RCB vs GT : फिल सॉल्टने आधी षटकार मारला, त्यानंतर सिराजने टाकला असा चेंडू की दांड्या गुल Video
आयपीएल 2025 स्पर्धेपूर्वी पार पडलेल्या मेगा लिलावामुळे सर्वच संघाचं चित्र बदललं आहे. अनेकांना जुन्या फ्रेंचायझीपासून दूर व्हावं लागलं आहे. मोहम्मद सिराजच्या बाबतीतही असंच काहीसं झालं आहे. आरसीबीने त्याला रिटेन केलं नाही. इतकंच काय त्याच्या ना बोली लावली ना आरटीएम कार्ड वापरलं. त्यामुळे आता गुजरात टायटन्स फ्रेंचायकडून खेळत आहे.

आयपीएल 2025 स्पर्धेत बरंच काही पाहायला मिळत आहे. सर्वच संघांचा मेगा लिलावानंतर चेहरामोहरा बदलला आहे. काही खेळाडूंना फ्रेंचायझीने मेगा लिलावात घेण्यासाठी रसही दाखवला नाही. गुजरात टायटन्सने 12.25 कोटींची बोली लावत संघात घेतलं. त्यानंतर मोहम्मद सिराजच्या आयुष्यात बरंच काही घडलं. ऑस्ट्रेलिया दौऱ्यावरून परतल्यानंतर त्याला इंग्लंडविरुद्धच्या वनडे आणि चॅम्पियन्स ट्रॉफी संघातून वगळण्यात आलं. कर्णधार रोहित शर्माने तेव्हा जुन्या चेंडूने गोलंदाजी करण्यात तितका प्रभावी नसल्याचं सांगितलं होतं. त्यानंतर मोहम्मद सिराजनेही त्याला उत्तर देत आकडेवारी दाखवली होती. असं सर्व घडत असताना त्याच्या मनात कुठेतरी धगधग असावी, असं क्रीडाप्रेमींना वाटत होतं. तो त्याची क्षमता दाखवण्याचा पुरेपूर प्रयत्न करेल असंही अनेकांनी सांगितलं होतं. आयपीएल 2025 स्पर्धेत त्याला ही संधी मिळाली आणि भेदक गोलंदाजीचं दर्शन घडवलं.
मुंबई इंडियन्सविरुद्धच्या रोहित शर्माने दोन चौकार मारले. मात्र त्यानंतर चेंडूवर सिराजने त्याचा त्रिफळा उडवला आणि तंबूचा रस्ता दाखवला. या विकेटनंतर त्याने चॅम्पियन्स ट्रॉफीचा राग काढला अशी क्रीडाप्रेमींमध्ये रंगली. त्यानंतर पाळी होती ती जुन्या फ्रेंचायझीने डावलल्याची..अर्थात आरसीबीने रिलीज केल्यानंतर बरंच काही घडलं होतं. आता जुन्या फ्रेंचायझीविरुद्ध भेदक गोलंदाजी दाखवण्याची संधी होती. सिराजने ते करून दाखवलंही…संघाचं पहिलं षटक कर्णधार शुबमन गिलने सिराजकडे सोपवलं. पण या षटकात सहा धावा दिल्या. पण तिसऱ्या षटकात कमाल केली. या षटकाच्या दुसऱ्या चेंडूवर देवदत्त पडिक्कलच्या दांड्या उडवल्या.
SIRAJ MADNESS AT CHINNASWAMY 🥶 pic.twitter.com/thaSWbi3gI
— Johns. (@CricCrazyJohns) April 2, 2025
मोहम्मद सिराजचा आक्रमक अंदाज पाहून शुबमन गिलने पॉवर प्लेमध्ये त्याला तिसरं षटक सोपवलं. संघाचं हे पाचवं षटक होतं. या षटकात फिल सॉल्ट जरा आक्रमक पवित्र्यात होता. तिसऱ्या चेंडूवर उत्तुंग षटकार मारत त्याने आक्रमकता दाखवली. पण पुढच्या चेंडूवर सिराजने सॉल्टला असा चेंडू टाकली की त्याला कळलाच नाही. काही कळायच्या आत त्रिफळाचीत झाला होता. मोहम्मद सिराजने 3 षटकात 5 धावा देत दोन गडी बाद केले होते.
