AQI
Sign In

By signing in or creating an account, you agree with Associated Broadcasting Company's Terms & Conditions and Privacy Policy.

भारताकडून पराभवानंतर पाकिस्तान संघात पडली फूट? काय आहे कारण

भारत आणि पाकिस्तान यांच्यातील T20 विश्वचषक 2024 सामन्यात भारतीय संघाने पाकिस्तानच्या संघाकडून विजय हिसकावून घेतला. त्याआधी नव्या अमेरिका संघाकडून देखील पाकिस्तानला पराभवाचा सामना करावा लागला. आता पाकिस्तान संघात फूट पडल्याची माहिती समोर येत आहे.

भारताकडून पराभवानंतर पाकिस्तान संघात पडली फूट? काय आहे कारण
| Updated on: Jun 12, 2024 | 10:08 PM
Share

T20 World Cup: पाकिस्तानी संघाची T20 विश्वचषकात सुरुवात खूपच वाईट झाली आहे. पाकिस्तान संघाने सलग तीन सामन्यात पराभवाचा सामना केला आहे. पहिल्याच सामन्यात अमेरिकेविरुद्ध पाकिस्तानला पराभव स्वीकारावा लागला. त्यानंतर भारताविरुद्धही पराभव पत्करावा लागला. या दोन पराभवानंतर पाकिस्तानी संघाच्या ड्रेसिंग रूममधील वातावरणाबाबत एक मोठी माहिती समोर येत आहे. खेळाडूंमध्ये संवाद होत नसल्याचा खुलासा एका माजी खेळाडूने केला आहे. याआधी वसीम अक्रमनेही अशीच प्रतिक्रिया दिली होती. पाकिस्तान संघातील दोन मोठे खेळाडू एकमेकांसोबत बोलत नसल्याचं समोर आलं आहे.

पाकिस्तानचा माजी क्रिकेटपटू बासित अलीने पाकिस्तानी संघात पडलेली फूट समोर आणली आहे. स्पोर्ट्स टाकशी बोलताना तो म्हणाला  आमच्या टीममध्ये नुकताच एक गट तयार झाला आहे. पहिली गोष्ट म्हणजे बाबरला कर्णधारपद स्वीकारायला नव्हते पाहिजे.

बासित अली म्हणाले की, कर्णधार बनवायचे असेल तर शाहीनशी बोलले पाहिजे. त्यांची एकमेकांशी मैत्री होती, पण ती मैत्री आता तुटलीये. ते बोलतात पण जमिनीच्या आत, मैदानाबाहेर नाही. उल्लेखनीय आहे की वसीम अक्रमनेही असेच काहीसे म्हटले होते की, काही खेळाडू एकमेकांशी बोलत नाहीत पण यामुळे संघाचे नुकसान होत आहे.

उल्लेखनीय आहे की शाहीन आफ्रिदीला काही काळ कर्णधार बनवल्यानंतर पुन्हा बाबर आझमकडे कमान देण्यात आली होती. त्याच्या नेतृत्वाखाली पाकिस्तानने आयर्लंडविरुद्धचा सामना गमावला होता. यानंतर टी-20 विश्वचषकातही परिस्थिती खराब झाली आहे.

सुपर ओव्हरमध्ये पाकिस्तानला हरवून अमेरिकेने अप्रतिम कामगिरी करत इतिहास रचलाय. त्यानंतर विजयाकडे वाटचाल करेल असं वाटत असताना पाकिस्तानी संघ भारताविरुद्ध देखील हरला. भारतीय संघाने पाकिस्तानचा 6 धावांच्या फरकाने पराभव केला. त्यामुळे पाकिस्तानचा सुपर आठचा मार्ग अवघड झाला आहे. भारतीय संघाविरुद्ध पाकिस्तानच्या विजयाची शक्यता ही ९८ टक्के होती. तर भारताची विजयाची शक्यता फक्त २ टक्के होती. पण भारतीय गोलंदाजांनी कमाल करुन दाखवली आणि भारताने पाकिस्तानवर दणदणीत विजय मिळवला.

रानडुकरांसमुळे तुरीच्या पिकाचे नुकसान, शेतकरी अडचणीत
रानडुकरांसमुळे तुरीच्या पिकाचे नुकसान, शेतकरी अडचणीत.
वानखेडे स्टेडियमवर मेस्सीला पाहण्यासाठी गर्दी; कडक पोलीस बंदोबस्त
वानखेडे स्टेडियमवर मेस्सीला पाहण्यासाठी गर्दी; कडक पोलीस बंदोबस्त.
बिबट्याने डोळ्यासमोरून 4 वर्षांच्या चिमूकल्याला उचलून नेलं!
बिबट्याने डोळ्यासमोरून 4 वर्षांच्या चिमूकल्याला उचलून नेलं!.
महाराष्ट्राच्या राजकारणात मोठे बदल? अर्जुन खोतकरांचे महत्त्वाचे विधान
महाराष्ट्राच्या राजकारणात मोठे बदल? अर्जुन खोतकरांचे महत्त्वाचे विधान.
मुंबईत महायुतीत शिवसेना 125 जागांसाठी आग्रही? मोठी अपडेट आली समोर
मुंबईत महायुतीत शिवसेना 125 जागांसाठी आग्रही? मोठी अपडेट आली समोर.
मुख्यमंत्री भाजपशिवाय दुसऱ्या पक्षाचा शक्य नाही!मुनगंटीवारांचं वक्तव्य
मुख्यमंत्री भाजपशिवाय दुसऱ्या पक्षाचा शक्य नाही!मुनगंटीवारांचं वक्तव्य.
सरकार फार काही करेल असं वाटत नाही! अंबादास दानवेंची खोचक टीका
सरकार फार काही करेल असं वाटत नाही! अंबादास दानवेंची खोचक टीका.
अधिवेशनात विदर्भावर चर्चा नाही! विरोधकांचा सरकारवर हल्लाबोल
अधिवेशनात विदर्भावर चर्चा नाही! विरोधकांचा सरकारवर हल्लाबोल.
तरुणांना सरकारकडून 6 लाख मिळणार! काय आहे योजना?
तरुणांना सरकारकडून 6 लाख मिळणार! काय आहे योजना?.
कृषी संजीवनी योजना गेमचेंजर ठरली! मुख्यमंत्र्यांची अधिवेशनात माहिती
कृषी संजीवनी योजना गेमचेंजर ठरली! मुख्यमंत्र्यांची अधिवेशनात माहिती.