कॅचेस विन मॅचेस! मुंबई इंडिअन्स यांच्या गोटात ‘या’ धाकड खेळाडूची एन्ट्री
वुन्समधील मुंबई इंडिअन्स हा सर्वात यशस्वी संघ आहे. आतापर्यंत मुंबईने पाचवेळा विजेतेपदावर नाव कोरलं आहे. वुमन्स टीमला पहिल्याच मोसमातील ट्रॉफी जिंकून देण्यासाठी संघ व्यवस्थापनाने मोठा निर्णय घेतला आहे.

WIPL 2023 : वुमन्स आयपीएलच्या पहिल्या पर्वासाठी सर्व संघ तयारी मजबूत तयारी करताना दिसत आहेत. मेन्समधील मुंबई इंडिअन्स हा सर्वात यशस्वी संघ आहे. आतापर्यंत मुंबईने पाचवेळा विजेतेपदावर नाव कोरलं आहे. (Mumbai Indians Coaching Staff) वुमन्स टीमला पहिल्याच मोसमातील ट्रॉफी जिंकून देण्यासाठी संघ व्यवस्थापनाने मोठा निर्णय घेतला आहे. मुंबईने इंग्लंडची माजी क्रिकेटपटू लिडिया ग्रीनवेची महिला संघाच्या फिल्डिंग कोच म्हणून नियुक्ती केली आहे. यासंदर्भात मुंबई इंडिअन्सने पोस्ट शेअर करत माहिती दिली आहे.
Our fielding, in safe hands! ?
Say hello to our Fielding Coach, Lydia Greenway. ? #OneFamily #MumbaiIndians #AaliRe #WPL pic.twitter.com/MFGkiphWsm
— Mumbai Indians (@mipaltan) February 22, 2023
वुमन्समध्ये मुंबई इंडिअन्स संघाच्या कोचिंग स्टाफमध्ये शार्लोट एडवर्ड्स, झुलन गोस्वामी आणि देविका पळशीकर यांचा समावेश आहे. शार्लोट एडवर्ड्स या संघाच्या मुख्य कोच, देविका पळशीकर या बॅटिंग कोच, झुलन गोस्वामी या बॉलिंग कोच आणि फिल्डिंग कोचची लिडिया ग्रीनवेकडे जबाबदारी देण्यात आली आहे.
लिडियाने 2003 ते 2016 पर्यंत इंग्लंडकडून 225 सामने खेळले. या कालावधीत तिने 4108 आंतरराष्ट्रीय धावा केल्या आणि एकूण 121 झेल घेतले. या लिलावात मुंबईने 17 खेळाडूंना खरेदी केले. कमाल मर्यादा 18 खेळाडू होती. मात्र, 12 कोटींची पर्स घेऊन लिलावात उतरलेल्या फ्रँचायझींनी आपले सर्व पैसे खर्च केले.
फ्रँचायझीने 6 परदेशी खेळाडूंचा मुंबईच्या स्क्वॉडमध्ये समावेश केला. मुंबईने इंग्लंडची अष्टपैलू खेळाडू नताली स्कायव्हर (3.2 कोटी रुपये) सर्वाधिक पैसे देत आपल्या ताफ्यात सामील करून घेतलंय. सिव्हर हा लिलावात संयुक्त दुसरी सर्वात महागडी खेळाडू आहे.
WPL 2023 साठी मुंबई इंडियन्सचा संघ: हरमनप्रीत कौर (कर्णधार), नताली सायव्हर, अमेलिया केर, पूजा वस्त्राकर, यास्तिका भाटिया, हेदर ग्रॅहम, इसाबेल वोंग, अमनजोत कौर, धारा गुजर, सायका इशाक, हेली मॅथ्यूज, क्लो ट्रायोन, हुमाइरा, प्रियानमकायरा यादव, जिंतामणी कलिता, नीलम बिश्त.
