IPL 2024 Points Table:IPL 2024 Points Table: राजस्थानच ‘रॉयल्स’, पॉइंट्स टेबलमध्ये नंबर 1
IPL Points Table 2024 31st Match : राजस्थान रॉयल्सने अखेरच्या बॉलवर विजय मिळवला. राजस्थानने केकेआरवर 2 विकेट्सने मात केली आणि अव्वल स्थान कायम राखलं.

आयपीएलच्या 17 व्या मोसमातील 31 व्या सामन्यात राजस्थान रॉयल्सने कोलकाता नाईट रायडर्सवर 2 विकेट्सने थरारक विजय मिळवला. कोलकाताने विजयासाठी दिलेल्या 224 धावांचं आव्हान हे राजस्थानने शेवटच्या बॉलवर पूर्ण केलं. जॉस बटलर हा राजस्थानच्या विजयाचा हिरो ठरला. जास बटलरने शेवटच्या बॉलवर एक धावेची गरज असताना विजय मिळवून दिला. जॉस बटलर याने नाबाद 107 धावांची खेळी केली. राजस्थानचा हा पाचवा विजय ठरला. कोलकाता विरुद्ध राजस्थान सामन्यानंतर पॉइंट्स टेबलमध्ये कोण कुठे आहे? हे जाणून घेऊयात.
जॉस बटलर याने राजस्थानकडून सर्वाधिक धावा केल्या. जॉसने 60 बॉलमध्ये 9 चौकार आणि 6 सिक्सच्या मदतीने नाबाद 107 धावांची खेळी केली. बटलरने या खेळीसह आयपीएलमध्ये सर्वाधिक शतकांच्या बाबतीत ख्रिस गेल याला मागे टाकलं. आता बटलर आयपीएलमध्ये सर्वाधिक शतकं करणारा दुसरा फलंदाज ठरला. हा विक्रम विराट कोहली याच्या नावावर आहे. तर बटलर व्यतिरिक्त राजस्थानकडून यशस्वी जयस्वाल 19, कॅप्टन संजू सॅमसन 12, रियान पराग 34, रोवमेन पॉवेल 26, आर अश्विन 8 आणि ध्रुव जुरेल याने 2 धावा केल्या. शिमरॉन हेटमायर आणि ट्रेंट बोल्ट दोघेही झिरोवर आऊट झाले. तर आवेश खान झिरोवर नाबाद परतला.
राजस्थानने या विजयासह पॉइंट्स टेबलमधील अव्वल स्थान आणखी मजबूत केलं आहे. राजस्थानने या विजयासह प्लेऑफच्या दिशेने एक पाऊल पुढे टाकलं आहे. राजस्थानने खेळलेल्या 6 पैकी 5 सामन्यात विजय मिळवला आहे. राजस्थानचा नेट रनरेट हा 0.677 इतका आहे. तर कोलकाता नाईट रायडर्सही पराभवानंतरही दुसऱ्या स्थानी कायम आहे.
कोलकाताचा सहाव्या सामन्यातील हा दुसरा पराभव ठरला. कोलकाता आणि चेन्नई या दोन्ही संघांनी 6 पैकी 4 सामने जिंकले आहेत. दोघांच्या खात्यात 8 पॉइंट्स आहे. मात्र केकेआरचा नेट रनरेट हा चेन्नईपेक्षा सरस आहे. त्यामुळे केकेआर पराभवानंतरही दुसऱ्या स्थानी कायम आहे. केकेआरचा नेट रनरेट हा 1.399 इतका आहे. तर चेन्नईचा हाच नेट रनरेट 0.726 असा आहे.
राजस्थान पहिल्या स्थानी कायम
12 POINTS FOR RAJASTHAN FROM 7 GAMES. 🤯
– RR IS MOVING TO PLAYOFFS. pic.twitter.com/iOHfoo8TPK
— Johns. (@CricCrazyJohns) April 16, 2024
कोलकाता नाईट रायडर्स प्लेइंग ईलेव्हन : श्रेयस अय्यर (कॅप्टन), फिलिप सॉल्ट (विकेटकीपर), सुनील नारायण, आंग्रिश रघुवंशी, व्यंकटेश अय्यर, रिंकू सिंग, आंद्रे रसेल, रमणदीप सिंग, मिचेल स्टार्क, वरुण चक्रवर्ती आणि हर्षित राणा.
राजस्थान रॉयल्स प्लेइंग ईलेव्हन : संजू सॅमसन (कॅप्टन आणि विकेटकीपर), यशस्वी जयस्वाल, रियान पराग, ध्रुव जुरेल, शिमरॉन हेटमायर, रोवमन पॉवेल, रविचंद्रन अश्विन, ट्रेंट बोल्ट, आवेश खान, कुलदीप सेन आणि युझवेंद्र चहल.