Cricket : अखेरच्या क्षणी सामन्याच्या ठिकाणात बदल, सूर्या-हार्दिक इथे खेळणार, बीसीसीआयचा निर्णय!

Suryakumar Yadav And Shivam Dube : संघात शिवम दुबे आणि सूर्यकुमार यादव या दोघांचं कमबॅक होताच बीसीसीआयने मोठा निर्णय घेतला आहे. जाणून घ्या

Cricket : अखेरच्या क्षणी सामन्याच्या ठिकाणात बदल, सूर्या-हार्दिक इथे खेळणार, बीसीसीआयचा निर्णय!
shivam dube and suryakumar yadavImage Credit source: AFP
Follow us
| Updated on: Feb 05, 2025 | 8:40 AM

इंग्लंडला पराभूत करत टीम इंडियाने सूर्यकुमार यादव याच्या नेतृत्वात टी 20i मालिकेतील विजयी घोडदौड कायम राखली. टीम इंडियाने 5 सामन्यांची मालिका 4-1 ने जिंकली. सूर्यकुमार यादवला या मालिकेत फलंदाज म्हणून काही खास करता आलं नाही. मात्र सूर्याने कर्णधार म्हणून आपला धमाका कायम राखण्यात यश मिळवलं. तर दुसऱ्या बाजूला शिवम दुबे याने बॅटिंगसह बॉलिंगनेही धमाकेदार कामिगरी करत टीम इंडियाला विजय मिळवून देण्यात निर्णायक भूमिका बजावली. टीम इंडियाचे हे दोघेही खेळाडू आता रणजी ट्रॉफीत मुंबईसाठी खेळणार आहे. मुंबई क्रिकेट टीम रणजी ट्रॉफी स्पर्धेतील उपांत्यपूर्व फेरीत हरयाणाविरुद्ध भिडणार आहेत. मुंबई टीममध्ये या दोघांना संधी देण्यात आली आहे.

मुंबई विरुद्ध हरयाणा यांच्यातील उपांत्य पूर्व फेरीतील सामना हा 8 ते 12 फेब्रुवारी दरम्यान आयोजित करण्यात आला आहे. हा सामना चौधरी बन्सी लाल क्रिकेट स्टेडियम येथे होणार असल्याची माहिती मुंबई क्रिकेट असोसिएशनकडून देण्यात आली. मात्र त्यानंतर आता मोठी अपडेट समोर आली आहे. या सामन्याला अवघे काही तास बाकी आहेत. अशात या सामन्याचं ठिकाण बदलण्यात आल्याचं म्हटलं जात आहे. मात्र बीसीसीआयने या मागचं कारण काय? हे सांगितलेलं नाही.

लाहलीमध्ये आयोजित सामना हा आता ठिकाण बदलल्यानंतर कोलकाता येथे होणार असल्याची माहिती मिळत आहे. बीसीसीआय डेव्हलपमेंट मॅनेजर अबय कुरुविला यांनी याबाबतची माहिती मुंबई क्रिकेट असोसिएशन आणि हरयाणा क्रिकेट असोसिएशनला दिली आहे.

सामन्याचं ठिकाण बदलण्याचं कारण काय?

एमसीए अधिकाऱ्यांनुसार क्वार्टर फायनल मॅचचं ठिकाण बदलण्यात आल्याची माहिती त्यांना मेलद्वारे मिळाली.अपरिहार्य कारणामुळे सामन्याचं ठिकाण बदलण्याचं आल्याचं म्हटलं आहे. आता हा सामना ईडन गार्डमध्ये होणार आहे. बंगाल क्रिकेट असोसिएशनकडून या सामन्याचं आयोजन करण्यात येणार आहे.

रणजी ट्रॉफी क्वार्टर फायनलसाठी मुंबई टीम : अजिंक्य रहाणे (कर्णधार), आयुष म्हात्रे, अंगकृष रघुवंशी, अमोघ भटकळ, सूर्यकुमार यादव, सिद्धेश लाड, शिवम दुबे, आकाश आनंद, हार्दिक तामोरे, सूर्यांश शेडगे, शार्दूल ठाकुर, शम्स मुलानी, तनुष कोटीयन, मोहित अवस्थी, सिल्वेस्टर डिसूजा, रॉस्टन डायास, अथर्व अंकोलेकर आणि हर्ष तन्ना.

'राहुल सोलापूरकरचं तोंड फोडणाऱ्याला 1 लाख', कोणी जाहीर केलं बक्षीस?
'राहुल सोलापूरकरचं तोंड फोडणाऱ्याला 1 लाख', कोणी जाहीर केलं बक्षीस?.
'शब्द मागे घे, नाहीतर ...', आव्हाड भडकले अन् सोलापूरकरची काढली लायकी
'शब्द मागे घे, नाहीतर ...', आव्हाड भडकले अन् सोलापूरकरची काढली लायकी.
‘वेदांनुसार डॉ. भीमराव आंबेडकर हे...’, राहुल सोलापूरकर पुन्हा बरळला
‘वेदांनुसार डॉ. भीमराव आंबेडकर हे...’, राहुल सोलापूरकर पुन्हा बरळला.
'राऊतांनी ठाकरेंचा पत्ता राजकारणातून कट...', निलेश राणेंची टीका
'राऊतांनी ठाकरेंचा पत्ता राजकारणातून कट...', निलेश राणेंची टीका.
'ऑपरेशन टायगर... 100% कोकण खाली..', शिवसेनेच्या बड्या मंत्र्यांचा दावा
'ऑपरेशन टायगर... 100% कोकण खाली..', शिवसेनेच्या बड्या मंत्र्यांचा दावा.
'मला तुम्ही फार आवडता', आशा भोसलेंकडून शिंदेंना वाढदिवसाच्या शुभेच्छा
'मला तुम्ही फार आवडता', आशा भोसलेंकडून शिंदेंना वाढदिवसाच्या शुभेच्छा.
माझ्या वडिलांना 3 तासात संपवलं, मग..., बापाच्या न्यायासाठी लेकीची तळमळ
माझ्या वडिलांना 3 तासात संपवलं, मग..., बापाच्या न्यायासाठी लेकीची तळमळ.
हॉस्टेलवर मागवला पिझ्झा अन् 'त्या' चौघीना महिनाभर वसतिगृहात नो एन्ट्री
हॉस्टेलवर मागवला पिझ्झा अन् 'त्या' चौघीना महिनाभर वसतिगृहात नो एन्ट्री.
शिंदेंचा राजन साळवींना फोन, 'या' तारखेला पक्षप्रवेश करण्याचे आदेश?
शिंदेंचा राजन साळवींना फोन, 'या' तारखेला पक्षप्रवेश करण्याचे आदेश?.
'... तर देशमुख प्रकरणात मुंडेंना कोण अडकवणार?', धस स्पष्टच म्हणाले...
'... तर देशमुख प्रकरणात मुंडेंना कोण अडकवणार?', धस स्पष्टच म्हणाले....