AQI
TV9 Network
User
Sign In

By signing in or creating an account, you agree with Associated Broadcasting Company's Terms & Conditions and Privacy Policy.

IPL Media Rights Live updates: आता दोन पॅकेजसाठी लढाई, लिलावाचा दुसरा दिवस संपला

| Updated on: Jun 13, 2022 | 7:18 PM
Share

IPL Media Rights Auction Day 2 live updates: टीवी आणि डिजिटल राइट्सच्या लढाईचा शेवट काय असेल? समोर आली एक मोठी अपडेट

IPL Media Rights Live updates: आता दोन पॅकेजसाठी लढाई, लिलावाचा दुसरा दिवस संपला
Image Credit source: ipl

IPL च्या पुढच्या पाच सीजनसाठी मीडिया राइट्सच्या (IPL Media Rights) लिलावाचा आज दुसरा दिवस होता. आयपीएलच्या टेलीविजन आणि डिजिटल अधिकारांची विक्री करण्यात आली आहे. टीवी राइट्सची प्रति मॅच 57.50 कोटी आणि डिजिटल राइट्सची प्रति मॅच 48 कोटी रुपयांना पुढच्या पाच वर्षांसाठी विक्री करण्यात आली आहे. कोणी हे राइट्स विकत घेतलेत, त्याची अधिकृत घोषणा अजून झालेली नाही. टीवी राइट्सची बेस प्राइस 49 कोटी रुपये होती. डिजिटल राइट्सची बेस प्राइस 33 कोटी रुपये होती. दुसऱ्यादिवशी टीवी राइट्सची किंमत पहिल्या दिवसाच्या तुलनेत फक्त 50 लाख रुपयाने जास्त वाढली.

LIVE NEWS & UPDATES

The liveblog has ended.
  • 13 Jun 2022 06:21 PM (IST)

    लिलावाचा दुसरा दिवस संपला

    IPL मीडिया राइट्स लिलावाचा दुसरा दिवस संपला आहे. पॅकेज सी साठी बिडिंग सुरु आहे. उद्या यावर पुन्हा बोली प्रक्रिया सुरु होईल. सकाळी 11 वाजता पॅकेज सी साठी लिलाव प्रक्रिया सुरु होईल. पॅकेज सी साठी प्रतिसामना किंमत 17 कोटीच्या पुढे गेली आहे.

  • 13 Jun 2022 05:10 PM (IST)

    वेगवेगळ्या चॅनल्सवर दिसणार IPL सामने, जाणून घ्या लिलावाचं संपूर्ण गणित

    पाच वर्ष आयपीएल सामने वेगवेगळ्या प्लॅटफॉर्मवर पहायला मिळतील. आतापर्यंत स्टार स्पोर्ट्सवर सामन्यांचे प्रसारण व्हायचे. याच चॅनलचंन डिजिटल प्लॅटफॉर्म हॉटस्टारवर ऑनलाइन स्ट्रीमिंग व्हायचं. बदल इथे क्लिक करुन जाणून घ्या.

  • 13 Jun 2022 04:25 PM (IST)

    हजारो कोटींच्या व्यवहारात कोणी मारली बाजी?

    2023-27 अशा पाच वर्षांसाठी सामन्याचे प्रसारण अधिकार दिले जाणार आहेत. हजारो कोटींच्या व्यवहारात कोणी बाजी मारली ते इथे क्लिक करुन जाणून घ्या 

    IPL 2

    IPL

  • 13 Jun 2022 04:00 PM (IST)

    पॅकेज सी आणि डी सुद्धा

    पॅकेज सी आणि डी चा लिलाव बाकी आहे. पॅकेज सी मध्ये प्लेऑफसह लीगच्या 18 सामन्यातील नॉन एक्सक्लूसिव राइट्स आहेत. पॅकेड डी मध्ये भारतीय उपखंडाबाहेरील प्रसारण अधिकार आहेत.

  • 13 Jun 2022 04:00 PM (IST)

    इंग्लिश प्रीमियर लीगला टाकलं मागे

    एक मॅचमधून होणाऱ्या कमाईत बीसीसीआयने लोकप्रिय फुटबॉल लीग इंग्लिशन प्रीमियर लीगला मागे टाकलं आहे.

  • 13 Jun 2022 03:59 PM (IST)

    पॅकेज ए आणि पॅकेज बी असे दोन प्रकार

    पॅकेज ए भारतातील टीवी राइट्ससाठी आहे तर पॅकेज बी ऑनलाइन स्ट्रीमिंगसाठी आहे. पॅकेज ए ची किंमत 23,275 कोटी रुपये तर पॅकेज बी ची एकूण किंमत 19,680 कोटी रुपये आहे.

  • 13 Jun 2022 03:44 PM (IST)

    सोनी आणि रिलायन्सने बाजी मारली

    44 हजार कोटी रुपयात टीवी आणि डिजिटल राइट्सची विक्री झाली असून सोनी आणि रिलायन्सने बाजी मारली आहे.

  • 13 Jun 2022 02:41 PM (IST)

    टीवी आणि डिजिटल राइट्सची एकूण बोली 43 हजार कोटीच्या पुढे

    एकूण बोली 43,255 कोटी आहे. टीव्ही पॅकेज 23,575 कोटी रुपयांना आणि डिजिटल पॅकेज 19,680 कोटी रुपयांना विकले गेले.

  • 13 Jun 2022 02:40 PM (IST)

    BCCI वर अक्षरक्ष: पैशांचा पाऊस

    टीवी राइट्सची प्रति मॅच 57.50 कोटी आणि डिजिटल राइट्सची प्रति मॅच 48 कोटी रुपयांना पुढच्या पाच वर्षांसाठी विक्री करण्यात आली आहे.

  • 13 Jun 2022 02:33 PM (IST)

    Sony ने आयपीएलचे टीव्ही अधिकार विकत घेतले?

    IPL चे टीवी राइट्सचे अधिकार सोनी नेटवर्कने विकत घेतल्याचं वृत्त आहे. याची अधिकृत घोषणा होणं, अजून बाकी आहे.

Published On - Jun 13,2022 2:32 PM

Follow Us
कर्जमाफीवर फडणवीसांचा मोठा खुलासा; ती अट का ठेवली? अखेर सांगितलं कारण!
Devendra Fadnavis On Shetkari Karjmafi | कर्जमाफीवर फडणवीसांचा मोठा खुलासा; ती अट का ठेवली? अखेर सांगितलं कारण!
काँग्रेस म्हणजे बुडतं जहाज ! फडणवीसांचा घणाघात; बेगानी शादी में.....
काँग्रेस म्हणजे बुडतं जहाज ! फडणवीसांचा घणाघात; बेगानी शादी में अब्दुल्ला दिवाना म्हणत संजय राऊतांनाही खोचक टोला
भारत चौथ्या क्रमांकावर; फडणवीसांनी उघड केली विकासाची आकडेवारी
Devendra Fadnavis UNCUT | मोदींच्या 12 वर्षांचा महाअहवाल! भारत चौथ्या क्रमांकावर; फडणवीसांनी उघड केली विकासाची आकडेवारी
भारताची आर्थिक महासत्ता बनण्याकडे झेप! फडणवीसांनी मांडले....
Devendra Fadnavis | भारताची आर्थिक महासत्ता बनण्याकडे झेप! फडणवीसांनी मांडले मोदी सरकारच्या 12 वर्षांचे रिपोर्ट कार्ड
पवारांचा एल्गार! पोलिसांनी परवानगी नाकारली तरी अन्नत्याग आंदोलनावर ठाम
Rohit Pawar | रोहित पवारांचा एल्गार! पोलिसांनी परवानगी नाकारली तरी अन्नत्याग आंदोलनावर ठाम
इकडे शरद पवार गटाच्या विलिनीकरणाच्या चर्चा, तिकडे राऊत म्हणाले.....
इकडे शरद पवार गटाच्या विलिनीकरणाच्या चर्चा, तिकडे राऊत म्हणाले, पश्चात्ताप झाला असेल तर या... रोख कुणाकडे?
काँग्रेसच्या झेंड्याखाली या...राऊतांच्या एका वक्तव्याने चर्चांना उधाण
Sanjay Raut UNCUT | काँग्रेसच्या झेंड्याखाली या... संजय राऊतांच्या त्या एका वक्तव्याने राजकीय वर्तुळात चर्चांना उधाण
मुंबईकरांनो सावधान! फक्त महिनाभराचं पाणी उरलं; तलावांमध्ये केवळ....
मुंबईकरांनो सावधान! फक्त महिनाभराचं पाणी उरलं; तलावांमध्ये केवळ एवढे टक्के साठा...
विधान परिषदेआधी पवारांच्या गोटात भूकंप; 3 आमदारांनी घेतला मोठा निर्णय
tv9 Marathi Special Report | विधान परिषदेआधी पवारांच्या गोटात भूकंप; 3 आमदारांनी घेतला मोठा निर्णय! राजकारणातील सर्वात मोठा ट्विस्ट
राष्ट्रवादी काँग्रेस काँग्रेसमध्ये विलीन होणार?
Nana Patole On NCP Merger | राष्ट्रवादी काँग्रेस काँग्रेसमध्ये विलीन होणार? नाना पटोलेंच्या एका वक्तव्याने महाराष्ट्राच्या राजकारणात खळबळ!