AQI
Sign In

By signing in or creating an account, you agree with Associated Broadcasting Company's Terms & Conditions and Privacy Policy.

Asia Cup 2023 | Babar Azam याची धमाकेदार सुरुवात, नेपाळ विरुद्ध दमदार शतक

Asia Cup 2023 Pakistan Babar Azam Century | बाबर आझम याने आशिया कप स्पर्धेतील शानदार सुरुवात केली आहरे. बाबरने नेपाळ विरुद्ध खणखणीत शतक केलंय.

Asia Cup 2023 | Babar Azam याची धमाकेदार सुरुवात, नेपाळ विरुद्ध दमदार शतक
| Updated on: Aug 30, 2023 | 6:49 PM
Share

मुल्तान | पाकिस्तान क्रिकेट टीमचा कॅप्टन बाबर आझम याने आशिया कप 2023 स्पर्धेतील पहिल्याच सामन्यात शानदार सुरुवात केली आहे. बाबर आझम याने नेपाळ विरुद्धच्या सामन्यात दमदार शतक ठोकलं आहे. बाबरने 42 व्या ओव्हरच्या दुसऱ्या बॉलवर सिंगल घेत शतक पूर्ण केलं. बाबरने 109 बॉलमध्ये शतक ठोकलं. बाबरच्या वनडे कारकीर्दीतील हे 19 वं तर आंतरराष्ट्रीय कारकीर्दीतील 32 वं शतक ठरलंय. विशेष बाब म्हणजे बाबरचं नेपाळ विरुद्धचं हे पहिलंच शतक आहे.

बाबर आझमचं नेपाळ विरुद्ध शतक

बाबरची कॅप्टन्सी इनिंग

कॅप्टन बाबरने नेपाळ विरुद्धच्या या सामन्यात टॉस जिंकून बॅटिंगचा निर्णय घेतला. पाकिस्तानने पहिले 2 विकेट झटपट गमावले. मोहम्मद रिझवान हा त्याच्या हलगर्जीपणामुळे रनआऊट झाला. आघा सलमान हा देखील 5 धावा करुन माघारी परतला. मात्र त्यानंतर बाबर आझम आणि इफ्तिखार अहमद या दोघांनी पाकिस्तानचा डाव सावरला. बाबरने या दरम्यान मैदानात चौफेर फटकेबाजी केली. बाबरने अशा प्रकारे शतक पूर्ण केलं.

बाबर शतक ठोकल्यानंतर आणखी आक्रमक झाला. बाबरने नेपाळच्या गोलंदाजांना ठोकून काढला. बाबरने 100 नंतर 150 धावांचा टप्पा अवघ्या काही चेंडूमध्ये गाठला. या दरम्यान बाबर आणि इफ्तिखार या दोघांनी पाचव्या विकेटसाठी 200 धावांची भागीदारी केली. या दोघांनी केलेल्या द्विशतकी भागीदारीमुळे पाकिस्तानला 300 पार मजल मारता आली.

पाकिस्तानचा पहिला बॅट्समन

दरम्यान बाबर पाकिस्तानकडून सर्वाधिक वनडे शतकं करणारा पहिला सक्रीय आणि एकूण दुसरा बॅट्समन आहे. पाकिस्तानकडून आतापर्यंत सर्वाधिक एकदिवसीय शतकं करण्याचा बहुमान हा सईद अन्वर यांच्या नावावर आहे. तर त्यानंतर बाबरचा दुसरा क्रमांक लागतो. बाबरच्या नावावर 19 वनडे सेंच्युरीची नोंद आहे.

नेपाळ विरुद्धच्या सामन्यासाठी पाकिस्तान प्लेईंग इलेव्हन | बाबर आझम (कॅप्टन), शादाब खान (उपकर्णधार), फखर झमान, इमाम उल हक, सलमान अली आघा, इफ्तिखार अहमद, मोहम्मद रिझवान (विकेटकीपर), मोहम्मद नवाझ, नसीम शाह, शाहीन शाह आफ्रिदी आणि हरीस रौफ.

पाकिस्तान विरुद्धच्या सामन्यासाठी नेपाळ प्लेईंग इलेव्हन | रोहित पौडेल (कॅप्टन), कुशल भुरटेल, आसिफ शेख (विकेटकीपर), कुशल मल्ला, दीपेंद्र सिंह आयरी, गुलशन झा, सोमपाल कामी, करण केसी, संदीप लामिछाने आणि ललित राजबंशी.

बहरीनमध्ये जय पवार यांची हळदी, बघा दिमाखदार सोहळ्याचे फोटो
बहरीनमध्ये जय पवार यांची हळदी, बघा दिमाखदार सोहळ्याचे फोटो.
पार्थ पवारांच्या कंपनीचा 42 कोटी भरण्यास नकार, बावनकुळेंनी ठणकावलं
पार्थ पवारांच्या कंपनीचा 42 कोटी भरण्यास नकार, बावनकुळेंनी ठणकावलं.
रविंद्र चव्हाणांकडून समझोता, पण निलेश राणे तयार नाही!
रविंद्र चव्हाणांकडून समझोता, पण निलेश राणे तयार नाही!.
महायुतीतील मतभेद दूर, आगामी निवडणुका एकत्र लढणार! बघा कोण काय म्हणालं?
महायुतीतील मतभेद दूर, आगामी निवडणुका एकत्र लढणार! बघा कोण काय म्हणालं?.
राणीच्या बागेतील दोन्ही वाघांचा मृत्यू, कारण लपवण्याचं कारण काय?
राणीच्या बागेतील दोन्ही वाघांचा मृत्यू, कारण लपवण्याचं कारण काय?.
'अडीच वर्षाचा स्पीड ब्रेकर सोडला, तर गेल्या 11 वर्षात प्रगतीचं...'
'अडीच वर्षाचा स्पीड ब्रेकर सोडला, तर गेल्या 11 वर्षात प्रगतीचं...'.
पुतीन यांची भारताला मोठी ग्वाही अन् रशिया-भारत करारांवर दिला भर
पुतीन यांची भारताला मोठी ग्वाही अन् रशिया-भारत करारांवर दिला भर.
भारत-रशियात महत्त्वपूर्ण करार, PM मोदी म्हणाले आता व्यापारी संबंधाना..
भारत-रशियात महत्त्वपूर्ण करार, PM मोदी म्हणाले आता व्यापारी संबंधाना...
भाजप-ठाकरे सेनेचा कामगार युनियनवरून राडा, वांद्र्यानंतर वरळीत घडल काय?
भाजप-ठाकरे सेनेचा कामगार युनियनवरून राडा, वांद्र्यानंतर वरळीत घडल काय?.
सुट्ट्यांबाबत इंडिगोचे नियम शिथिल, DGCA कडून जारी केलेले नवे आदेश काय?
सुट्ट्यांबाबत इंडिगोचे नियम शिथिल, DGCA कडून जारी केलेले नवे आदेश काय?.