T20I World Cup स्पर्धेसाठी आणखी एक संघाची घोषणा, जसप्रीतची निवड, मुंबईत सामना केव्हा?
Icc T20i World Cup 2026 Italy squad : इटली क्रिकेट संघाचे टी 20i वर्ल्ड कप स्पर्धेतील 4 पैकी 3 सामने हे कोलकातातील इडन गार्डन्स स्टेडियममध्ये आयोजित करण्यात आले आहेत. तर एकमेव सामना हा मुंबईतील वानखेडे स्टेडियममध्ये होणार आहे.

बहुप्रतिक्षित आयसीसी टी 20I वर्ल्ड कप 2026 स्पर्धेला आता काही दिवसांचा अवधी बाकी आहे. भारतात आणि श्रीलंकेत होणाऱ्या या स्पर्धेसाठी क्रिकेट चाहते उत्सूक आहेत. या दहाव्या आयसीसी टी 20I वर्ल्ड कप स्पर्धेत एकूण 20 संघ मैदानात उतरणार आहेत. या 20 संघांची 5-5 नुसार 4 गटात विभागणी करण्यात आली आहे. तसेच या स्पर्धेत सहभागी होणाऱ्या 20 पैकी बहुतांश देशांकडून क्रिकेट संघांची घोषणा करण्यात आली आहे. त्यानंतर आता इटलीचा 15 सदस्यीय संघ जाहीर करण्यात आला आहे. आयसीसीने प्रसिद्धीपत्रकाद्वारे याबाबतची माहिती दिली आहे.
इटलीचं वर्ल्ड कप स्पर्धेत पदार्पण
इटलीची टी 20i वर्ल्ड कप स्पर्धेत खेळण्याची यंदाची पहिलीच वेळ ठरणार आहे. इटलीने युरोप क्वालिफायर स्पर्धेत स्वत:ला सिद्ध करुन वर्ल्ड कप स्पर्धेचं तिकीट मिळवलं. इटलीने या स्पर्धेत स्कॉटलंड आणि गर्न्सीवर विजय मिळवला. इटली युरोप क्वालिफायर स्पर्धेतून वर्ल्ड कप स्पर्धेसाठी पात्र ठरणारी दुसरी टीम ठरली. इटलीआधी या गटातून नेदरलँड्स वर्ल्ड कप स्पर्धेसाठी पात्र ठरली.
इटलीचं नेतृत्व कुणाकडे?
इटली क्रिकेट टीमच्या नेतृत्वाची धुरा ही वेन मॅडसेन याला देण्यात आली आहे. तसेच टीम इंडियाप्रमाणे इटलीच्या संघातही जसप्रीत आहे. मात्र हा जसप्रीत सिंह आहे. इटली या पदार्पणातील टी 20i वर्ल्ड कप स्पर्धेत कशी कामगिरी करते याकडे क्रिकेट चाहत्यांचं लक्ष असणार आहे.
इटली कोणत्या गटात?
दरम्यान इटलीचा या स्पर्धेसाठी सी ग्रुपमध्ये समावेश करण्यात आला आहे. इटली व्यतिरिक्त या गटात वेस्ट इंडिज, नेपाळ, बांगलादेश आणि आणि इंग्लंड या 4 संघांचा समावेश आहे.
इटली आणि टी 20i वर्ल्ड कप
Italy have announced squad for their first-ever #T20WorldCup appearance 👊https://t.co/QAL4ZWCMxs
— ICC (@ICC) January 17, 2026
इटलीच्या सामन्यांचं वेळापत्रक
- विरुद्ध बांगलादेश, 9 फेब्रुवारी, इडन गार्डन्स, कोलकाता
- विरुद्ध नेपाळ, 12 फेब्रुवारी, वानखेडे स्टेडियम, मुंबई
- विरुद्ध इंग्लंड, 16 फेब्रुवारी, इडन गार्डन्स, कोलकाता
- विरुद्ध विंडीज, 19 फेब्रुवारी, इडन गार्डन्स, कोलकाता
आयसीसी टी 20i वर्ल्ड कप 2026 स्पर्धेसाठी इटली क्रिकेट टीम : वेन मॅडसेन (कर्णधार), मार्कस कॅम्पोपियानो, जियान पिएरो मीडे, झैन अली, अली हसन, क्रिशन जॉर्ज, हॅरी मॅनेन्टी, अँथनी मोस्का, जस्टिन मोस्का, सय्यद नक्वी, बेंजामिन मॅनेन्ती, जसप्रीत सिंग, जेजे स्मट्स, ग्रँट स्टीवर्ट आणि थॉमस ड्रॅका.
