प्रतिका रावल हीचं स्वप्न अखेर झालं पूर्ण, जय शाह यांनी दिलं मोठं गिफ्ट
वुमन्स वर्ल्डकप स्पर्धेत प्रतिका रावलने चमकदार कामगिरी केली. पण साखळी फेरीच्या शेवटच्या सामन्यात दुखापत झाली आणि उपांत्य-अंतिम फेरीला मुकली. तिच्या जागी शफाली वर्माला संधी मिळाली. पण जेतेपदानंतर प्रतिका रावलला काही मेडल मिळालं नाही. अखेर जय शाह यांच्या प्रयत्नाने तिला तिचा हक्क मिळाला.

वुमन्स वनडे वर्ल्डकप स्पर्धेत प्रतिका रावलने चांगली कामगिरी केली. पण बाद फेरीत झालेल्या दुखापतीमुळे मैदानात उतरता आलं नाही. बांगलादेशविरुद्धच्या सामन्यात क्षेत्ररक्षण करताना तिला दुखापत झाली आणि उर्वरित स्पर्धांना मुकली. उपांत्य फेरीत शफाली वर्माच्या तिच्या जागी स्थान मिळालं. जेतेपद स्वीकारताना स्मृती मंधानाने तिला व्हीलचेअरवर ढकलत स्टेजवर आणलं होतं. जेतेपदाचा आनंद गगनात मावेनासा झाला होता. पण मेडल न मिळाल्याचं दु:खही तिला होतं. कारण या स्पर्धेत सर्वाधिक धावा करणाऱ्या खेळाडूंच्या यादीत चौथ्या क्रमांकावर होती. वर्ल्डकप फायनल न खेळल्याने प्रतिकाला मेडल मिळालं नव्हतं. पण आयसीसीचे अध्यक्ष जय शाह यांनी प्रतिका रावलला तिचा हक्क मिळवून दिला आहे. प्रतिका रावलला अखेर वर्ल्ड कप विनिंग मेडल मिळालं आहे. प्रतिका रावल गुरूवारी राष्ट्रपती द्रौपदी मुर्मू यांना भेटायला गेली होती, तेव्हा तिच्या गळ्यात मेडल होतं.
आयसीसीच्या नियमानुसार, स्क्वॉडच्या बाहेर असलेल्या खेळाडूला विनिंग मेडल मिळत नाही. पण आयसीसी अध्यक्ष जय शाही त्यांनी तिच्यासाठी प्रयत्न केले आणि तिला तिचा हक्क मिळवून दिला. प्रतिका रावलने सीएनएन न्यूज 18 शी बोलताना सांगितलं की, ‘जय शाह यांनी आमच्या मॅनेजरला मेसेज केला की प्रतिकासाठी मेडलची योजना करत आहोत आणि अखेर माझ्याकडे मेडल आलं. पहिल्यांदा जेव्हा माझ्याकडे वर्ल्डकप मेडल आलं आणि ते खोललं तेव्हा माझ्या डोळ्यात अश्रू आले. मी जास्त रडणारी मुलगी नाही. पण मी ते पाहून भावुक झाली.’
प्रतिका रावलने वर्ल्डकप 2025 स्पर्धेत केली चांगली कामगिरी
प्रतिका रावलने वुमन्स वनडे वर्ल्डकप स्पर्धेत स्मृती मंधानाननंतर सर्वाधिक धावा केल्या आहेत. प्रतिकाने सहा डावात 308 धावा केल्या. यावेळी तिचा स्ट्राईक रेट हा 51.33 चा होता. स्ट्राईक रेट खास नसला तरी संघाला चांगली सुरुवात करून देण्यात तिने महत्त्वाची भूमिका बजावली. प्रतिका रावल दुखापतग्रस्त झाल्याने टीम इंडियाला तिचा भरून काढण्याशिवाय पर्याय नव्हता. अखेर शफाली वर्माची संघात निवड करण्यात आली. उपांत्य फेरीत शफाली काही खास करू शकली नाही. पण अंतिम फेरीत दक्षिण अफ्रिकेविरुद्ध 78 चेंडूत 87 धावा ठोकल्या. तसेच दोन विकेट घेत प्लेयर ऑफ द मॅचचा सन्मान मिळवला.
