AQI
Sign In

By signing in or creating an account, you agree with Associated Broadcasting Company's Terms & Conditions and Privacy Policy.

PAK vs BAN: बांगलादेशच्या चौघांची अर्धशतकं, पाकिस्तान विरुद्ध तिसऱ्या दिवशी चिवट प्रतिकार

Pakistan vs Bangladesh 1st Test Day 3 Stumps: बांगलादेशच्या फलंदाजांनी तिसऱ्या दिवशी पाकिस्तान विरुद्ध चिवट प्रतिकार केला. त्यामुळे पाकिस्तानला पहिला डाव घोषित करणं महागात पडणार का? असा प्रश्न या निमित्ताने उपस्थित केला जात आहे.

PAK vs BAN: बांगलादेशच्या चौघांची अर्धशतकं, पाकिस्तान विरुद्ध तिसऱ्या दिवशी चिवट प्रतिकार
pakistan vs bangladesh 1st test day 3
| Updated on: Aug 23, 2024 | 8:32 PM
Share

पाकिस्तान विरुद्ध बांगलादेश यांच्यातील पहिल्या कसोटी सामन्यातील तिसऱ्या दिवसाचा खेळ आटोपला आहे. बांगलादेशने तिसऱ्या दिवशी चिवट प्रतिकार केला आहे. पाकिस्तानने त्यांचा डाव हा दुसऱ्या दिवशी 448 धावावंर घोषित केला. बांगलादेशने प्रत्युत्तरात दुसऱ्या दिवसापर्यंत बिनबाद 27 धावा केल्या. तर बांगलादेशने तिसरा दिवस खेळून काढला. बांगलादेशने तिसऱ्या दिवसात एकूण 5 विकेट्स गमावून 289 धावा केल्या. अशाप्रकारे बांगलादेशने तिसऱ्या दिवसाचा खेळसंपेपर्यंत 92 षटकांमध्ये 5 विकेट्सच्या मोबदल्यात 316 धावा केल्या. त्यानंतरही बांगलादेश आता 132 धावांनी पिछाडीवर आहे.

बांगलादेशची बॅटिंग

बांगलादेशकडून शादमन इस्लाम, मुशफिकुर रहमान, लिटॉस दास आणि मोमिनूल हक या या चौघांनी सर्वाधिक धावा केल्या. शादमन इस्लाम याने 183 बॉलमध्ये 93 रन्स केल्या. मोमीनूल हक याने 50 धावांची खेळी केली. कॅप्टन नजमल हुसैन शांतो 16 धावा करुन माघारी परतला. शाकिब अल हसनने 15 धावांची भर घातली. तर झाकीर हसनने 12 धावा केल्या. तर मुशफिकुर आणि लिटॉन दास ही जोडी नाबाद परतली. अनुभवी मुशफिकुरने 122 चेंडूत 55 धावांची खेळी केली. तर लिटॉनने 58 चेंडूत नाबाद 52 धावा केल्या. तर पाकिस्तानकडून खुर्रम शहजादने 2 विकेट्स मिळवल्या. तर नसीम शाग आणि मोहम्मद अली आणि सॅम अय्युब या तिघांच्या खात्यात प्रत्येकी 1-1 विकेट गेली.

पाकिस्तानला डाव घोषित करणं महागात?

दरम्यान आतापर्यंत बांगलादेशने ज्या प्रकारे बॅटिंग केलीय, ते पाहता पाकिस्तानला डाव घोषित करणं महागात पडणार का? असा प्रश्न या निमित्ताने उपस्थित केला जात आहे. पाकिस्तानने सामन्यातील दुसऱ्या दिवशी 113 ओव्हरमध्ये 6 बाद 448 धावांवर डाव घोषित केला. पाकिस्तानकडून मोहम्मद रिझवान याने नाबाद 171 तर सऊद शकीलने 141 धावा केल्या. तर सॅम अय्युबने 56 धावांची अर्धशतकी खेळी केली. तर बांगलादेशसाठी शोरिफूल इस्लाम आणि हसन महमूद या दोघांनी 2-2 विकेट्स घेतल्या. तर मेहदी हसन मिराज आणि शाकिब अल हसन या दोघांनी 1-1 विकेट घेतली.

बांगलादेशची तिसऱ्या दिवशी कडवी झुंज

पाकिस्तान प्लेइंग ईलेव्हन : शान मसूद (कॅप्टन), अब्दुल्ला शफीक, सॅम अयुब, बाबर आझम, सौद शकील, मोहम्मद रिझवान (विकेटकीपर), आगा सलमान, शाहीन आफ्रिदी, नसीम शाह, खुर्रम शहजाद आणि मोहम्मद अली.

बांगलादेश प्लेइंग ईलेव्हन : नजमुल हुसेन शांतो (कर्णधार), शादमान इस्लाम, झाकीर हसन, मोमिनुल हक, मुशफिकुर रहीम, शकीब अल हसन, लिटॉन दास (विकेटकीपर), मेहदी हसन मिराझ, शोरीफुल इस्लाम, हसन महमूद आणि नाहिद राणा.

शरद पवार जे ठरवतील तेच माझ्यासाठी... सुप्रिया सुळे स्पष्टच म्हणाल्या..
शरद पवार जे ठरवतील तेच माझ्यासाठी... सुप्रिया सुळे स्पष्टच म्हणाल्या...
ठाकरेंच्या नेत्याने भाजपाच्या मुंबई अध्यक्षालाच घेरलं; बाहुली म्हणत...
ठाकरेंच्या नेत्याने भाजपाच्या मुंबई अध्यक्षालाच घेरलं; बाहुली म्हणत....
ठाकरे बंधूंची युती जाहीर...घोषणेनंतर राजकीय वर्तुळात आरोप-प्रत्यारोप
ठाकरे बंधूंची युती जाहीर...घोषणेनंतर राजकीय वर्तुळात आरोप-प्रत्यारोप.
जागावाटपाचा फॉर्म्युला फिक्स! शिंदे-चव्हाणांमध्ये 5 तास खलबतं
जागावाटपाचा फॉर्म्युला फिक्स! शिंदे-चव्हाणांमध्ये 5 तास खलबतं.
काँग्रेसचा सर्वात मोठा निर्णय, महत्त्वाच्या पक्षाशी थेट युतीची घोषणा
काँग्रेसचा सर्वात मोठा निर्णय, महत्त्वाच्या पक्षाशी थेट युतीची घोषणा.
राज ठाकरे अन् उद्धव ठाकरेंच्या युतीची घोषणा अन् मनसेला पहिला धक्का
राज ठाकरे अन् उद्धव ठाकरेंच्या युतीची घोषणा अन् मनसेला पहिला धक्का.
हे बडवे, कारकून कोण? 'लाव रे तो व्हिडीओ' म्हणत शेलारांचा ठाकरेंना सवाल
हे बडवे, कारकून कोण? 'लाव रे तो व्हिडीओ' म्हणत शेलारांचा ठाकरेंना सवाल.
नितेश राणे, प्रवीण दरेकर, प्रसाद लाड यांच्याविरोधात अटक वॉरंट जारी
नितेश राणे, प्रवीण दरेकर, प्रसाद लाड यांच्याविरोधात अटक वॉरंट जारी.
बाप, औकात अन ओम फट स्वाहा, मुंबईतील 'त्या' बॅनरनं राजकीय वर्तुळात खळबळ
बाप, औकात अन ओम फट स्वाहा, मुंबईतील 'त्या' बॅनरनं राजकीय वर्तुळात खळबळ.
ठाकरे बंधूंच्या युतीवर चित्रा वाघ यांची बोचरी टीका, बघा काय केलं ट्विट
ठाकरे बंधूंच्या युतीवर चित्रा वाघ यांची बोचरी टीका, बघा काय केलं ट्विट.