PAK vs BAN: मुशफिकुरचा पाकिस्तान विरुद्ध धमाका, 191 धावांसह रेकॉर्ड्सची रांग
Mushfiqur Rahim Pak vs Ban 1st Test: बांगलादेशचा अनुभवी फलंदाज मुशफिकुर रहमानने पाकिस्तान विरुद्ध शानदार खेळी केली. मुशफिकुरचं द्विशतक 9 धावांनी हुकलं, मात्र त्याने या खेळीसह अनेक विक्रम केले.

बांगलादेशचा अनुभवी फलंदाज मुशफिकुर रहीम याने पाकिस्तान विरूद्धच्या पहिल्या कसोटी सामन्यातील चौथ्या दिवशी 191 धावांची खेळी केली. मुशफिकुरने मैदानात चौफेर फटकेबाजी केली. मुशफिकुरचं द्विशतक अवघ्या 9 धावांनी हुकलं. मात्र त्याच्या या खेळीमुळे बांगलादेशला पाकिस्तानच्या 448 च्या प्रत्युत्तरात ऑलआऊट 565 धावा करता आल्या. मुशफिकुरमुळे बांगलादेशला 117 धावांची आघाडी घेण्यात यश आलं. मुशफिकुरने 341 चेंडूत 22 चौकार आणि 1 षटकारासह 191 धावा केल्या. मुशफिकुरने या खेळीसह अनेक विक्रम केले. मुशफिकुरने या खेळीदरम्यान अनेक रेकॉर्ड् उध्वस्त केले. मुशफिकुरने पाकिस्तानच्या गोलंदाजांची धुलाई केली.
मुशफिकुरने 200 बॉलमध्ये शतक पूर्ण केलं. मुशफिकुरच्या कसोटी कारकीर्दीतील हे 11 वं शतक ठरलं. मुशफिकुर यासह पाकिस्तान विरुद्ध शतक करणारा तिसरा बांगलादेशी फलंदाज ठरला. त्याआधी जावेद उमर (119) आणि हबीबुल बशर (108) या दोघांनी 2003 साली ही कामगिरी केली होती तसेच मुशफिकुर बांगलादेशसाठी सर्वाधिक शतकं करणारा दुसरा फलंदाज ठरला. मुशफिकुरने तमीम इक्बाल याच्या 10 शतकांचा रेकॉर्ड ब्रेक केला. बांगलादेशसाठी कसोटीत सर्वाधिक शतकांचा विक्रम हा मोमिनुल हकच्या नावे आहे. मोमिनुलने 12 शतकं लगावली आहेत. तसेच मुशफिकर परदेशात सर्वाधिक शतक करणाराही पहिलाच बांगलादेशी ठरला आहे.
मुशफिकुरने 286 बॉलमध्ये 150 धावांचा टप्पा गाठला. मुशफिकुर यासह पाकिस्तानात 150 धावा करणारा बांगलादेशचा पहिला फलंदाज ठरला. पाकिस्तानात याआधी बांगलादेशकडून जावेद उमर याने पेशावरमध्ये सर्वाधिक 119 धावा (2003) केल्या होत्या.
15 हजार आंतरराष्ट्रीय धावा
Mushfiqur Rahim reaches a monumental milestone, completing 15,000 international runs with a classy fifty against Pakistan today! 🎉
He becomes only the second Bangladeshi batter to achieve this incredible feat! 🇧🇩👏#BCB #Cricket #BDCricket #Bangladesh #PAKvBAN #WTC25 pic.twitter.com/JTl9mTA0ER
— Bangladesh Cricket (@BCBtigers) August 23, 2024
मुशफिकुरने या खेळी दरम्यान आणखी एक कारनामा केला. मुशफिकुर बांगलादेशसाठी आंतरराष्ट्रीय क्रिकेटमध्ये 15 हजार धावा करणारा एकूण दुसरा फलंदाज ठरला. मुशफिकुरआधी तमीम इक्बाल यानेच ही कामगिरी केली होती.
पाकिस्तान प्लेइंग ईलेव्हन : शान मसूद (कॅप्टन), अब्दुल्ला शफीक, सॅम अयुब, बाबर आझम, सौद शकील, मोहम्मद रिझवान (विकेटकीपर), आगा सलमान, शाहीन आफ्रिदी, नसीम शाह, खुर्रम शहजाद आणि मोहम्मद अली.
बांगलादेश प्लेइंग ईलेव्हन : नजमुल हुसेन शांतो (कर्णधार), शादमान इस्लाम, झाकीर हसन, मोमिनुल हक, मुशफिकुर रहीम, शकीब अल हसन, लिटॉन दास (विकेटकीपर), मेहदी हसन मिराझ, शोरीफुल इस्लाम, हसन महमूद आणि नाहिद राणा.
