Video : फिल सॉल्टने मिचेल स्टार्कला झोडला, आयपीएलच्या पर्वात आरसीबीने रचला विक्रम
आयपीएल 2025 स्पर्धेतील 24वा सामना रॉयल चॅलेंजर्स बंगळुरु आणि दिल्ली कॅपिटल्स यांच्यात होत आहे. या सामन्यात बंगळुरूने प्रथम फलंदाजी करताना 20 षटकात 7 गडी गमवून 163 धावा केल्या आणि विजयासाठी 164 धावांचं आव्हान दिलं. फिल सॉल्टने सुरुवात जबरदस्त करून दिली.

आयपीएल 2025 स्पर्धेत दिल्ली विरूद्धच्या सामन्यात नाणेफेकीचा कौल गमवल्याने रॉयल चॅलेंजर्स बंगळुरु संघाला प्रथम फलंदाजीला यावं लागलं. मोठ्या धावसंख्येचं लक्ष्य ठेवावं लागणार हे आरसीबीच्या फलंदाजांना चांगल्या पद्धतीने माहिती होतं. त्यात खेळपट्टी कशी काय साथ देईल सांगत येत नाही. ही सर्व गणितं डोक्यात ठेवून विराट कोहली आणि फिल सॉल्ट ही जोडी मैदानात उतरली होती. रॉयल चॅलेंजर्स बंगळुरुसाठी फिल सॉल्टने सुरुवात केली. पहिल्या षटकं टाकण्यासाठी मिचेल स्टार्क आला होता. पहिल्या षटकात फिल सॉल्टला फार काही करता आलं नाही. वाइट चेंडूवर चौकार आला आणि दोन धावा धावून काढल्या अशा सात धाव केल्या. दुसरं षटक टाकण्यासाठी अक्षर पटेल आला आणि विराट-सॉल्टने आक्रमक फलंदाजी केली. अक्षर पटेलच्या एका षटकात 16 धावा आल्या. त्यानंतर तिसरं षटक टाकण्यासाठी अक्षर पटेल आला. यावेळी फिल सॉल्टने आक्रमक रूप धारण केलं होतं.
मिचेल स्टार्क टाकत असलेल्या तिसऱ्या षटकाच्या पहिल्याच चेंडूवर सॉल्टने षटकार ठोकला. त्यानंतरच्या तीन चेंडूवर तीन चौकार मारले. त्यात चौथा चेंडू नो बॉल असल्याने फिल सॉल्टला आयता डाव साधण्याची संधी मिळाली. मग काय चौथा चेंडू पुन्हा टाकला आणि थेट सीमेपार षटकारासाठी मारला. त्यानंतर पाचव्या चेंडूवर एक धाव घेतली आणि विराट कोहलीला स्ट्राईक केली. आधीच आक्रमक खेळीचं व्यासपीठ तयार झालं होतं. ही संधी विराट कोहलीने साधली आणि त्याच्या शेवटच्या चेंडूवर चौकार मारला. मिचेल स्टार्कच्या एका षटकात एकूण 30 धावा आल्या. यामुळे आरसीबीने तीन षटकातच 50 धावांचा पल्ला ओलांडला होता. या पर्वात आरसीबी संघ सर्वात जलद 50 धावा करणारा संघ ठरला आहे. आयपीएलमधील हे आरसीबीचे दुसऱ्या सर्वात जलद संघ 50 धावा आहेत. यासाठी 3 षटकं घेतली. यापूर्वी 2011 मध्ये याच ठिकाणी कोची टस्कर्स केरळविरुद्ध 2.3षटकांत त्यांनी 50 धावा केल्या होत्या.
Bengaluru went berserk 🥳
As did Phil Salt 💪#RCBvDC got off to a breathtaking start 👏
Updates ▶ https://t.co/h5Vb7sp2Z6#TATAIPL | @RCBTweets pic.twitter.com/MGLspyg0B8
— IndianPremierLeague (@IPL) April 10, 2025
दोन्ही संघांची प्लेइंग 11
रॉयल चॅलेंजर्स बंगळुरू (प्लेइंग इलेव्हन): फिलिप सॉल्ट, विराट कोहली, देवदत्त पडिक्कल, रजत पाटीदार (कर्णधार), लियाम लिव्हिंगस्टोन, जितेश शर्मा (विकेटकीपर), टिम डेव्हिड, कृणाल पंड्या, भुवनेश्वर कुमार, जोश हेजलवुड, यश दयाल.
दिल्ली कॅपिटल्स (प्लेइंग इलेव्हन): फाफ डू प्लेसिस, जेक फ्रेझर-मॅकगर्क, केएल राहुल (विकेटकीपर), ट्रिस्टन स्टब्स, अक्षर पटेल (कर्णधार), आशुतोष शर्मा, विप्रज निगम, मिचेल स्टार्क, मोहित शर्मा, कुलदीप यादव, मुकेश कुमार.
