AQI
Sign In

By signing in or creating an account, you agree with Associated Broadcasting Company's Terms & Conditions and Privacy Policy.

MLC Final 2023 : MI न्यूयॉर्कचा फायनल सामन्यामध्ये थरारक विजय, कर्णधार निकोलस पूरनची वादळी खेळी!

(MINY vs SOR MLC 2023) : MI न्यूयॉर्क आणि सिएटल ऑर्कास यांच्यामध्ये झालेल्या फायनल सामन्यात मुंबई संघाने विजय मिळवला आहे.  MI न्यूयॉर्कचा कर्णधार निकोलस पूरन याच्या १३७ धावांच्या शतकी खेळीने संघाला विजय मिळवून दिलाय.

MLC Final 2023 : MI न्यूयॉर्कचा फायनल सामन्यामध्ये थरारक विजय, कर्णधार निकोलस पूरनची वादळी खेळी!
| Updated on: Jul 31, 2023 | 11:32 AM
Share

मुंबई : मेजर क्रिकेट लीगमधील (MINY vs SOR, MLC Final 2023) MI न्यूयॉर्क आणि सिएटल ऑर्कास यांच्यामध्ये झालेल्या फायनल सामन्यात मुंबई संघाने विजय मिळवला आहे.  MI न्यूयॉर्कचा कर्णधार निकोलस पूरन याच्या १३७ धावांच्या शतकी खेळीने संघाला विजय मिळवून दिलाय. (MINY vs SOR, MLC Final 2023) प्रथम फलंदाजी करणाऱ्या सिएटल ऑर्कासने १८३ धावा केल्या होत्या. या लक्ष्याचा पाठलाग करताना MI न्यूयॉर्क संघाने १६ ओव्हरमध्येच हे आव्हान पूर्ण करत मेजर क्रिकेटच्या पहिल्या पर्वातील विजेतेपदावर नाव कोरलं आहे.

सामन्याचा संंपूर्ण आढावा:-

नाणेफेक जिंकत मुंबई संघाने प्रथम गोलंदाजी करण्याचा निर्णय घेतला होता. कर्णधार निकोलस पूरन याचा फिल्डिंगचा निर्णय बॉलर्सनी योग्य ठरवला, राशिद खान आणि ट्रेंट बोल्ट यांनी अर्धा डझन विकेट घेत संघाला यश मिळवून दिलं. सिएटल ऑर्कासचा कर्णधार क्विंटन डिकॉकने याने ८७ धावांची खेळी केली. तर शुभम राजमाने २९ आणि ड्वेन प्रिटोरियसने २१ धावांची आक्रमक खेळी केली. मात्र इतर कोणत्याही खेळाडूला मोठी धावसंख्या गाठता आली नाही. सिएटरच्या सहा खेळाडूंना दुहेरी आकडाही गाठता आला नाही.

मुंबईचा संघ या आव्हानाचा पाठलाग करण्यासाठी मैदानात उतरल्यावर संघाची अत्यंत खराब सुरूवात झाली. पहिल्याच ओव्हरमध्ये संघाला झटका बसला, स्टीव्हन टेलर याला भाोपळाही फोडू दिला नाही. त्यानंतर कर्णधार निकोलस पूरन याने संघाची धूरा खांद्यावर घेतली. पठ्ठ्याने एकट्याने चौकार आणि सिक्सर्सचा पाऊस पाडला. अवघ्या ५५ चेंडूत नाबाद १३७ धावा पूरनने केल्या, यामध्ये १० षटकार आणि १३ चौकारांचा समावेश होता.

डेवाल्ड ब्रेविस यानेही आपला दांडपट्टा चालू केला मात्र तो रनआऊट झाला. २० धावांवर असताना ब्रेविस रन आऊट झाला. शेवटी पूरन आणि टीम डेव्हिड नाबाद २० धावा करत संघाच्या विजयावर शिक्कामोर्तब केलं.

सिएटल ऑर्कास (प्लेइंग इलेव्हन): क्विंटन डी कॉक (W), नौमन अन्वर, शेहान जयसूर्या, हेनरिक क्लासेन, शुभम रांजणे, इमाद वसीम, ड्वेन प्रिटोरियस, वेन पारनेल (C), हरमीत सिंग, अँड्र्यू टाय, कॅमेरॉन गॅनन

MI न्यूयॉर्क (प्लेइंग इलेव्हन): शायन जहांगीर, डेवाल्ड ब्रेविस, स्टीव्हन टेलर, निकोलस पूरन (w/c), टिम डेव्हिड, डेव्हिड विसे, रशीद खान, हम्माद आझम, नॉथुश केंजिगे, ट्रेंट बोल्ट, जसदीप सिंग

वलसाडच्या ‘हापूस’ नामांकनाला कोकणचा कडाडून विरोध थेट...
वलसाडच्या ‘हापूस’ नामांकनाला कोकणचा कडाडून विरोध थेट....
BMC इज नॉट फॅमिली बिझनेस... भाजप नेत्याचा उद्धव ठाकरे यांना खोचक टोला
BMC इज नॉट फॅमिली बिझनेस... भाजप नेत्याचा उद्धव ठाकरे यांना खोचक टोला.
चुनाभट्टी येथे चैत्यभूमीकडे जाणाऱ्या आंबेडकर अनुयायांचा रास्ता रोको
चुनाभट्टी येथे चैत्यभूमीकडे जाणाऱ्या आंबेडकर अनुयायांचा रास्ता रोको.
तिन्ही पक्षाचा मालिक एक, अ‍ॅनाकोंडा गिळल्याशिवाय... ठाकरेंचा निशाणा
तिन्ही पक्षाचा मालिक एक, अ‍ॅनाकोंडा गिळल्याशिवाय... ठाकरेंचा निशाणा.
अमित ठाकरे यांच्या मेहुण्याच्या दिल्लीत विवाह, मोदींची सोहळ्याला हजेरी
अमित ठाकरे यांच्या मेहुण्याच्या दिल्लीत विवाह, मोदींची सोहळ्याला हजेरी.
जसं पार्थ पवारांना माफ केलं तसं तपोवनातील झाडांना...मनसेकडून थेट इशारा
जसं पार्थ पवारांना माफ केलं तसं तपोवनातील झाडांना...मनसेकडून थेट इशारा.
मालवणमध्ये फिरायला जाताय? सिंधुदुर्गात जाणाऱ्या जेटीची अवस्था बघा!
मालवणमध्ये फिरायला जाताय? सिंधुदुर्गात जाणाऱ्या जेटीची अवस्था बघा!.
नटरंगी नार.... रुपाली ठोंबरेंचा रोख कुणावर? कोणाचा घेतला खरपूस समाचार?
नटरंगी नार.... रुपाली ठोंबरेंचा रोख कुणावर? कोणाचा घेतला खरपूस समाचार?.
फडणवीसांचा दरिंदा, जल्लाद अन् गजनी उल्लेख, काँग्रेस नेता पुन्हा बरळला
फडणवीसांचा दरिंदा, जल्लाद अन् गजनी उल्लेख, काँग्रेस नेता पुन्हा बरळला.
इंदू मिल स्मारकाबाबत CM फडणवीसांची मोठी घोषणा, थेट सांगितली डेडलाईन
इंदू मिल स्मारकाबाबत CM फडणवीसांची मोठी घोषणा, थेट सांगितली डेडलाईन.