ENG vs IND : टीम इंडियाने विजयाचा गोल्डन चान्स गमावला, लीड्समधील पराभवाची 5 प्रमुख कारणं
England vs India 1st Test Analysis : इंग्लंड दौऱ्यातील पहिल्या कसोटी सामन्यात टीम इंडियाच्या मोजक्या खेळाडूंनी चमकदार कामगिरी केली. मात्र इतरांनी या खेळाडूंच्या मेहनतीवर पाणी फेरलं. त्यामुळे भारतीय संघाला पराभवाचा सामना करावा लागला.

भारतीय कसोटी संघाला शुबमन गिल याच्या नेतृत्वात इंग्लंड दौऱ्यातील पहिल्याच कसोटी सामन्यात पराभूत व्हावं लागलं आहे. इंग्लंडने लीड्समध्ये खेळवण्यात आलेला सामना 5 विकेट्सने जिंकला. इंग्लंडला विजयासाठी 371 धावांचं आव्हान मिळालं होतं. इंग्लंडने चौथ्या दिवसाचा खेळ संपेपर्यंत बिनबाद 21 धावा केल्या. तर पाचव्या आणि अंतिम दिवशी इंग्लंडने 350 धावा करत विजय साकारला. इंग्लंडने यासह 5 सामन्यांच्या मालिकेत 1-0 ने आघाडी घेतली. आता उभयसंघातील दुसरा सामना हा 2 जुलैपासून होणार आहे. शुबमन गिल याच्या कसोटी कारकीर्दीतील कर्णधार म्हणून हा पहिला सामना होता. शुबमनला कर्णधार म्हणून पहिल्याच सामन्यात भारताला विजयी करण्याची संधी होती. मात्र भारतीय संघाने...