‘मुंबई इंडियन्सला हरवणं मुश्किल ही नहीं नामुमकीन’, गावस्कर यांच्यानंतर या दिग्गजाची भविष्यवाणी!

मुंबई इंडियन्सला हरवणं मुश्किल ही नहीं नामुमकीन आहे, अशी भविष्यवाणी इंग्लंड संघाचा माजी कर्णधार मायकल वॉर्न याने केली आहे. (Mumbai Indians Winner ipl 2021 Season Michael Vaughan prediction)

  • टीव्ही 9 मराठी डिजीटल टीम
  • Published On - 18:03 PM, 8 Apr 2021
'मुंबई इंडियन्सला हरवणं मुश्किल ही नहीं नामुमकीन', गावस्कर यांच्यानंतर या दिग्गजाची भविष्यवाणी!
मुंबई इंडियन्सला हरवणं मुश्किल ही नहीं नामुमकीन, मायकल वॉन यांची भविष्यवाणी

मुंबई :  “आयपीएल 2021 च्या हंगामातील विजेता संघ पुन्हा एकदा मुंबई इंडियन्स (Mumbai Indians) असणार आहे. मुंबलाई हरवणं हे इतर संघांना फार अवघड जाणार आहे. कारण मुंबईमध्ये सगळेच तगडे खेळाडू आहेत तसंच मुंबईचा प्रत्येक खेळाडू मॅचविनर आहे, त्यामुळे यंदाही करंडकावर मुंबई इंडियन्सचं नाव असणार आहे”, अशी भविष्यवाणी इंग्लंडचे माजी कर्णधार मायकल वॉन (Michael Vaughan) यांनी केली आहे. त्यांच्याअगोदर भारताचे दिग्गज माजी खेळाडू सुनील गावस्कर (Sunil Gavaskar) यांनीही मुंबई इंडियन्स 2021 च्या पर्वातील विजेता संघ असेल, अशी भविष्यवाणी केली आहे. (Mumbai Indians Winner ipl 2021 Season Michael Vaughan prediction)

काय म्हणाले मायकल वॉन?

गतविजेता मुंबई इंडियन्सची टीम यंदाच्या आयपीएल 2021 च्या हंगामाची विजेती असेल. काही कारणामुळे जर मुंबई जिंकू शकली नाही तर यंदाची आयपीएल ट्रॉफी सनराजर्स हैदराबाद जिंकेन, अशी भविष्यवाणी मायकल वॉन यांनी केलीय.

भारत इंग्लंड मालिकेदरम्यानही वॉन यांची भविष्यवाणी

इंग्लंडचे माजी कर्णधार मायकेल वॉन सोशल मीडियावर विशेषत: ट्विटवर खूपच अ‍ॅक्टिव असतात. नुकत्याच पार पडलेल्या भारत विरुद्ध इंग्लंड यांच्यातील मालिकेदरम्यान त्यांनी भविष्यवाणी करुन दोन्ही देशांतील क्रिकेट फॅन्सला त्यांच्या ट्विटरवर बिझी ठेवलं. इंग्लंडविरुद्धची एकदिवसीय मालिका भारत 3-0 ने जिंकेल, असा अंदाज त्यांनी वर्तवला होता. भारताने सिरीज जिंकली खरी पण भारताला एक सामना गमवावा लागला. भारताने इंग्लंडला एकदिवसीय मालिकेत 2-1 ने हरवलं.

सुनील गावस्कर यांनी काय भविष्यवाणी केलीय?

या हंगामात मुंबईला हरवणं इतर संघांसाठी मोठी कठीण गोष्ट असेल. मुंबईच्या खेळाडूंचा सध्याचा फॉर्म पाहता खरंच मुंबईला हरवणं प्रतिस्पर्ध्यांना वाटतं तेवढं सोपं नाहीय. इशान किशन, सूर्यकुमार यादव, रोहित शर्मा, हार्दिक पांड्या, क्रुणाल पांड्या अशा एकापेक्षा एक खेळाडूंचा मुंबईच्या संघामध्ये भरणा आहे. त्यामुळे मुंबईला हरवणं कठीण आहे, असा दावा गावस्कर म्हणाले.

उद्यापासून आयपीएलच्या महासंग्रामाला सुरुवात

येत्या 9 एप्रिल ते 30 मे दरम्यान आयपीएल 2021 (IPL) सामने खेळवण्यात येणार आहेत. 14 व्या पर्वाचा थरार एकूण 51 दिवस रंगणार आहे. यादरम्यान 56 साखळी, 3 बाद फेरीतील सामने आणि अंतिम सामना असे एकूण 60 मॅचेस खेळवण्यात येणार आहेत. या मोसमात सर्व सामने हे त्रयस्थ ठिकाणी खेळवले जाणार आहेत. यामुळे कोणत्याही संघाला त्यांच्या होम ग्राऊंडचा फायदा मिळणार नाही. कोरोनामुळे साखळी फेरीतील सर्व सामन्यांचं आयोजन हे 6 शहरात करण्यात आलं आहे. सलामीची लढत ही मुंबई विरुद्ध बंगळुरु यांच्यात होणार आहे.

(Mumbai Indians Winner ipl 2021 Season Michael Vaughan prediction)

हे ही वाचा :

IPL 2021 : दिनेश कार्तिक तुफान फॉर्मात, सरावादरम्यान चौकार-षटकारांची बरसात, Video पाहाच…

IPL 2021 : मुंबईच्या तळपत्या ‘सूर्या’चा विराटसेनेला धोका, सलामीच्या सामन्यात आरसीबीविरुद्ध मोठी खेळी?

MI vs RCB : मुंबई इंडियन्स IPL 2021 मधला सलामीचा सामना गमावणार?