य विक्रम आहेत. आता विराट आणखी एक रेकॉर्ड ब्रेक करण्यासाठी सज्ज झाला आहे.

RCB vs SRH : विराटच्या निशाण्यावर पहिल्याच सामन्यात मोठा रेकॉर्ड, आशिया किंग होण्याची संधी, किती धावांची गरज?
Virat Kohli Rcb IplImage Credit source: PTI
Sanjay patil
Sanjay patil | Updated on: Mar 28, 2026 | 5:54 PM
Share

जगातील सर्वात लोकप्रिय तसेच सर्वात श्रीमंत टी 20 लीग असा लौकीक असलेल्या आयपीएल स्पर्धेतील 19 व्या मोसमाला शनिवार 28 मार्चपासून सुरुवात होत आहे. या हंगामातील सलामीच्या सामन्यात गतविजेता रॉयल चॅलेंजर्स बंगळुरु विरुद्ध सनरायजर्स हैदराबाद अशी लढत होणार आहे. एम चिन्नास्वामी स्टेडियम या आरसीबीच्या घरच्या मैदानात सामन्याला सुरुवात होणार आहे. त्यामुळे आरसीबीला फुल्ल सपोर्ट असणार आहे. रजत पाटीदार याच्या नेतृत्वात आरसीबी 19 व्या मोसमात खेळणार आहे. तर इशान किशन सनरायजर्स हैदराबादच्या नेतृत्वाची धुरा सांभाळणार आहे. या सामन्यात आरसीबीचा अनुभवी फलंदाज विराट कोहली याच्याकडे साऱ्यांचं लक्ष असणार आहे.

विराटच्या निशाण्यावर मोठा विक्रम

विराटला या पहिल्याच सामन्यात मोठा विक्रम करण्याची संधी आहे. विराटला टी 20 क्रिकेटमध्ये सर्वाधिक धावांबाबत नंबर 1 आशियाई फलंदाज होण्याची मोठी संधी आहे. सध्या हा विक्रम पाकिस्तानचा माजी ऑलराउंडर शोएब मलिक याच्या नावावर आहे. मलिकला मागे टाकण्यासाठी विराटला किती धावांची गरज आहे? हे आपण जाणून घेऊयात.

विराटला 29 धावांची गरज

शोएब मलिकला मागे टाकण्यासाठी विराटला फक्त नि फक्त 29 धावांची गरज आहे. विराट बॅटिंगला लागला की किमान आणि सहज अर्धशतक करतो हे जगजाहीर आहे. विराटच्या नावावर आयपीएलमध्ये सर्वाधिक अर्धशतकांचा विक्रम आहे. त्यामुळे विराटसाठी 29 धावा करणं फार मोठा विषय नाही. त्यामुळे विराट सलामीच्या सामन्यात 29 धावांसह मलिकला मागे टाकण्यात यशस्वी ठरतो का हे पाहणं औत्सुक्याचं ठरणार आहे.

विराट आणि मलिकची टी 20 कारकीर्द

विराट कोहली याने आतापर्यंत 414 टी 20 सामने खेळले आहेत. विराटने या 414 सामन्यांत 41.92 च्या सरासरीने आणि 134.67 च्या स्ट्राईक रेटने 13 हजार 543 धावा केल्या आहेत. विराटने या दरम्यान 105 अर्धशतकं आणि 9 शतकं झळकावली आहेत.

मलिक किती धावांचा मालिक?

तसेच शोएब मलिक याने 557 टी 20 सामने खेळले आहेत. मलिकने या दरम्यान 13 हजार 571 धावा केल्या आहेत. मलिकने 83 अर्धशतकं लगावली आहेत.

सर्वाधिक टी 20 धावा कुणाच्या नावावर?

दरम्यान टी 20 क्रिकेटमध्ये सर्वाधिक धावांचा वर्ल्ड रेकॉर्ड हा वेस्ट इंडिजचा विस्फोटक माजी फलंदाज ख्रिस गेल याच्या नावावर आहे. ख्रिस गेल याने टी 20 कारकीर्दीतील 463 सामन्यांमध्ये तब्बल 14 हजार 562 धावा केल्या आहेत. तसेच गेलने या दरम्यान तब्बल 22 शतकं लगावली आहेत. गेलला टी 20 क्रिकेटमधून निवृत्त होऊन काही वर्ष झालीत. मात्र त्यानंतरही गेल याच्या नावावर सर्वाधिक टी 20 धावांचा विक्रम कायम आहे.

Follow Us
अमृता फडणवीसांनी गायलं गाणं, प्रवीण दरेकरांनी धरला ठेका; बोरिवलीतील...
अमृता फडणवीसांनी गायलं गाणं, प्रवीण दरेकरांनी धरला ठेका; बोरिवलीतील गरबा उत्सवात रंगत!
डॉनाल्ड ट्रम्प यांचा मोठा निर्णय, रशियन तेलाबाबत अमेरिकेची भूमिका...
डॉनाल्ड ट्रम्प यांचा मोठा निर्णय, रशियन तेलाबाबत अमेरिकेची भूमिका बदलली? आता भारतात...
प्रतापगडावर 367 मशालींचा झगमगाट! शिवरायांच्या शौर्याचा जागर, मशाल...
प्रतापगडावर 367 मशालींचा झगमगाट! शिवरायांच्या शौर्याचा जागर, मशाल महोत्सवाने किल्ला उजळला
मोठी बातमी! भाजपचे ज्येष्ठ नेते लालकृष्ण अडवाणी अपोलो रुग्णालयात दाखल
मोठी बातमी! भाजपचे ज्येष्ठ नेते लालकृष्ण अडवाणी अपोलो रुग्णालयात दाखल
अखेर व्हिडीओ समोर आलाच! पुण्यात भाजपसोबतच्या बैठकीत राष्ट्रवादी...
अखेर व्हिडीओ समोर आलाच! पुण्यात भाजपसोबतच्या बैठकीत राष्ट्रवादी नेत्याकडून तीव्र खदखद व्यक्त
दिल्लीत वातावरण तापलं! अभिजीत दीपकेंना पुन्हा ताब्यात घेतलं; दिल्ली...
दिल्लीत वातावरण तापलं! अभिजीत दीपकेंना पुन्हा ताब्यात घेतलं; दिल्ली पोलिसांनी CJP चं आंदोलन सुरु होण्याआधीच...
ठाकरे गटाला पुन्हा मोठा धक्का! एकच कारण अन् बड्या नेत्यानं सोडला पक्ष,
ठाकरे गटाला पुन्हा मोठा धक्का! एकच कारण अन् बड्या नेत्यानं सोडला पक्ष, उपमुख्यमंत्री शिंदेंच्या उपस्थितीत पक्ष प्रवेश
प्रभादेवीच्या भवानीमाता मंदिरात नवरात्रोत्सवाचा उत्साह; 58 वर्षांची...
प्रभादेवीच्या भवानीमाता मंदिरात नवरात्रोत्सवाचा उत्साह; 58 वर्षांची परंपरा आजही कायम!
गोपीचंद पडळकर यांना मोठा दिलासा, मध्यवर्ती बँकेचा निवडणूक अर्ज वैध...
गोपीचंद पडळकर यांना मोठा दिलासा, मध्यवर्ती बँकेचा निवडणूक अर्ज वैध, न्यायालयाचा मोठा निर्णय
अभिजीत दीपकेंना नोटीस; दिल्लीतील करोल बाग परिसरात आर्ध्या तासापासून...
अभिजीत दीपकेंना नोटीस; दिल्लीतील करोल बाग परिसरात आर्ध्या तासापासून...