सचिनने ज्याची बॅटिंग चोरून पाहिली, त्या खेळाडूवर पेट्रोल पंपावर काम करण्याची वेळ; युझवेंद्र चहल फोटो शेअर करत म्हणाला…
क्रिकेटपटू पृथ्वी शॉ आणि युझवेंद्र चहल सध्या टीम इंडियातून बाहेर आहेत. टी20 वर्ल्डकपमध्ये युझवेंद्र चहलला संधी मिळाली होती. पण संपर्ण स्पर्धा बेंचवर बसून बघावी लागली. तर पृथ्वी शॉचं टीम इंडियात कमबॅक होणं खूपच कठीण आहे. असं असलं तरी दोघंही खेळाडू सोशल मीडियावर अॅक्टिव्ह आहेत.

भारताचा स्टार फिरकीपटू युझवेंद्र चहल सोशल मीडियावर सक्रिय असतो. चहल काही ना काही सोशल मीडियावर पोस्ट करत असतो. त्याच्या पोस्टची चर्चाही रंगते. इतकंच काय तर चहल आणि त्याची मैदानातील मजा मस्तीही सर्वांना परिचयाची आहे. त्यामुळे युझवेंद्र चहलने काही पोस्ट केलं की त्याची चर्चा रंगते. त्याच्या पोस्टवर कमेंट्स आणि लाईकचा वर्षाव सुरु होत असतो. पण युझवेंद्र चहलच्या एका पोस्टने सर्वांचं लक्ष वेधून घेतलं. या पोस्टमध्ये क्रिकेटपटू पृथ्वी शॉ पेट्रोल पंपवर दिसत आहे. इतकंच काय हातात पंप घेऊन पेट्रोल भरत असल्याने अनेकांना आश्चर्याचा धक्का बसला. खरंच पृथ्वी शॉ पेट्रोल पंपवर काम करतोय का? असा प्रश्नही अनेकांना पडला आहे. पृथ्वी शॉ जुलै 2021 पासून टीम इंडियाचा भाग नाही. तेव्हापासून टीम इंडियात स्थान मिळवण्यासाठी धडपड करत आहे.सध्या युझवेंद्र चहल आणि पृथ्वी शॉ इंग्लंडमध्ये काउंटी क्रिकेट खेळत आहेत.
युझवेंद्र चहलचा मस्करी करणारा स्वभाव प्रत्येकाला माहिती आहे. त्यामुळे त्याचं कोणी मनाला लावून घेत नाही. पृथ्वी शॉचा पेट्रोल पंपवर पेट्रोल भरतानाचा एका व्हिडीओ शेअर केला आहे. चहलने हा पोस्ट करताना लिहिलं की तो पुन्हा आला आहे. त्यानंतर पृथ्वी शॉने चहलची इंस्टाग्राम स्टोरी आपल्या खात्यावरून शेअर करताना लिहिलं की, लवकरच तुझ्याकडून भरणार. दुसरीकडे, काउंटी क्रिकेटमध्ये पृथ्वी शॉने चांगली कामगिरी केली आहे. पण संघात स्थान मिळवणं खूपच कठीण आहे.


पृथ्वी शॉने मुंबईच्या क्लब सामन्यात 500 हून अधिक धावा केल्या होत्या. त्यामुळे कमी वयातच चर्चेत आला होता. त्याची तुलना दिग्गज क्रिकेटपटूंसोबत केली गेली. त्याच्या नेतृत्वात टीम इंडियाने अंडर 19 वर्ल्डकप जिंकला होता. पृथ्वी शॉने एका मुलाखतीत सांगितलं होतं की, जेव्हा मी लहान होतो तेव्हा सचिनने माझी फलंदाजी लपून पाहिली होती. याबाबत सचिन तेंडुलकरने स्वत: 10 वर्षांनी मला सांगितलं होतं. आयपीएलमध्ये दिल्ली कॅपिटल्सकडून खेळला. पण त्याची बॅट हवी तशी चालली नाही. दुसरीकडे, पृथ्वी वादामुळेही चर्चेत आला होता. एका क्लबमध्ये वाद झाल्याची घटना घडली होती. त्यानंतर हे प्रकरण पोलिसात गेलं होतं.
