AQI
TV9 Network
User
Sign In

By signing in or creating an account, you agree with Associated Broadcasting Company's Terms & Conditions and Privacy Policy.

MI Playoff: मुंबई इंडियन्सने 9 पैकी फक्त 2 सामन्यात विजय मिळवला, तरी प्लेऑफची संधी! कसं काय जाणून घ्या

आयपीएल 2026 स्पर्धेत 46 सामन्यांचा खेळ संपला आहे. मात्र अजूनही कोणताच संघ प्लेऑफमध्ये जागा किंवा या स्पर्धेतून आऊट झालेला नाही. तसं पाहिलं तर मुंबई इंडियन्सचं आव्हान संपुष्टात आलं आहे. पण मुंबई इंडियन्सला प्लेऑफसाठी काठावरची शक्यता आहे.

MI Playoff: मुंबई इंडियन्सने 9 पैकी फक्त 2 सामन्यात विजय मिळवला, तरी प्लेऑफची संधी! कसं काय जाणून घ्या
MI Playoff: मुंबई इंडियन्सने 9 पैकी फक्त 2 सामन्यात विजय मिळवला, तरी प्लेऑफची संधी! कसं काय जाणून घ्याImage Credit source: IPL/BCCI
| Updated on: May 04, 2026 | 5:59 PM
Share

आयपीएल 2026 स्पर्धा मुंबई इंडियन्स फ्रेंचायझी, खेळाडू आणि चाहत्यांसाठी एक वाईट स्वप्न आहे. या स्पर्धेची सुरूवात मुंबई इंडियन्सने विजयाने केली होती. मात्र त्यानंतर पराभवाची मालिका सुरू झाली. त्यानंतर एक सामना जिंकला आणि पुन्हा पराभवाची सुरूवात झाली. मुंबई इंडियन्सने आतापर्यंत 9 सामने खेळले आहे. त्यापैकी 2 सामन्यात विजय आणि 2 सामन्यात पराभवाचं तोंड पाहिलं आहे. त्यामुळे पदरात 4 गुण असून 16 गुणांचं गणित सुटणं कठीण आहे. असं असूनही मुंबई इंडियन्सला प्लेऑफची सधी आहे. मुंबई इंडियन्सला आता स्पर्धेत पाच सामने खेळायचे आहे. या पाच सामन्यातील कामगिरीवर मुंबईचं टॉप 4 मध्ये जागा मिळवण्याचं गणित सुटू शकतं. चला जाणून घेऊयात समीकरण

मुंबई इंडियन्सचं प्लेऑफचं गणित समजून घ्या

आयपीएल 2026 स्पर्धेत प्रत्येक संघ साखळी फेरीत 14 सामने खेळणार आहे. मुंबई इंडियन्सला अजून 5 सामने खेळायचे आहे. पाच सामन्यात विजय मिळवला तर 14 गुण होतील. पण पाच सामने जिंकल्यानंतर प्लेऑफचं गणित सुटणार नाही. कारण 14 गुण म्हणजे प्लेऑपचं गणित सुटलं असं नाही. कारण मागच्या पर्वात 15 गुण मिळवलेला दिल्ली कॅपिटल्स संघ स्पर्धेतून आऊट झाला होता. पण याचा अर्थ असा नाही की मुंबई इंडियन्सने 14 गुण मिळवले तर स्पर्धेतून गाशा गुंडाळावा लागेल. पाच सामन्यात विजय मिळवल्यानंतर इतर संघाच्या कामगिरीकडे लक्ष ठेवावं लागेल.

मुंबई इंडियन्सच्या खात्यात 4 गुण असून नेट रनरेट हा -0.803 आहे. आता मुंबई इंडियन्सने पाच सामने जिंकले तर 14 गुण होतील. पण नेट रनरेट सुधारणं गरजेचं आहे. पण पाच पैकी एकही सामना गमावला तर स्पर्धेतील आव्हान संपुष्टात येईल. कारण चार विजयासह 12 गुण होतील आणि स्पर्धेतील टॉप 4 संघांनी आधीच 12 गुणांची कमाई केलेली आहे. त्यामुळे प्रत्येक सामन्यात करो या मरोची लढाई असणार आहे. इतकंच काय तर नेट रनरेटही सुधारावा लागणार आहे. त्यामुळे मुंबई इंडियन्स संघ आता काठावर आहे आणि एक पराभव स्पर्धेतील आव्हान संपुष्टात आणेल.

Follow Us
PM मोदींची मिमिक्री करणाऱ्या पुलकित मणींचा नोएडा शो रद्द; आता...
PM मोदींची मिमिक्री करणाऱ्या पुलकित मणींचा नोएडा शो रद्द; आता अंडरग्राऊंड... म्हणत सोशल मीडियावर पोस्ट
7 एकर शेती करपली, पत्नीचं मंगळसूत्र गहाण ठेवून... पावसाने दगा दिल्याने
Sangali : 7 एकर शेती करपली, पत्नीचं मंगळसूत्र गहाण ठेवून... पावसाने दगा दिल्याने शेतकऱ्याच्या डोळ्यात अश्रू
राहुल गांधींनी आता... मोदींच्या मिमिक्रीवर फडणवीसांचा हल्लाबोल
Devendra Fadnavis : राहुल गांधींनी आता कॉमेडियन बनलं पाहिजे, मोदींच्या मिमिक्रीवर फडणवीसांचा जोरदार हल्लाबोल
तोफेचा गोळीबार अन् लक्ष्याचा क्षणार्धात खात्मा! भारत-अमेरिका...
US India War Practice : तोफेचा गोळीबार अन् लक्ष्याचा क्षणार्धात खात्मा! भारत-अमेरिका संयुक्त युद्धाभ्यासात भारतीय लष्कराची दमदार कामगिरी
विशेष अधिवेशनाची गरज काय? राऊत-रोहित पवारांच्या मागणीवर बन यांचं...
Navnath Ban : विशेष अधिवेशनाची गरज काय? राऊत-रोहित पवारांच्या मागणीवर नवनाथ बन यांचं प्रत्युत्तर, पुढे म्हणाले...
गंगापूर रोडवरील 50 झाडांची कत्तल भोवली; भुजबळांनी दिले महत्वाचे आदेश
Chhagan Bhujbal : गंगापूर रोडवरील 50 झाडांची कत्तल भोवली; भुजबळांनी दिले महत्वाचे आदेश
गणेशोत्सवात महागणपती मंडपात काळीज पिळवटून टाकणारी घटना
Kalachowki : गणेशोत्सवात महागणपती मंडपात काळीज पिळवटून टाकणारी घटना
हार चढवला, पण फुलांचा नाही; मुंबईच्या राजाला चक्क 101..VIDEO व्हायरल
Mumbai Cha Raja : हार चढवला, पण फुलांचा नाही; मुंबईच्या राजाला चक्क 101..VIDEO व्हायरल
दिशा सालियन प्रकरणावर संजय राऊतांची प्रतिक्रीया, म्हणाले...
Sanjay Raut | मातोश्रीवर येऊन प्रसिद्धी मिळवण्याचा प्रयत्न घाणेरडा; दिशा सालियन प्रकरणावर संजय राऊतांची प्रतिक्रीया, पुढे म्हणाले...
भरधाव BMWचा अक्षरशः चक्काचूर! मुंबईच्या कोस्टल रोडवर चालकाचं नियंत्रण
BMW Car Accident | भरधाव BMWचा अक्षरशः चक्काचूर! मुंबईच्या कोस्टल रोडवर चालकाचं नियंत्रण सुटलं अन् BMW थेट खाली कोसळली