AQI
TV9 Network
User
Sign In

By signing in or creating an account, you agree with Associated Broadcasting Company's Terms & Conditions and Privacy Policy.

खराब फॉर्ममुळे टीम इंडियातून हकालपट्टी, आता झंझावाती शतक ठोकून दिल्लीला हरवलं

ऑस्ट्रेलिया दौर्‍यावरील खराब फॉर्ममुळे युवा फलंदाज पृथ्वी शॉला टीम इंडियामधून वगळण्यात आलं आहे. (Prithvi Shawla dropped from Team India)

खराब फॉर्ममुळे टीम इंडियातून हकालपट्टी, आता झंझावाती शतक ठोकून दिल्लीला हरवलं
prithvi shaw
अक्षय चोरगे, टीव्ही 9 मराठी डिजीटल टीम
अक्षय चोरगे, टीव्ही 9 मराठी डिजीटल टीम | Updated on: Feb 22, 2021 | 4:43 PM
Share

मुंबई : ऑस्ट्रेलिया दौर्‍यावरील खराब फॉर्ममुळे युवा फलंदाज पृथ्वी शॉला टीम इंडियामधून वगळण्यात आलं आहे. ऑस्ट्रेलिया दौऱ्यावेळी पृथ्वी अॅडलेडला एका कसोटी सामन्यात खेळला होता, पण त्या सामन्यात त्याला काही खास कामगिरी करता आली नाही. परंतु आता पृथ्वी शॉने आपण फॉर्ममध्ये परतल्याचे संकेत दिले आहेत. त्याने विजय हजारे करंडक स्पर्धेत नाबाद शतकी खेळी करत मुंबईच्या संघाला शानदार विजय मिळवून देत स्वतःची ताकद सिद्ध केली आहे. पृथ्वी शॉने दिल्लीविरुद्धच्या सामन्यात दमदार शतक ठोकलं आहे. त्याने 89 चेंडूत 15 चौकार आणि दोन षटकारांसह नाबाद 105 धावा फटकावल्या. यामुळे मुंबईने दिल्लीला सात गडी राखून पराभूत केलं आहे. शॉच्या शतकामुळे दिल्लीने दिलेलं 212 धावांचे लक्ष्य मुंबईने 32 व्या षटकात गाठलं. (Prithvi Shaw century against Delhi in Vijay Hazare trophy)

दिल्ली विरुद्धच्या सामन्यात पृथ्वी शॉ पूर्ण फॉर्ममध्ये दिसला. या सामन्यात प्रथम फलंदाजी करताना दिल्लीच्या संघाने निर्धारित 50 षटकांमध्ये 7 गड्यांच्या बदल्यात 211 धावा जमवल्या. 212 धावांचे आव्हान घेऊन मुंबईची सलामी जोडी पृथ्वी शॉ आणि यशस्वी जयस्वाल मैदानात उतरले. 23 चेंडूत 8 धावा करत जयस्वाल स्वस्तात परतला. त्यानंतर कर्णधार श्रेयस अय्यरसह पृथ्वीने दुसर्‍या विकेटसाठी 82 धावांची भागीदारी केली. अय्यर 6 चौकार आणि एका षटकाराच्या मदतीने 39 चेंडूत 39 धावांवर असताना बाद झाला. अय्यर आणि शॉ दोघेही आयपीएलमध्ये दिल्ली कॅपिटलसाठी एकत्र खेळतात. अय्यर बाद झाल्यावर पृथ्वी शॉने सूर्यकुमार यादवसोबत मोठी भागीदारी रचली. दोघांनी वेगाने धावा जमवत मुंबईला विजयासमीप नेले. दरम्यान, शॉने 83 चेंडूत आपले शतक पूर्ण केले. त्याचवेळी सूर्याने 32 चेंडूंमध्ये 6 चौकार आणि 2 षटकारांच्या मदतीने अर्धशतक पूर्ण केले. या सामन्याच्या एक दिवस आधीच सूर्यकुमारची भारताच्या टी -20 संघात निवड झाली आहे.

अर्धशतक करुन सूर्यकुमार यादव बाद झाला. त्यानंतर पृथ्वीने शिवम दुबेच्या मदतीने सामना जिंकला. दरम्यान, शॉने 89 चेंडूत 15 चौकार आणि 2 षटकारांच्या सहाय्याने नाबाद 105 धावा फटकावल्या. मुंबईने 31.5 षटकात 216 धावा फटकावल्या. या विजयासह विजय हजारे ट्रॉफीमध्ये मुंबईने त्यांच्या गुणांचं खातं उघडलं आहे. तर दिल्लीने पराभवासह या करंडकाची सुरुवात केली आहे. या सामन्यात दिल्लीच्या फलंदाजांनी निराश केले. सलामीवीर शिखर धवन शुन्यावर धावबाद झाला. तिसऱ्या क्रमांकावर फलंदाजीसाठी मैदानात आलेल्या 24 वर्षीय हिम्मत सिंह याच्या नाबाद 106 आणि शिवांक वशिष्ठ याच्या 55 धावांच्या जोरावर दिल्लीने द्विशतकी आकडा गाठला. या दोघांव्यतिरिक्त दिल्लीच्या कोणत्याही फलंदाजाला मोठी धावसंख्या उभारता आली नाही.

ऑस्ट्रेलिया दौर्‍यावरील खराब फॉर्ममुळे पृथ्वी शॉची इंग्लंडविरुद्धच्या कसोटी मालिकेसाठी निवड करण्यात आली नाही. शुबमन गिलने त्याची जागा घेतली आहे. या दौर्‍यापूर्वी शॉ आयपीएलमध्येही अपयशी ठरला होता. आयपीएलमध्ये तो 13 सामन्यात केवळ 228 धावा करु शकला होता. शेवटी त्याला आयपीएलमध्ये दिल्लीच्या संघानेदेखील वगळले होते.

हेही वाचा

राशिद खानच्या हेलिकॉप्टर शॉटवर सारा फिदा, म्हणते ‘असा शॉट मला पण शिकव!’

सहाव्या क्रमांकावर उतरुन 9 चेंडूत चोपल्या 50 धावा, पण ‘या’ फलंदाजाच्या तुफानी शतकाने जिंकलं चाहत्यांचं मन

सेहवाग, गांगुली-धोनीपेक्षा अधिक रन्स, तरीही संघाबाहेर, मात्र पुढे थेट ऑस्ट्रेलियाच्या गोटात!

(Prithvi Shaw century against Delhi in Vijay Hazare trophy)

Follow Us
अण्णा हजारे विद्यार्थ्यांसाठी मैदानात, उद्या आंदोलन करणार
Anna Hazare | अण्णा हजारे विद्यार्थ्यांसाठी मैदानात, उद्या आंदोलन करणार
हे आंदोलन तर बेजबाबदारपणा, एकनाथ शिंदेंची राहुल गांधींवर टीका; म्हणाले
हे आंदोलन तर बेजबाबदारपणा, एकनाथ शिंदेंची राहुल गांधींवर टीका; म्हणाले आंदोलनाची जागा...
देशाची बदनामी होऊ नये याचा विचार करा, CM फडणवीसांचे आंदोलकांना आवाहन
देशाची बदनामी होऊ नये याचा विचार करा, CM फडणवीसांचे आंदोलकांना आवाहन
आम्हाला कोणतेही व्हिडिओ पाहायचे नाहीत; जंतर-मंतर लाठीचार्ज प्रकरणावर..
आम्हाला कोणतेही व्हिडिओ पाहायचे नाहीत; जंतर-मंतर लाठीचार्ज प्रकरणावर सुप्रीम कोर्टाचा सुनावणीला तात्काळ नकार
हे सरकार हटवा, आम्ही वर्दीत आहोत; राहुल गांधींना फरफटत नेताना पोलीस...
हे सरकार हटवा, आम्ही वर्दीत आहोत; राहुल गांधींना फरफटत नेताना पोलिसांने कानात काय सांगितलं?
152 पेपरफुटी, 5 कोटी विद्यार्थ्यांचं भविष्य उद्ध्वस्त!
Rahul Gandhi | 152 पेपरफुटी, 5 कोटी विद्यार्थ्यांचं भविष्य उद्ध्वस्त! राहुल गांधींचा मोदी सरकारवर घणाघात
तोंडातून रक्त येत होतं अन्,.. स्वतः राहुल गांधींंनीच सांगितलं, अटके
तोंडातून रक्त येत होतं अन्... स्वतः राहुल गांधींंनीच सांगितलं, अटकेवेळी नेमकं काय घडलं?
धर्मेंद्र प्रधानांच्या राजीनाम्याच्या मागणीवर आशिष जैस्वालांचा पलटवार
Aashish Jaiswal | धर्मेंद्र प्रधानांच्या राजीनाम्याच्या मागणीवर आशिष जैस्वालांचा पलटवार; म्हणाले थेट संबंध नाही...
ओमराजेंसह सर्व फुटीर खासदारांना... ठाकरे गटाने कोर्टात धाव घेताच मोठी
Arvind Sawant | ओमराजेंसह सर्व फुटीर खासदारांना... ठाकरे गटाने कोर्टात धाव घेताच मोठी अपडेट समोर
राहुल गांधींना अमित साटमचं थेट चॅलेंज! पासपोर्ट दाखवा, परदेश...
Ameet Satam | राहुल गांधींना अमित साटमचं थेट चॅलेंज! पासपोर्ट दाखवा, परदेश दौऱ्यांचा हिशेब द्या
मोठी बातमी! दिल्लीत राडा… तलवार फिरवली, आदोलकांकडून पोलिसांवर दगडफेक; दोन अधिकाऱ्यांसह अनेकजण जखमी.

मोठी बातमी! दिल्लीत राडा… तलवार फिरवली, आदोलकांकडून पोलिसांवर दगडफेक; दोन अधिकाऱ्यांसह अनेकजण जखमी

धर्मेंद्र प्रधान यांचा राजीनामा घेणार का? जे पी नड्डा यांचं थेट उत्तर, दिली सर्वात मोठी माहिती.

धर्मेंद्र प्रधान यांचा राजीनामा घेणार का? जे पी नड्डा यांचं थेट उत्तर, दिली सर्वात मोठी माहिती

आता एकाही जहाजावर हल्ला केला तर आम्ही थेट…, डोनाल्ड ट्रम्प यांची इराणला सर्वात मोठी धमकी, जगभरात खळबळ.

आता एकाही जहाजावर हल्ला केला तर आम्ही थेट…, डोनाल्ड ट्रम्प यांची इराणला सर्वात मोठी धमकी, जगभरात खळबळ

पेपरफुटी हा गंभीर विषय, याला राजकीय रंग देऊ नये; CJP च्या आंदोलनावर सलमान खानची प्रतिक्रिया.

पेपरफुटी हा गंभीर विषय, याला राजकीय रंग देऊ नये; CJP च्या आंदोलनावर सलमान खानची प्रतिक्रिया

नागपुरात CJP च्या आंदोलकांची धरपकड, अनेकजण पोलिसांच्या ताब्यात; नेमकं काय घडलं?.

नागपुरात CJP च्या आंदोलकांची धरपकड, अनेकजण पोलिसांच्या ताब्यात; नेमकं काय घडलं?

मोठी बातमी! जंतर मंतरवर पुन्हा मोठा गोंधळ, पोलिसांकडून लाठीचार्ज, आश्रुधुराच्या नळकांड्या फोडल्या.

मोठी बातमी! जंतर मंतरवर पुन्हा मोठा गोंधळ, पोलिसांकडून लाठीचार्ज, आश्रुधुराच्या नळकांड्या फोडल्या