AQI
Sign In

By signing in or creating an account, you agree with Associated Broadcasting Company's Terms & Conditions and Privacy Policy.

भारताने लंकेला लोळवलं, धवन-द्रविडने विजयाचं खातं उघडलं, लोक म्हणाले, ‘आता रवी शास्त्रीला हटवा!’

पहिल्या विजयासह शिखर धवनने पदार्पणाच्या पहिल्या सामन्यात विजय मिळवून आपल्या कॅप्टन्सी कारकीर्दीचा श्रीगणेशा केला. तर प्रशिक्षक राहुल द्रविडने देखील सिनिअर संघाचं प्रशिक्षकपद सांभाळताना पहिल्या विजयाची नोंद केली.

भारताने लंकेला लोळवलं, धवन-द्रविडने विजयाचं खातं उघडलं, लोक म्हणाले, 'आता रवी शास्त्रीला हटवा!'
शिखर धवन-राहुल द्रविड-रवी शास्त्री
| Edited By: | Updated on: Jul 19, 2021 | 9:34 AM
Share

मुंबई : पहिल्याच एकदिवसीय सामन्यात भारताच्या नवोदित खेळाडूंनी श्रीलंकेला हिसका दाखवला (India vs Sri lanka). सलामीवीर शिखर धवन-पृथ्वी शॉ यांची झंझावाती सुरुवात आणि त्यानंतर इशान किशनने केलेल्या फटकेबाजीच्या जोरावर भारताने लंकेला 7 विकेट्स आणि 80 चेंडू राखून लोळवलं. या विजयासह शिखर धवनने पदार्पणाच्या पहिल्या सामन्यात विजय मिळवून आपल्या कॅप्टन्सी कारकीर्दीचा श्रीगणेशा केला. तर प्रशिक्षक राहुल द्रविडने देखील सिनिअर संघाचं प्रशिक्षकपद सांभाळताना पहिल्या विजयाची नोंद केली. टीम इंडियाच्या धडाकेबाज कामगिरीनंतर आता भारताच्या मुख्य प्रशिक्षकपदी राहुल द्रविडची निवड करण्यात यावी, त्यासाठी रवी शास्त्रींना हटवा, अशी मागणी होऊ लागली आहे. सोशल मीडियावर हजारो नेटकरी ही मागणी करु लागले आहेत.

द्रविड-धवनची शानदार सुरुवात

द्रविड-धवनने आपल्या नव्या इनिंगला झोकात सुरुवात केली. पहिल्यात सामन्यात लंकेला 7 विकेट्सने नमवून मालिकेत 1-0 अशी आघाडी घेतली. याचसोबत शिखर धवनने आपल्या कॅप्टन्सी करिअरमधील पहिल्या विजयाची नोंद केली. तर सिनिअर संघाचं प्रशिक्षकपद सांभाळताना द्रविडने देखील विजयाने खातं उघडलं. यानंतर आता रवी शास्त्रींना ह़टवून राहुल द्रविडकडे मुख्य प्रशिक्षपदाची जबाबदारी द्यावी, अशी मागणी नेटकरी करु लागले आहेत.

काय झालं मॅचमध्ये?

या सामन्यात श्रीलंकेने प्रथम फलंदाजी करताना 262 घावांचे लक्ष्य दिले होते. भारताच्या फलंदाजांनी हे लक्ष्य 7 गडी आणि 80 चेंडू राखून पूर्ण केले. कर्णधार शिखर धवन (86) आणि इशान किशनच्या (59) अर्धशतकांच्या जोरावर भारताने हे आव्हान पूर्ण केले. तसेच सलामीवीर पृथ्वी शॉ याने 24 चेंडूत 43 धावांची खेळी करत भारताला चांगली सुरुवात करुन दिली होती. तर शेवटी सूर्यकुमार यादवने 20 चेंडूत 31 धावा करत भारताला विजय मिळवून दिला.

तत्पूर्वी, या सामन्यात श्रीलंका संघाने प्रथम फलंदाजी करत एका संयमी खेळीच्या जोरावर 262 धावा स्कोरबोर्डवर लावल्या होत्या. ज्यामुळे भारतासमोर 263 धावांचे लक्ष्य होते. सामन्यात भारतीय फिरकीपटूंनी कमालीची गोलंदाजी करत श्रीलंकेची वरची फळी नेस्तनाबूत केली. पण कर्णधार शनाका (39) याची उत्कृष्ट खेळी सोबत करुनारत्ने याने अखेरच्या दोन ओव्हरमध्ये चौकार-षटकारांचा पाऊस पाडत केलेल्या नाबाद 43 धावा यामुळे श्रीलंका संघाने 262 धावांपर्यंत मजल मारली होती. भारताकडून युजवेंद्र चहल, कुलदीप यादव आणि दिपक चाहरने प्रत्येकी दोन विकेट घेतल्या. तर हार्दीक आणि कृणाल पंड्या बंधूंनी प्रत्येकी एक विकेट मिळवली.

भारतीय फिरकीपटूंची कमाल

कोलंबोच्या मैदानात सुरु असलेल्या पहिल्या एकदिवसीय सामन्यात भारताने तीन फिरकीपटूंना संधी दिली. यामध्ये बऱ्याच काळानंतर भारताची ‘कुल्चा’ अर्थात कुलदीप यादव आणि युझवेंद्र चहल यांची जोडी मैदानात अवतरली होती. भारतीय संघाचा तीन फिरकीपटू खेळवण्याचा प्लॅन यशस्वी झाला. कारण सामन्यात पहिले महत्त्वाचे चार फलंदाज फिरकीपटूनीच बाद केले. दरम्यान संपूर्ण सामन्याचा विचार करता चहल, कुलदीप यादव आणि दिपक चहरने प्रत्येकी दोन विकेट घेतल्या. तर हार्दिक आणि कृणाल यांनी प्रत्येकी एक विकेट घेतली.

(Rahul Dravid Should Be Appointed Full time Coach of india removed Ravi Shastri After india Defeat Srilanka By 8 Wicket)

हे ही वाचा :

‘ठरवूनच गेलो होतो, कुणीही असो, पहिल्या बॉलवर षटकारच मारायचा’, चहलच्या मुलाखतीत इशानची सिक्रेट गोष्ट

पृथ्वीचा लंकेला तडाखा, धमाकेदार खेळीनंतर सेहवागचं ‘ते’ ट्विट व्हायरल, रवी शास्त्रींची घेतली मजा!

टीम इंडियासमोर श्रीलंकेची हाराकिरी, भारताचा लंकेवर 7 गडी आणि 80 चेंडू राखून मोठा विजय

फडणवीस सरकारच 1 वर्ष, मुख्यमंत्र्यांना किती मार्क? काय सांगतो सर्व्हे?
फडणवीस सरकारच 1 वर्ष, मुख्यमंत्र्यांना किती मार्क? काय सांगतो सर्व्हे?.
फोडाफोडीन नाराजी, वाक् युद्धानंतर आज शिंदे-रवींद्र चव्हाण एकाच मंचावर?
फोडाफोडीन नाराजी, वाक् युद्धानंतर आज शिंदे-रवींद्र चव्हाण एकाच मंचावर?.
फडणवीसांच्या इशाऱ्याने इतर पक्ष चालतात, कुणाच्या वक्तव्याची होते चर्चा
फडणवीसांच्या इशाऱ्याने इतर पक्ष चालतात, कुणाच्या वक्तव्याची होते चर्चा.
CM सह शिंदे दादांची महत्त्वाची बैठक; पक्षांतर्गत प्रवेशबंदीवर तोडगा?
CM सह शिंदे दादांची महत्त्वाची बैठक; पक्षांतर्गत प्रवेशबंदीवर तोडगा?.
इंडिगोच्या विस्कळीत सेवेविरोधात प्रवाशांना मनस्ताप, थेट कोर्टात याचिका
इंडिगोच्या विस्कळीत सेवेविरोधात प्रवाशांना मनस्ताप, थेट कोर्टात याचिका.
रूपाली ठोंबरेंकडून बाळासाहेब अन् पवारांसोबत फोटो शेअर, चर्चांना उधाण
रूपाली ठोंबरेंकडून बाळासाहेब अन् पवारांसोबत फोटो शेअर, चर्चांना उधाण.
मुंबईत भाजपच्या महापौरामुळं कॉलर टाईट होणार! लोढांचं मोठं वक्तव्य काय?
मुंबईत भाजपच्या महापौरामुळं कॉलर टाईट होणार! लोढांचं मोठं वक्तव्य काय?.
चैत्यभूमीवर जनसागर... बाबासाहेबांच्या महापरिनिर्वाण दिनी मोठी गर्दी
चैत्यभूमीवर जनसागर... बाबासाहेबांच्या महापरिनिर्वाण दिनी मोठी गर्दी.
डॉ. आंबेडकरांना राज्यपाल, मुख्यमंत्री, उपमुख्यमंत्र्यांकडून आदरांजली
डॉ. आंबेडकरांना राज्यपाल, मुख्यमंत्री, उपमुख्यमंत्र्यांकडून आदरांजली.
बहरीनमध्ये जय पवार यांची हळदी, बघा दिमाखदार सोहळ्याचे फोटो
बहरीनमध्ये जय पवार यांची हळदी, बघा दिमाखदार सोहळ्याचे फोटो.