IPL 2022, KKR vs SRH : कोलकाताने टॉस जिंकला, हैदराबादची पहिले गोलंदाजी, संघातील बदल जाणून घ्या…

IPL 2022, KKR vs SRH : कोलकाताने टॉस जिंकला, हैदराबादची पहिले गोलंदाजी, संघातील बदल जाणून घ्या...
KKR vs SRH

हैदराबादची स्थिती कोलकातापेक्षा थोडी चांगली आहे. पण अंतिम चारमध्ये स्थान मिळवण्यासाठी त्यांना सुद्धा संघर्ष करावा लागेल.

शुभम कुलकर्णी

|

May 14, 2022 | 7:44 PM

मुंबई : आयपीएलच्या (IPL 2022) पंधराव्या सीजनमध्ये आज कोलकाता नाईट रायडर्स (KKR) विरुद्ध सनराईजर्स हैदराबाद (SRH) सामना होतोय. कोलकाताने टॉस जिंकला असून हैदराबाद पहिले गोलंदाजी करणार आहे. कोलकाता नाइट रायडर्सचा संघ आयपीएलच्या 15 व्या सीजनमध्ये नव्या कर्णधारासह मैदानावर उतरला होता. मागच्यावर्षीचा उपविजेता संघ आपल्या जुन्या फॉर्ममध्ये दिसला नाही. आता केकेआरला आयपीएलच्या प्लेऑफमध्ये पोहोचायचे असेल तर उर्वरित सगळे सामने जिंकावेच लागतील. श्रेयस अय्यरच्या (Shreyas iyer) नेतृत्वाखाली केकेआरला दोन सामने खेळायचे आहेत. या दोन्ही सामन्यात विजयापेक्षा कमी काही चालणार नाही. हैदराबादची स्थिती कोलकातापेक्षा थोडी चांगली आहे. पण अंतिम चारमध्ये स्थान मिळवण्यासाठी त्यांना सुद्धा संघर्ष करावा लागेल. पॉइंटस टेबलमध्ये हा संघ सहाव्या स्थानावर आहे. केन विलियमसनच्या नेतृत्वाखाली खेळणाऱ्या SRH चे अजून तीन सामने बाकी आहेत. प्लेऑफसाठी दोन्ही संघांना विजय आवश्यक आहे.

 दोन्ही संघांची संभाव्य प्लेइंग 11

सनरायजर्स हैदराबाद – केन विलियमसन (कॅप्टन), अभिषेक शर्मा, राहुल त्रिपाठी, एडन मार्कराम, निकोलस पूरन, जगदीश सुचित, शशांक सिंह, कार्तिक त्यागी, भुवनेश्वर कुमार, उमरान मलिक, फजलहक फारुखी

ऐनवेळी SRH संघातील बदल

कोलकाता नाईट रायडर्स – श्रेयस अय्यर (कॅप्टन), वेंकटेश अय्यर, अजिंक्य रहाणे, नितीश राणा, आंद्रे रसेल, रिंकू सिंह, शेल्डन जॅक्सन, उमेश यादव/शिवम मावी/हर्षित राणा, सुनील नरेन, टिम साउदी, वरुण चक्रवर्ती

ऐनवेळी KKR संघातील बदल

हे सुद्धा वाचा

दोन्ही संघांना विजय आवश्यक

कोलकात्याचा आज सनरायजर्स हैदराबाद विरुद्ध सामना होणार आहे. हैदराबादची स्थिती कोलकातापेक्षा थोडी चांगली आहे. पण अंतिम चारमध्ये स्थान मिळवण्यासाठी त्यांना सुद्धा संघर्ष करावा लागेल. पॉइंटस टेबलमध्ये हा संघ सहाव्या स्थानावर आहे. केन विलियमसनच्या नेतृत्वाखाली खेळणाऱ्या SRH चे अजून तीन सामने बाकी आहेत. प्लेऑफसाठी दोन्ही संघांना विजय आवश्यक आहे.

Follow us on

Related Stories

Most Read Stories

Click on your DTH Provider to Add TV9 MARATHI

राज्य चुनें