Shahid Afridi : संतापजनक, ‘भारतीय सैन्याला नालायक म्हणणाऱ्या’ शाहिद आफ्रिदीचा भारतीयांकडून सन्मान, VIDEO
Shahid Afridi : एक संतापजनक व्हिडिओ समोर आलाय. भारतीय सैन्याच्या पराक्रमावर प्रश्नचिन्ह निर्माण करणाऱ्या, भारतीयांवर आरोप करणारा पाकिस्तानी क्रिकेटपटू शाहिद आफ्रिदीचा भारतीय समुदायाने जोरदार स्वागत केलं आहे. बूम, बूम आफ्रिदी म्हणून त्यांनी घोषणाबाजी केली. ही सगळी घटना चीड आणणारी आहे. कुठे घडलं हे, जाणून घ्या.

सध्या भारत-पाकिस्तानमध्ये तणाव टोकाला पोहोचला आहे. पहलगाम दहशतवादी हल्ल्यानंतर दोन्ही देशांमध्ये प्रचंड दुरावा आला आहे. या दरम्यान दुबईतून एक असा व्हिडिओ समोर आलाय, ज्याचं सगळ्यांना आश्चर्य वाटलं. दुबईत एका इवेंटमध्ये भारतीय समुदायाच्या लोकांनी पाकिस्तानी क्रिकेटर शाहिद आफ्रिदीच स्वागत केलं. पहलगाम दहशतवादी हल्ल्यापासून भारताविरोधात सातत्याने गरळ ओकणाऱ्या या आफ्रिदीच भारतीयांनी खूप उत्साहात स्वागत केल्याचा व्हिडिओ सोशल मीडियावर व्हायरल होतोय.
पाकिस्तान असोसिएशन दुबईमध्ये (पीएडी) आयोजित एका कार्यक्रमात माजी पाकिस्तानी क्रिकेटपटू शाहीद आफ्रिदीच भारताच्या केरळ समुदायाने उत्साहात स्वागत केलं. या इवेंटचा व्हिडिओ सोशल मीडियावर वेगाने व्हायरल होतोय. या व्हिडिओवरुन वाद निर्माण झाला आहे. जिथे एकाबाजूला आफ्रिदी भारतीय सैन्यावर प्रश्नचिन्ह निर्माण करतो, तिथे दुसऱ्याबाजूला भारतीय त्याचं स्वागत करतायत असं सोशल मीडियावर लोक बोलतायत.
बूम, बूमची घोषणाबाजी
शाहिद आफ्रिदी तिथे पोहोचताच केरळ समुदायाच्या सदस्यांनी आपला सांस्कृतिक कार्यक्रम थांबवला. बूम, बूमची घोषणाबाजी सुरु केली. शाहिद आफ्रिदीला क्रिकेटच्या मैदानावर बूम, बूम आफ्रिदी म्हटलं जायचं. या इवेंटमध्ये आफ्रिदीला पाहताच लोक उत्साहात आले. त्याच्यासाठी घोषणाबाजी सुरु केली. या प्रसंगी आफ्रिदी म्हणाला की, “मला केरळचे लोक भरपूर आवडतात. आम्ही लोक मैदानात क्रिकेट खेळतात. पण मैदानाबाहेर आपण एक माणूस आहोत”
पहलगाम हल्ल्यानंतर आफ्रिदी काय म्हणालेला?
या शाहिद आफ्रिदीसाठी भारतीय समुदायाने उत्साह दाखवला, त्यानचे ऑपरेशन सिंदूरच्यावेळी भारतीय सैन्याबद्दल प्रश्नचिन्ह निर्माण केलेलं. ‘भारतीय सैन्य लढू शकणार नाही’, असं ऑपरेशन सिंदूरनंतर शाहिद आफ्रिदी म्हणालेला. “हे आम्हाला घाबरवण्याचा प्रयत्न करतायत. पण आमचं सैन्य इतकं ट्रेन झालं आहे की, ते आपला सामना करु शकणार नाहीत” असं हा आफ्रिदी म्हणालेला.
सतत पाकिस्तानच्या बाजूने बोलत होता
पहलगाम दहशतवादी हल्ल्यानंतर दोन्ही देशांमध्ये तणाव निर्माण झाला. त्यावेळी हा आफ्रिदी सारखा पाकिस्तानच्या बाजूने बोलत होता. भारताबद्दल प्रश्नचिन्ह निर्माण केलेलं. आफ्रिदी पाकिस्तानी मीडियाशी बोलताना म्हणालेला की, “भारत स्वत: दहशतवादी हल्ले करतो. आपल्या लोकांच्या हत्येसाठी जबाबदार आहे. त्यानंतर त्याचा दोष पाकिस्तानवर टाकतो”
Why on earth are Indians hosting Pakistani cricketers Shahid Afridi & Umar Gul at a UAE Kerala community event? This is bizarre. Pahalgam Terror Attack isn’t enough to shake their conscience? A native of Edappally, Kerala named N. Ramachandran was a victim at Pahalgam. Tone Deaf? pic.twitter.com/4zu2ibaWU0
— Aditya Raj Kaul (@AdityaRajKaul) May 30, 2025
आफ्रिदीने रस्त्यावर उतरुन पाकिस्तानचा खोटा विजय सेलिब्रेट केलेला
या आफ्रिदीने पहलगाम हल्ल्याचे पुरावे मागितले होते. ‘भारतीय सैन्याला त्याने नालायक म्हटलेलं’ त्याचं आफ्रिदीचा दुबईत भारताच्या केरळी समुदायाने जोरदार, उत्साहात स्वागत केलं. पाकिस्तान भारताबरोबरच्या चार दिवसाच्या लढाईत हरला. त्यांचा दारुण पराभव झाला. पण पाकिस्तानातील सत्ताधीशांनी तिथल्या जनतेला खोटं सांगितलं. त्यात हा आफ्रिदी सुद्धा होता, ज्याने रस्त्यावर उतरुन पाकिस्तानचा खोटा विजय सेलिब्रेट केला.
