AQI
TV9 Network
User
Sign In

By signing in or creating an account, you agree with Associated Broadcasting Company's Terms & Conditions and Privacy Policy.

PBKS vs RR Live Streaming : राजस्थानसमोर पंजाबचं कडवं आव्हान, श्रेयससेनेचा विजय रथ रोखणार?

Punjab Kings vs Rajasthan Royals IPL 2026 Live Scorecard : पंजाब किंग्स 19 व्या मोसमात आपल्या मोहिमेतील नवव्या सामन्यात घरच्या मैदानात राजस्थान रॉयल्स विरुद्ध 2 हात करणार आहे.

PBKS vs RR Live Streaming : राजस्थानसमोर पंजाबचं कडवं आव्हान, श्रेयससेनेचा विजय रथ रोखणार?
PBKS vs RR Shreyas Iyer and Riyan ParagImage Credit source: News 9
| Updated on: Apr 28, 2026 | 3:01 AM
Share

आयपीएल स्पर्धेच्या 19 व्या मोसमातील 40 व्या सामन्यात पॉइंट्स टेबलमधील 2 आघाडीच्या संघात कडवी झुंज पाहायला मिळणार आहे. या सामन्यात 17 व्या हंगामातील उपविजेता विरुद्ध पहिल्या मोसमातील विजेता यांच्यात ही लढत होणार आहे. पंजाब किंग्स विरुद्ध राजस्थान रॉयल्स असा हा सामना होणार आहे. दोन्ही संघांचा हा या हंगामातील नववा सामना असणार आहे. रियान पराग याच्याकडे राजस्थानच्या कर्णधारपदाची जबाबदारी आहे. तर श्रेयस अय्यर पंजाबच्या कर्णधारपदाची जबाबदारी सांभाळत आहे. पंजाब 8 सामन्यांनंतरही अजिंक्य आहेत. त्यामुळे राजस्थानसमोर पंजाबचा विजयी झंझावात रोखण्याचं आव्हान आहे. त्यामुळे राजस्थान यात यशस्वी होणार ही पंजाब विजयी घोडदौड कायम राखणार? हे पाहणं महत्त्वाचं ठरणार आहे. या निमित्ताने सामन्यातील महत्त्वाची माहिती जाणून घेऊयात.

पंजाब किंग्स विरुद्ध राजस्थान रॉयल्स सामना कधी?

पंजाब किंग्स विरुद्ध राजस्थान रॉयल्स सामना मंगळवारी 28 एप्रिलला होणार आहे.

पंजाब किंग्स विरुद्ध राजस्थान रॉयल्स सामना कुठे?

पंजाब किंग्स विरुद्ध राजस्थान रॉयल्स सामना मुल्लानपूर, न्यू चंडीगडमधील महाराजा यादविंद्र सिंह आंतरराष्ट्रीय क्रिकेट स्टेडियम इथे होणार आहे.

पंजाब किंग्स विरुद्ध राजस्थान रॉयल्स सामन्याला किती वाजता सुरुवात होणार?

पंजाब किंग्स विरुद्ध राजस्थान रॉयल्स सामन्याला संध्याकाळी 7 वाजून 30 मिनिटांनी सुरुवात होईल. तर 7 वाजता टॉस होईल.

पंजाब किंग्स विरुद्ध राजस्थान रॉयल्स सामना टीव्ही आणि मोबाईलवर कुठे पाहायला मिळेल?

पंजाब किंग्स विरुद्ध राजस्थान रॉयल्स सामना टीव्हीवर स्टार स्पोर्ट्स नेटवर्कवरील चॅनेल्सवर लाईव्ह पाहायला मिळेल. तर लाईव्ह मॅच स्मार्ट टीव्ही, लॅपटॉप आणि मोबाईलवर जिओ हॉटस्टार एपद्वारे पाहायला मिळेल.

हेड टु हेड रेकॉर्ड

पंजाब विरुद्ध राजस्थान यांच्यात आतापर्यंत एकूण 30 सामन्यांत आमनासामना झाला आहे. राजस्थानने या 30 पैकी सर्वाधिक सामने जिंकले आहेत. राजस्थानने 17 सामन्यांत विजय मिळवला आहे. तर पंजाबने 12 सामन्यांत राजस्थानवर मात केली आहे.

पॉइंट्स टेबलमध्ये कोण कुठे?

ताज्या आकडेवारीनुसार, पंजाब पॉइंट्स टेबलमध्ये पहिल्या स्थानी आहे. पंजाबने 7 पैकी 6 सामने जिंकले आहेत. तर पंजाबचा 1 सामना पावसामुळे रद्द झाला. त्यामुळे पंजाबच्या खात्यात 13 गुण आहेत. तसेच पंजाबचा नेट रनरेट हा +1.333 असा आहे.

तर राजस्थान पॉइंट्स टेबलमध्ये चौथ्या स्थानी आहे. राजस्थानने 8 पैकी 5 सामने जिंकले आहेत. राजस्थानला 3 सामन्यांत पराभूत व्हावं लागलं आहे. राजस्थानच्या खात्यात 10 गुण आहेत. तसेच त्यांचा नेट रनरेट हा +0.602 असा आहे.

Follow Us
पक्षप्रवेश करणाऱ्या 6 खासदारांची खासदारकी जाणार? शिंदेंनी एका झटक्यातच
Big Breaking | पक्षप्रवेश करणाऱ्या 6 खासदारांची खासदारकी जाणार? शिंदेंनी एका झटक्यातच दिलं उत्तर; कायदेशीर...
ठाकरेंच्या 6 खासदारांचा शिवसेने जाहीर पक्षप्रवेश; पत्रकार परिषदेच्या..
ठाकरेंच्या 6 खासदारांचा शिवसेने जाहीर पक्षप्रवेश; पत्रकार परिषदेच्या सुरुवातीलाच शिंदेंचं ओमराजेंबाबत मोठं विधान
गेल्या दोन तासांपासून बैठक सुरु; 6 फुटीर खासदार Y. B. चव्हाण सेंटरवर
गेल्या दोन तासांपासून बैठक सुरु; 6 फुटीर खासदार Y. B. चव्हाण सेंटरवर पोहोचण्याआधीच...
हुबेहुब रुपाली चाकणकर! महाराष्ट्रभर गाजलेल्या खरात प्रकरणावरील चित्रपट
हुबेहुब रुपाली चाकणकर! महाराष्ट्रभर गाजलेल्या खरात प्रकरणावरील चित्रपटाचा First Look समोर
6 खासदार गेलेच, आता ते 3 आमदारही नाराज? ठाकरेंच्या बैठकीला मारली दांडी
मोठी घडामोड! 6 खासदार गेलेच, आता ते 3 आमदारही नाराज? उद्धव ठाकरेंच्या बैठकीला मारली दांडी!
पक्ष प्रवेशापूर्वीच शिंदेकडून ओमराजेंना मोठं गिफ्ट? थेट दिल्लीत...
Omraje Nimbalkar | पक्ष प्रवेशापूर्वीच मोठं घडलं; शिंदेकडून ओमराजेंना मोठं गिफ्ट? थेट दिल्लीत...
शिंदे-मींदे बाळंत झालेत, 6 गद्दारांना जन्म दिला; राऊतांचा हल्लाबोल
Sanjay Raut | शिंदे-मींदे बाळंत झालेत, 6 गद्दारांना जन्म दिला, नंदनवनात पाळणा...शिंदेंवर राऊतांचा हल्लाबोल
उद्धव ठाकरेंच्या बाजूला बसलेलेही त्यांनी फसवतायेत? बड्या नेत्याच्या
उद्धव ठाकरेंच्या बाजूला बसलेलेही त्यांनी फसवतायेत? बड्या नेत्याच्या विधानाने खळबळ
ऑपरेशन टायगर 2 पण होणार, शिंदेंच्या बड्या नेत्याने दिले मोठे संकेत
मोठी बातमी! 6 खासदारांनंतर आणखी मोठा धक्का; ऑपरेशन टायगर 2 पण होणार, शिंदेंच्या शिवसेनेच्या बड्या नेत्याने दिले मोठे संकेत
उद्धव ठाकरेंची 20 आमदारांसोबत बैठक, बैठकीला कोण हजर अन् कोण गैरहजर?
Thackeray MLA Meeting | उद्धव ठाकरेंची 20 आमदारांसोबत बैठक, बैठकीला कोण हजर अन् कोण गैरहजर?