AQI
Sign In

By signing in or creating an account, you agree with Associated Broadcasting Company's Terms & Conditions and Privacy Policy.

इंग्लंडविरुद्धच्या कसोटीपूर्वी भारताला मोठा धक्का, हेल्मेटवर चेंडू आदळून सलामीवीर गंभीर जखमी

भारतीय क्रिकेट टीम सध्या इंग्लंड दौऱ्यावर आहे. भारत आणि इंग्लंडमध्ये कसोटी सामने खेळवले जाणार आहेत. यापैकी पहिला सामना 4 ऑगस्टपासून नॉटिंघम इथे खेळला जाणार आहे.

इंग्लंडविरुद्धच्या कसोटीपूर्वी भारताला मोठा धक्का, हेल्मेटवर चेंडू आदळून सलामीवीर गंभीर जखमी
mayank jadeja aswhin
| Edited By: | Updated on: Aug 02, 2021 | 7:25 PM
Share

 लंडन : इंग्लंडविरुद्धच्या कसोटी मालिकेला सुरुवात होण्यास अवघे दोन दिवस शिल्लक असताना, टीम इंडियाला मोठा धक्का बसला आहे. भारताचा सलामीवीर मयांक अग्रवालला गंभीर दुखापत झाली आहे. त्यामुळे मयांक अग्रवाल पहिल्या कसोटीतून बाहेर पडला आहे. नेट्समध्ये सरावादरम्यान मोहम्मद सिराजने टाकलेला चेंडू  मयांक अग्रवालच्या हेल्मेटवर वेगवान चेंडू आदळला. त्यामुळे मयांक अग्रवालच्या डोक्याला दुखापत झाली आहे. भारतीय क्रिकेट बोर्ड अर्थात BCCI ने याबाबतची माहिती दिली.  (Mayank Agarwal ruled out of first Test India vs England test series he was hit on the helmet while batting during nets session )

सरावादरम्यान दुखापत 

भारतीय क्रिकेट टीम सध्या इंग्लंड दौऱ्यावर आहे. भारत आणि इंग्लंडमध्ये कसोटी सामने खेळवले जाणार आहेत. यापैकी पहिला सामना 4 ऑगस्टपासून नॉटिंगहॅम इथे खेळला जाणार आहे. या सामन्याआधी सरावादरम्यान मयांक अग्रवालच्या डोक्याला गंभीर दुखापत झाली. गोलंदाज मोहम्मद सिराजने नेटमध्ये फेकलेला चेंडू त्याच्या हेल्मेटवर लागला आणि मयांक जखमी झाला आहे. त्याला भारतीय टीमच्या डॉक्टरांच्या देखरेखीखाली ठेवण्यात आलं आहे.

बीसीसीआयचं स्पष्टीकरण 

बीसीसीआयचे सचिव जय शाह यांनी मयांक अग्रवालबाबत एक प्रेसनोट जाहीर केली आहे. यामध्ये मयांकला दुखापत झाल्याचं सांगण्यात आलं आहे. मयांकची प्रकृती स्थिर असून त्याच्यावर डॉक्टरांकडून उपचार सुरू असल्याची माहिती जय शाह यांनी दिली आहे.

भारताचे 3 खेळाडू जखमी

भारत आणि इंग्लंडदरम्यान 4 ऑगस्टपासून कसोटी सिरीजला सुरूवात होत आहे. त्याआधी भारतीय फलंदाज शुभमन गिल, ऑलराऊंडर वॉशिग्टन सुंदर आणि वेगवान गोलंदाज आवेश खान दुखापतीमुळे आधीच संघाच्या बाहेर आहेत. त्यात मयांग अग्रवालही दुखापतग्रस्त झाल्याने भारतीय टीमपुढच्या समस्या वाढल्या आहेत.

पृथ्वी शॉ आणि सूर्यकुमार यादव इंग्लंड दौऱ्यावर 

इंग्लंड विरुद्धच्या कसोटी मालिकेपूर्वी भारतीय संघात सामिल होण्यासाठी फलंदाज सूर्यकुमार यादव (Surya Kumar Yadav) आणि पृथ्वी शॉ (Prithvi Shaw) पूर्णपणे फिट झाले आहेत. दोघेही श्रीलंका दौऱ्यावर असताना त्याठिकाणी संघात कोरोनाचा शिरकाव झाल्यामुळे दोघांच्या इंग्लंडला जाण्यावर प्रश्नचिन्ह उपस्थित होत होते. मात्र आता दोन्ही खेळाडूंच्या तीन कोविड-19 चाचण्या निगेटिव्ह आल्या आहेत. त्यामुळे पुढील 24 तासांत दोघेही इंग्लंडसाठी रवाना होणार आहेत. भारतीय संघातील काही खेळाडू दुखापतग्रस्त झाल्याने शॉ आणि यादवला इंग्लंडला पाठवण्यात येणार आहे.

इंग्लंडविरुद्धच्या कसोटी मालिकेचे वेळापत्रक

पहिली कसोटी, 4 ते 8 ऑगस्ट

दुसरी कसोटी, 12 ते 16 ऑगस्ट

तिसरी कसोटी, 25 ते 29 ऑगस्ट

चौथी कसोटी, 2 ते 6 सप्टेंबर

पाचवी कसोटी, 10 ते 14 सप्टेंबर.

अशी आहे टीम इंडिया :

विराट कोहली (कर्णधार), अजिंक्य रहाणे (उपकर्णधार), रोहित शर्मा, शुबमन गिल (दुखापतीमुळे बाहेर), मयंक अगरवाल (दुखापतीमुळे बाहेर), चेतेश्वर पुजारा, हनुमा विहारी, रिषभ पंत, आर अश्विन, रवींद्र जडेजा, अक्षर पटेल, वॉशिंग्टन सुंदर (दुखापतीमुळे बाहेर), जसप्रीत बुमराह, इशांत शर्मा, मोहम्मद शमी, मोहम्मद सिराज, शार्दुल ठाकूर आणि उमेश यादव. केएल राहुल आणि वृद्धिमान साहा

राखीव खेळाडू : अभिमन्यू इश्वरन, प्रसिद्ध कृष्णा, आवेश खान ((दुखापतीमुळे बाहेर)) आणि अर्जान नाग्वासवाला.

संबंधित बातम्या 

IND vs ENG : इंग्लंड विरुद्धच्या कसोटी मालिकेपूर्वी विराटसाठी आनंदाची बातमी, संघात दोन धुरंदर फलंदाजांचे होणार आगमन

IND vs ENG : भारताविरुद्ध मालिकेसाठी इंग्लंडचा संघ जाहीर, चार दिग्गज खेळाडूंचे पुनरागमन

मुंबईत आवाज भाजपचाच... खुल्या प्रवर्गातील महिलांसाठी महापौरपद राखीव
मुंबईत आवाज भाजपचाच... खुल्या प्रवर्गातील महिलांसाठी महापौरपद राखीव.
29 महापालिकांच्या महापौरपदासाठी आरक्षण सोडत निघाली आहे
29 महापालिकांच्या महापौरपदासाठी आरक्षण सोडत निघाली आहे.
छत्रपती संभाजीनगरमध्ये भाजप–शिंदे सेनेची युती 24 तासांतच कोसळली?
छत्रपती संभाजीनगरमध्ये भाजप–शिंदे सेनेची युती 24 तासांतच कोसळली?.
ठाकरे बंधूंच्या मनोमिलनात पहिला मीठाचा खडा, कल्याण-डोंबिवलीतच सुरुंग
ठाकरे बंधूंच्या मनोमिलनात पहिला मीठाचा खडा, कल्याण-डोंबिवलीतच सुरुंग.
मुंबईचा महापौर कोण? आरक्षण सोडतीकडे राज्याचं लक्ष
मुंबईचा महापौर कोण? आरक्षण सोडतीकडे राज्याचं लक्ष.
कल्याण डोंबिवली महापालिकेत शिवसेनेचाच महापौर बसेल
कल्याण डोंबिवली महापालिकेत शिवसेनेचाच महापौर बसेल.
हर्षवर्धन पाटलांच्या कन्या घड्याळ चिन्हावर झेडपी निवडणूक लढणार?
हर्षवर्धन पाटलांच्या कन्या घड्याळ चिन्हावर झेडपी निवडणूक लढणार?.
लातूरमध्ये मोठ्या घडामोडी, ZP निवडणुकीसाठी शेवटचा दिवस असल्याने...
लातूरमध्ये मोठ्या घडामोडी, ZP निवडणुकीसाठी शेवटचा दिवस असल्याने....
KDMC मध्ये मोठा गेम? या पक्षाच्या मदतीने होणार शिंदेंचा महापौर?
KDMC मध्ये मोठा गेम? या पक्षाच्या मदतीने होणार शिंदेंचा महापौर?.
गणितं बदलू शकत नाही, पण चित्र बदलेल, संजय राऊतांचा सूचक इशारा
गणितं बदलू शकत नाही, पण चित्र बदलेल, संजय राऊतांचा सूचक इशारा.