VIDEO : बाप से बेटा सवाई, मुथय्या मुरलीथरनच्या लेकाचा ‘सेम टू सेम’ पराक्रम

श्रीलंका संघाचा माजी फिरकीपटू मुथय्या मुरलीथरनला जगातील दिग्गज गोलंदाजामध्ये स्थान आहे. आजही कसोटी क्रिकेटमध्ये सर्वाधिक विकेट या त्याच्याच नावावर आहेत.

VIDEO : बाप से बेटा सवाई, मुथय्या मुरलीथरनच्या लेकाचा 'सेम टू सेम' पराक्रम
मुथय्या मुरलीथरन
Follow us
| Updated on: Jul 16, 2021 | 3:16 PM

कोलंबो : जेव्हा-जेव्हा जगातील दिग्गज क्रिकेटपटूंचा उल्लेख होईल त्यामध्ये श्रीलंकचे माजी फिरकीपटू मुथय्या मुरलीथरन (Muttiah Muralitharan) याच नाव नक्कीच घेतलं जाईल. क्रिकेटच्या इतिहासातील सर्वोत्कृष्ट फिरकीपटूंमधील एक असणाऱ्या मुरलीथरनने मोठ्या-मोठ्या दिग्गजांना आपल्या फिरकीत गुंडाळलं आहे. त्याच्या बोलिंगसोबतच बोलिंग करण्याची अ‍ॅक्शनही काय चर्चेचा विषय असायची. तो आपल्या वेगळ्या प्रकारच्या बोलिंग अ‍ॅक्शनने फलंदाजाला कोड्यात टाकायचा. आता विचार करा मुरलीथरनचा मुलगा नरेनही (Naren) वडिलांप्रमाणेच बोलिंग करत असेल तर… नरेनचा एक बोलिंग करतानाचा व्हिडीओ मुरलीथरनने स्वत: ट्विटरवर शेअर केला आहे. त्यातील त्याची हुबेहुब वडिलांप्रमाणे असणारी बोलिंग अ‍ॅक्शन पाहून सर्वचजण चकित झाले आहेत.

नरेन नेटमध्ये प्रॅक्टिस करतानाचा एक व्हिडीओ मुरलीथरनने ट्विटरवर शेअर केला आहे. ज्याच्याबाजूला त्याने स्वत:चा व्हिडीओही एडीट करुन लावला आहे. .या दोन्ही व्हिडीओला पाहून कळून येतेही दोघा बाप-बेट्यांची बोलिंग अ‍ॅक्शन अगदी हुबेहुब ‘सेम टू सेम’ आहे. या व्हिडीओला त्याने “वडिल आणि मुलाची वेळ!” असे कॅप्शनही दिले आहे.

बोलिंग अ‍ॅक्शनमुळे वादात

1996 मध्ये विश्व चषक विजेत्या संघाचा सदस्य असणारा मुरलीथरन अनेकदा त्याच्या वेगळ्या बोलिंग अ‍ॅक्शनमुळे वादात अडकायचा. अनेक फलंदाज तक्रार करत असल्याने त्याला वादांना तोंड द्यावे लागत. तरी सर्व वादांवर मात करत त्याने यशस्वी गोलंदाजी केली. टेस्ट क्रिकेटमध्ये त्याच्या नावावर सर्वाधिक विकेट्स आहेत. त्याच्या नावावर 800 विकेट्स असून त्याने देशासाठी तब्बल 133 कसोटी सामने खेळले आहेत. तर एकदिवसीय क्रिकेटचा विचार करता मुरलीथरनने 350 सामन्यांत 534 विकेट्स पटकावले आहेत. तसेच 12 टी-20 सामन्यातही मुरलीथरनने  13 विकेट्स मिळवले आहेत.

सनरायजर्स हैद्राबादचा प्रशिक्षक

मुरलीथरन सध्या आयपीएल संघ सनरायजर्स हैद्राबादचा गोलंदाजी प्रशिक्षक आहे. त्याने वर शेअर केलेल्या व्हिडीओमध्येही तो हैद्राबादच्या सराव कॅम्पमध्येच बोलिंग करताना दिसत आहे. सध्या प्रशिक्षक असणारा मुरलीथरन चेन्नई सुपरकिंगच्या संघातून गोलंदाजी ही करायचा. आता त्याचा मुलगाही हुबेहुब गोलंदाजी अ‍ॅक्शन करत असला तरी तो नेमकी कशी कामगिरी करतो हे पाहण औत्सुक्याचं राहिल.

हे ही वाचा :

शिखरची बासरी, पृथ्वी शॉचं गाणं, हा सुमधूर व्हिडीओ पाहाच

Video : कुलदीप, चहलची धमाल, दमशेराजमध्ये कोण जिंकलं? तुम्हीच पाहा

IND vs SL : पहिल्या एकदिवसीय सामन्यात ‘हा’ सलामीवीर संघाबाहेर, दुखापतीमुळे मुकणार पहिला सामना

(Sri Lankan Legend Muttiah Muralitharan Sons Bowling Action is Same as Muralitharan See Video)

Non Stop LIVE Update
वसंत मोरे वंचितच्या तिकिटावर लोकसभा निवडणूक लढणार?
वसंत मोरे वंचितच्या तिकिटावर लोकसभा निवडणूक लढणार?.
'अजित पवार गट फ्रॉड 420 गँग, फार काळ सत्तेत...', कुणाची खोचक टीका?
'अजित पवार गट फ्रॉड 420 गँग, फार काळ सत्तेत...', कुणाची खोचक टीका?.
आता नाही तर कधी ? हातकणंगलेतून लढण्याचा राहुल आवाडे यांचा निर्धार
आता नाही तर कधी ? हातकणंगलेतून लढण्याचा राहुल आवाडे यांचा निर्धार.
मराठा समाजाच्या बैठकीत हाणामारी, लाथा-बुक्क्यांनी मारहाण; बघा व्हिडीओ
मराठा समाजाच्या बैठकीत हाणामारी, लाथा-बुक्क्यांनी मारहाण; बघा व्हिडीओ.
हातकणंगलेत धैर्यशील माने यांची वाट बिकट, भाजपा कार्यकर्त्यांची नाराजी
हातकणंगलेत धैर्यशील माने यांची वाट बिकट, भाजपा कार्यकर्त्यांची नाराजी.
काँग्रेस पक्षाला आयकरकडून नवी नोटीस, इतक्या कोटींचा ठोठावला दंड
काँग्रेस पक्षाला आयकरकडून नवी नोटीस, इतक्या कोटींचा ठोठावला दंड.
तर युतीतून बाहेर पडू पण उमेदवार मागे नाही, बच्चू कडू यांचा थेट इशारा
तर युतीतून बाहेर पडू पण उमेदवार मागे नाही, बच्चू कडू यांचा थेट इशारा.
हर्षवर्धन यांची नाराजी दूर होणार का? फडणवीसांच्या सागर बंगल्यावर बैठक
हर्षवर्धन यांची नाराजी दूर होणार का? फडणवीसांच्या सागर बंगल्यावर बैठक.
गैरव्यवहाराच्या आरोपात अजितदादांनंतर प्रफुल्ल पटेलांनाही दिलासा
गैरव्यवहाराच्या आरोपात अजितदादांनंतर प्रफुल्ल पटेलांनाही दिलासा.
महायुतीत जागा वाटपावरून तिढा कायम, कुठं अंतर्गत रस्सीखेच तर पेच कायम?
महायुतीत जागा वाटपावरून तिढा कायम, कुठं अंतर्गत रस्सीखेच तर पेच कायम?.