AQI
Sign In

By signing in or creating an account, you agree with Associated Broadcasting Company's Terms & Conditions and Privacy Policy.

MUM vs ODI : श्रेयस-सिद्धेशचा धमाका, पहिला दिवस मुंबईचा, ओडीशाविरुद्ध 382 धावा

Ranji Trophy Mumbai vs Odisha 1st Day Stumps Highlights : मुंबईच्या फलंजाजांनी पहिला दिवस आपल्या नावावर केला आहे. मुंबईसाठी श्रेयस अय्यर आणि सिद्धेश लाड या दोघांनी चौथ्या विकेटसाठी 250 पेक्षा अधिक धावांची नाबाद भागीदारी केली. त्यामुळे मुंबईने पहिल्या दिवशी 3 बाद 382 धावांपर्यंत मजल मारली आहे.

MUM vs ODI : श्रेयस-सिद्धेशचा धमाका, पहिला दिवस मुंबईचा, ओडीशाविरुद्ध 382 धावा
shreyas iyer and siddhesh lad
| Updated on: Nov 06, 2024 | 6:00 PM
Share

रणजी ट्रॉफी 2024-2025 स्पर्धेत मुंबई विरुद्ध ओडीशा यांच्या सामन्यातील पहिल्या दिवसाचा खेळ संपला आहे. या सामन्याचं आयोजन हे मुंबईतीली बीकेसीतील शरद पवार क्रिकेट अकादमीत करण्यात आलं आहे. सामन्यातील पहिला दिवस मुंबईच्या नावावर राहिला. मुंबईने 90 ओव्हरमध्ये 3 विकेट्स गमावून 382 धावा केल्या. श्रेयस अय्यर आणि सिद्धेश लाड या दोघांनी केलेल्या नाबाद शतकी खेळीच्या जोरावर मुंबईला पहिल्याच दिवशी 380 पार पोहचता आलं. श्रेयस अय्यर आणि सिद्धेश लाड या दोघांनी सर्वाधिक नाबाद धावा केल्या. तर अंगीकृष रघुवंशी आणि आयुष म्हात्रे या दोघांनीही योगदान दिलं. मात्र कॅप्टन अजिंक्य रहाणे अपयशी ठरला. रहाणेला ओडीशाविरुद्ध भोपळाही फोडता आला नाही. पहिल्या दिवसाचा खेळ संपला तेव्हा श्रेयस अय्यर याने सिद्धेश लाड ही जोडी नाबाद परतली.

पहिल्या दिवसाचा खेळ

ओडीशाने टॉस जिंकून मुंबईला बॅटिंगसाठी भाग पाडलं. मुंबईच्या सलामी जोडीला चांगली सुरुवात करता आली नाही. ओडीशाच्या सूर्यकांत प्रधान याने मुंबईला पहिला झटका दिला. सूर्यकांतने आयुष म्हात्रे याला 18 धावांवर एलबीडब्ल्यू आऊट केलं. त्यानंतर अंगीकृष रघुवंशी आणि सिद्धेष लाड या दोघांनी दुसर्‍या विकेटसाठी 135 रन्सची पार्टनरशीप केली. मात्र त्यानंतर बिप्लब सामंतरे याने ही जोडी फोडली. बिप्लब याने अंगीकृषला आऊट केलं. अंगीकृष नर्व्हस नाईंटीचा शिकार ठरला. अंगीकृषने 124 बॉलमध्ये 13 फोर आणि 3 सिक्सच्या मदतीने 92 रन्स केल्या. अंगीकृष आऊट झाल्यानंतर दुसर्‍याच बॉलवर मुंबईला मोठा झटका लागला. कॅप्टन अंजिक्य रहाणे पहिल्याच बॉलवर एलबीडब्ल्यू आऊट झाला.

सलग 2 विकेट्स गमावल्याने मुंबईची 3 बाद 154 अशी स्थिती झाली होती. मात्र त्यानंतर सिद्धेश लाड आणि श्रेयस अय्यर या दोघांनी मुंबईचा डाव सावरत मोठी भागीदारी रचली. हे दोघेही दिवसाचा खेळ संपेपर्यंत नाबाद राहिले. दोघांनी चौथ्या विकेटसाठी 231 धावांची नाबाद भागीदारी केली आहे. श्रेयस अय्यरने 164 बॉलमध्ये 4 सिक्स आणि 18 फोरच्या मदतीने नॉट आऊट 152 रन्स केल्या आहेत. तर सिद्धेश लाड हा 234 चेंडूत 14 चौकारांसह 116 धावांवर नाबाद आहे.

मुंबई प्लेइंग इलेव्हन : अजिंक्य रहाणे (कर्णधार), अंगकृष रघुवंशी, आयुष म्हात्रे, श्रेयस अय्यर, हार्दिक तामोरे (विकेटकीपर), सिद्धेश लाड, सूर्यांश शेडगे, शार्दुल ठाकुर, हिमांशू वीर सिंग, शम्स मुलानी आणि रॉयस्टन डायस.

ओडिशा प्लेइंग इलेव्हन : गोविंदा पोद्दार (कॅप्टन), अनुराग सारंगी, स्वस्तिक सामल, संदीप पट्टनायक, बिप्लब सामंतरे, कार्तिक बिस्वाल, आसीरवाद स्वेन (विकेटकीपर), देबब्रत प्रधान, सूर्यकांत प्रधान, हर्षित राठोड आणि सुनील राऊल.

समाज घडवण्यात गुरू तेग बहादुर यांचे मोलाचे योगदान - फडणवीस
समाज घडवण्यात गुरू तेग बहादुर यांचे मोलाचे योगदान - फडणवीस.
शिंदे सेना गद्दारांची टोळी, आणि ही टोळी भाजप चालवते
शिंदे सेना गद्दारांची टोळी, आणि ही टोळी भाजप चालवते.
विरुद्ध दिशेनं गाडी की घातली? जाब विचारणाऱ्या वाहतूक पोलिसाला मारहाण!
विरुद्ध दिशेनं गाडी की घातली? जाब विचारणाऱ्या वाहतूक पोलिसाला मारहाण!.
पवारांवर टीका करताना शिवतारेंची जीभ घसरली
पवारांवर टीका करताना शिवतारेंची जीभ घसरली.
केंद्र सरकारकडून 2026 च्या पद्म पुरस्कारांची घोषणा
केंद्र सरकारकडून 2026 च्या पद्म पुरस्कारांची घोषणा.
कराडमध्ये ड्रग्जप्रकरणी डीआरआयची मोठी कारवाई
कराडमध्ये ड्रग्जप्रकरणी डीआरआयची मोठी कारवाई.
पद्म पुरस्कारांची घोषणा! रघुवीर खेडकर, श्रीरंग लाड यांचा होणार गौरव
पद्म पुरस्कारांची घोषणा! रघुवीर खेडकर, श्रीरंग लाड यांचा होणार गौरव.
बिहार भवनाला विरोध, हा राऊतांचा दुटप्पीपणा; नवनाथ बन यांची टीका
बिहार भवनाला विरोध, हा राऊतांचा दुटप्पीपणा; नवनाथ बन यांची टीका.
मुख्यमंत्री फडणवीस नांदेडमध्ये श्री गुरुग्रंथ साहिबांच्या दर्शनाला
मुख्यमंत्री फडणवीस नांदेडमध्ये श्री गुरुग्रंथ साहिबांच्या दर्शनाला.
हिरव्या आणि भगव्या रंगाचा वाद पेटला, अंधारे आणि बन यांच्यात जुंपली
हिरव्या आणि भगव्या रंगाचा वाद पेटला, अंधारे आणि बन यांच्यात जुंपली.