KKR vs RR Live Score, IPL 2021: राजस्थान सर्वबाद, केकेआरचा मोठा विजय, 86 धावांनी सामना घातला खिशात

KKR vs RR Live Score in Marathi: चेन्नई सुपरकिंग्स, दिल्ली कॅपिटल्स आणि आरसीबी हे संघ प्लेऑफममध्ये पोहोचले असून चौथ्या स्थानासाठी मुंबई आणि केकेआर यांच्यात सर्वाधिक चुरस आहे.

KKR vs RR Live Score, IPL 2021: राजस्थान सर्वबाद, केकेआरचा मोठा विजय, 86 धावांनी सामना घातला खिशात
राजस्थान रॉयल्स विरुद्ध कोलकाता नाईट रायडर्स

आयपीएल 2021 मधील 54 वा सामना कोलकाता नाईट रायडर्स आणि राजस्थान रॉयल्स यांच्यात शारजाहच्या मैदानावर पार पडला. प्लेऑफमध्ये चौथा संघ कोणता असेल? या प्रश्नाच्या उत्तरासाठी हा सामना अत्यंत महत्त्वाचा होता.  त्यात कोलकात्याने सामना मोठ्या फरकाने जिंकत प्लेऑफच्या दिशेने मोठं पाऊल टाकलं आहे. सामन्यात नाणेफेक जिंकत राजस्थान रॉयल्सने गोलंदाजी निवडली. ज्यानंतर फलंदाजीला आलेल्या केकेआरने सलामीवीर शुभमनच्या अर्धशतकासह (56), अय्यर (38) आणि त्रिपाठीच्या (21) धावांच्या जोरावर 171 धावांपर्यंत मजल मारली. ज्यानंतर राजस्थानचे सर्व फलंदाज अपयशी ठरले. केवळ राहुल तेवतियाने (44) धावा केल्या पण त्याला साथ न मिळाल्याने अखेर केकेआर 86 धावांनी विजयी झाली.

LIVE Cricket Score & Updates

The liveblog has ended.
 • 07 Oct 2021 22:57 PM (IST)

  केकेआर विजयी

  एकाबाजून राजस्थानचा डाव सांभाळणारा राहुल तेवतियाही बाद झाल्यानंतर राजस्थान पराभूत झाली आहे. 86 धावांनी केकेआर विजयी झाली आहे.

 • 07 Oct 2021 22:30 PM (IST)

  KKR vs RR: उनाडकटही बाद

  img

  लॉकी फर्ग्यूसनने तिसरा विकेट घेतला असून उनाडकट बाद झाला आहे. शाकिब अल हसनने त्याचा झेल घेतला आहे.

 • 07 Oct 2021 22:21 PM (IST)

  KKR vs RR: ख्रिसच्या रुपात सातवा गडी बाद

  img

  ख्रिस मॉरीसच्या रुपात राजस्थानचा सातवा गडी बाद झाला आहे. वरुणने त्याची विकेट घेतली आहे.

 • 07 Oct 2021 22:20 PM (IST)

  KKR vs RR: फर्ग्यूसननंतर शिवम मावीचा अटॅक

  img

  केकेआरचा गोलंदाज शिवम मावीने एकाच षटकात ग्लेन फिलिप्स आणि शिवम दुबे असे राजस्थानचे दोन गडी तंबूत धाडले आहेत.

 • 07 Oct 2021 21:59 PM (IST)

  KKR vs RR: फर्ग्यूसनचा हल्ला

  img

  केकेआरचा वेगवान गोलंदाज लॉकी फर्ग्यूसनने राजस्थानला दोन झटके दिले आहेत. लियाम आणि अनुज यांची विकेट लॉकीने घेतली आहे.

 • 07 Oct 2021 21:57 PM (IST)

  KKR vs RR: राजस्थानची खराब सुरुवात

  img

  राजस्थान संघाच्या फलंदाजीला सुरुवात होताच त्यांचे गडी बाद होण्यास सुरुवात झाली आहे. सर्वात आधी शाकिबने यशस्वीला शून्यावर बाद केले. त्यानंतर शिवम मावीने कर्णधार संजू सॅमसनला बाद केले आहे.

 • 07 Oct 2021 21:17 PM (IST)

  KKR vs RR: केकेआरची 171 धावांपर्यंत मजल

  राहुल त्रिपाठी बाद केकेआरने सलामीवीर शुभमनच्या अर्धशतकासह (56), अय्यर (38) आणि त्रिपाठीच्या (21) धावांच्या जोरावर केकेआरने 171 धावांपर्यंत मजल मारली आहे.

 • 07 Oct 2021 21:01 PM (IST)

  KKR vs RR: राहुल त्रिपाठी बाद

  img

  केकेआरचा अजून एक फलंदाज तंबूत परतला आहे. 21 धावा करुन राहुल त्रिपाठी बाद झाला असून चेतन सकारियाने त्याची विकेट घेतली आहे.

 • 07 Oct 2021 20:52 PM (IST)

  KKR vs RR: अर्धशतक होताच शुभमन बाद

  img

  अर्धशतक होताच शुभमन गिल बाद झाला आहे. 56 धावांवर असताना ख्रिस मॉरीसच्या चेंडूवर यशस्वीने त्याची कॅच घेतली आहे.

 • 07 Oct 2021 20:49 PM (IST)

  KKR vs RR: गिलचं अर्धशतक पूर्ण

  केकेआरचा सलामीवीर शुभमन गिलने पुन्हा एकदा दमदार खेळीचे प्रदर्शन घडवत अर्धशतक ठोकले आहे. सध्या त्याने राहुल त्रिपाठीसोबत केकेआरची कमान सांभाळली आहे.

 • 07 Oct 2021 20:39 PM (IST)

  KKR vs RR: नितीश राणाही बाद

  img

  केकेआरचा दुसरा गडी नितीश राणाही बाद झाला आहे. ग्लेन फिलिप्सने त्याला बाद केलं आहे.

 • 07 Oct 2021 20:27 PM (IST)

  KKR vs RR: व्यंकटेश अय्यर आऊट!

  img

  तुफान फलंदाजीने सुरुवात करणारा केकेआरचा सलामीवीर व्यंकटेश अय्यर 38 धावा करुन बाद झाला आहे. राहुल तेवतियाने त्याची विकेट घेतली आहे.

 • 07 Oct 2021 20:09 PM (IST)

  KKR vs RR: केकेआरची चांगली सुरुवात

  केकेआरच्या सलामीवीरांनी उत्तम सुरुवात करत 50 धावांचा टप्पा एकही विकेट न गमावता पार केला आहे. 8 षटकानंतर केकेआरचा स्कोर 50 आहे.

 • 07 Oct 2021 19:31 PM (IST)

  KKR vs RR: केकेआरचे सलामीवीर मैदानात

  केकेआरचे सलामीवीर शुभमन गिल आणि व्यंकटेश अय्यर फलंदाजीसाठी मैदानात आले आहेत.

 • 07 Oct 2021 19:11 PM (IST)

  KKR vs RR: राजस्थानने निवडली गोलंदाजी

  सामन्यात नाणेफेक जिंकत राजस्थान रॉयल्सचा कर्णधार संजू सॅमसनने गोलंदाजी निवडली आहे.

 • 07 Oct 2021 19:08 PM (IST)

  KKR अंतिम 11

  इयॉन मॉर्गन (कर्णधार), शुभमन गिल, व्यंकटेश अय्यर, दिनेश कार्तिक, नितीश राणा, राहुल त्रिपाठी, शाकिब अल हसन, सुनील नारायण, लॉकी फर्ग्यूसन, शिवम मावी, वरुण चक्रवर्ती.

   

   

 • 07 Oct 2021 19:08 PM (IST)

  RR अंतिम 11

  संजू सॅमसन(कर्णधार आणि यष्टीरक्षक), यशस्वी जैस्वाल, ग्लेन फिलिप्स, लियाम लिव्हिंगस्टोन, शिवम दुबे, अनुज रावत, ख्रिस मॉरीस, राहुल तेवतिया, जयदेव उनाडकट, मुस्तफिजूर रेहमान, चेतन सकारीया

   

Read Full Article

Click on your DTH Provider to Add TV9 MARATHI