AQI
Sign In

By signing in or creating an account, you agree with Associated Broadcasting Company's Terms & Conditions and Privacy Policy.

राहुल द्रविडने वैभव सूर्यवंशीला तसं बोलताना अडवलं, पण तो काही ऐकला नाही; Live कॅमेऱ्यात सर्वकाही चित्रित

राजस्थान रॉयल्सचा आयपीएल 2025 स्पर्धेतील प्रवास संपाला आहे. या संघात खेळणारा वैभव सूर्यवंशी हा सर्वाच चर्चेत राहीला. प्रशिक्षक राहुल द्रविड आणि वैभव सुर्यवंशी यांचा एक संवाद व्हायरल होत आहे. यात राहुल द्रविडने मनाई करूनही वैभवने एका दमात सर्वकाही सांगून टाकलं.

राहुल द्रविडने वैभव सूर्यवंशीला तसं बोलताना अडवलं, पण तो काही ऐकला नाही; Live कॅमेऱ्यात सर्वकाही चित्रित
राहुल द्रविड आणि वैभव सूर्यवंशी Image Credit source: Instagram
| Updated on: May 21, 2025 | 6:02 PM
Share

राजस्थान रॉयल्स संघाचं आयपीएल 2025 स्पर्धेतील आव्हान संपुष्टात आलं आहे. साखळी फेरीतील शेवटचा सामना चेन्नई सुपर किंग्सविरुद्ध खेळला आणि विजयासह शेवट गोड केला. आता राजस्थान रॉयल्स पुढच्या पर्वाच्या तयारीला लागली आहे. या पर्वात बरंच काही शिकायला मिळालं. वैभव सूर्यवंशीसारखा हिरा त्यांना या स्पर्धेतून राजस्थानला मिळाला. राहुल द्रविडने वैभव सूर्यवंशीसोबत बातचीत केली. हा व्हिडीओ आयपीएल आपल्या इन्स्टाग्राम हँडलवर अपलोड केला आहे. या मुलाखतीत राहुल द्रविडने वैभव सूर्यवंशीला खूप सारे प्रश्न विचारले. त्या सर्व प्रश्नांची उत्तरं वैभव सूर्यवंशीने बेधडकपणे दिली. या मुलाखतीत वैभव सूर्यवंशीने आयपीएल 2025 स्पर्धेतील प्रवासाबाबत बरंच काही सांगितलं. इतकंच काय तर वैभव सूर्यवंशी या मुलाखतीत राहुल द्रविडच्या पाया पडताना दिसला. वैभव सूर्यवंशी असं करत असताना राहुल द्रविडने त्याला रोखलं. पण वैभव सूर्यवंशी काही ऐकला नाही आणि त्याने पदस्पर्श करून आशीर्वाद घेतले.

मुलाखतीच्या सुरुवातीला राहुल द्रविडने वैभव सूर्यवंशीला स्तुती करताना थांबवण्याचा प्रयत्न केला. वैभवने सुरुवातीला प्रश्न विचारल्यानंतर राहुल द्रविडची स्तुती सुरु केली. ‘मी तुमच्यासोबत प्रॅक्टिस केली खूप चांगलं वाटलं.’ असं वैभव सूर्यवंशी सांगत होता. तेव्हाच राहुल द्रविडने त्याला सांगितलं की, हे काही सांगायची गरज नाही. तुला पॉइंट्स मिळतील. काळजी करू नको. तेव्हा वैभव सूर्यवंशीने सांगितलं की, खरं काय ते सांगत आहे. त्यानंतरही वैभव सूर्यवंशीने राहुल द्रविडची स्तुती केली.

View this post on Instagram

A post shared by IPL (@iplt20)

वैभव सूर्यवंशीच्या कामगिरीने राजस्थान रॉयल्सचा प्रशिक्षक राहुल द्रविड खूपच खूश दिसला. त्याने पुढच्या पर्वात अधिक मेहनत करून येण्याचा सल्ला दिला. कारण पुढच्या पर्वात इतर संघाचे गोलंदाज त्याच्याविरुद्ध नव्या स्ट्रेटजीसह येतील तेव्हा त्यांचा सामना करणं सोपं झालं पाहीजे. वैभव सूर्यवंशीने या पर्वात 35 चेंडूत शतक ठोकलं. तसेच चेन्नई विरूद्धच्या सामन्यात अर्धशतकी खेळी केली. वैभव सूर्यवंशी आता अंडर 19 क्रिकेट संघात खेळताना दिसणार आहे.

पुण्यात न जिंकणाऱ्या जागा भाजप शिवसेनेला देतंय; धंगेकरांचा गंभीर आरोप
पुण्यात न जिंकणाऱ्या जागा भाजप शिवसेनेला देतंय; धंगेकरांचा गंभीर आरोप.
युतीबाबत निर्णय करा, अन्यथा..; शिंदेंच्या मंत्र्याचा भाजपला थेट इशारा
युतीबाबत निर्णय करा, अन्यथा..; शिंदेंच्या मंत्र्याचा भाजपला थेट इशारा.
आठवलेंच्या नाराजीतही प्रेम, सन्मान केला जाईल! दरेकरांनी दिली ग्वाही
आठवलेंच्या नाराजीतही प्रेम, सन्मान केला जाईल! दरेकरांनी दिली ग्वाही.
मुंबई पालिकेसाठी शिवसेना - भाजपच्या जागावाटपावर आज शिक्कामोर्तब
मुंबई पालिकेसाठी शिवसेना - भाजपच्या जागावाटपावर आज शिक्कामोर्तब.
मनसे-उबाठा युतीतील जागावाटपावर उदय सामंत यांचे भाकीत
मनसे-उबाठा युतीतील जागावाटपावर उदय सामंत यांचे भाकीत.
शिंदे साहेब जी जबाबदारी देतील, ती...; बांगर यांनी स्पष्ट केली भूमिका
शिंदे साहेब जी जबाबदारी देतील, ती...; बांगर यांनी स्पष्ट केली भूमिका.
नाशिकमध्ये भाजपविरोधात शिंदे शिवसेना, दादांची राष्ट्रवादी एकत्र?
नाशिकमध्ये भाजपविरोधात शिंदे शिवसेना, दादांची राष्ट्रवादी एकत्र?.
त्याला मुंबई कधी उपाशी ठेवत नाही; शरद पवारांचं मोठं वक्तव्य
त्याला मुंबई कधी उपाशी ठेवत नाही; शरद पवारांचं मोठं वक्तव्य.
कल्याण-डोंबिवलीत जागावाटपावरून महायुतीत तणाव; तातडीची बैठक
कल्याण-डोंबिवलीत जागावाटपावरून महायुतीत तणाव; तातडीची बैठक.
बारामतीकरांनी बरेच चिमटे काढले; अजितदादांचा मंचावरून उपरोधिक टोला
बारामतीकरांनी बरेच चिमटे काढले; अजितदादांचा मंचावरून उपरोधिक टोला.