AQI
Sign In

By signing in or creating an account, you agree with Associated Broadcasting Company's Terms & Conditions and Privacy Policy.

Rishabh Pant Accident: रस्त्यावर वेदनेने विव्हळत होता ऋषभ, लोक VIDEO बनवत होते, गाडीत किती लाख होते?

Rishabh Pant Accident: लोक पैसे गोळा करुन व्हिडिओ बनवत होते, मदतीसाठी पुढे आलेले ते दोघे कोण?

Rishabh Pant Accident: रस्त्यावर वेदनेने विव्हळत होता ऋषभ, लोक VIDEO बनवत होते, गाडीत किती लाख होते?
कार पलटली, खांब तोडले, पेटही घेतला, त्यानंतर ऋषभ पंतने काय केलं?Image Credit source: tv9 marathi
| Updated on: Dec 30, 2022 | 1:21 PM
Share

डेहराडून: क्रिकेटर ऋषभ पंतच्या गाडीचा शुक्रवारी सकाळी रुडकी नारसन येथे भीषण अपघात झाला. ऋषभच्या कारचा चक्काचूर झाला, त्यावरुन या अपघाताची भीषणता लक्षात येते. ऋषभ कारमधून बाहेर पडण्याचा प्रयत्न करत होता. पण अपघातात मार लागल्याने त्याला कार बाहेर येणं जमत नव्हतं. पण तो कसाबसा कारमधून बाहेर पडला.

ऋषभच्या गाडीत किती लाख होते?

अपघाताच्यावेळी ऋषभच्या गाडीमध्ये 3 ते 4 लाख रुपये होते. अपघातानंतर हे सर्व पैसे रस्त्यावर पडले होते. ऋषभ रस्त्यात वेदनेने विव्हळत होता. यावेळी लोक ऋषभची मदत करण्याऐवजी रस्त्यावर पडलेले पैसे गोळा करुन व्हिडिओ बनवण्यात मुश्गूल होते. अमर उजाला वेबसाइटने हे वृत्त दिलय.

मदतीसाठी धावून आलेले ते दोन युवक कोण?

अपघातानंतर ऋषभच्या कार जवळ जमलेल्यांना माणुसकी धर्माचा विसर पडला होता. पण दोन युवकांमध्ये माणूसकी शिल्लक होती. ते देवदूत बनून ऋषभच्य मदतीला धावून गेले. ऋषभला रुडकीच्या सक्षम रुग्णालयात दाखल केलं. त्यावेळी दोन युवक त्याच्यासोबत होते. या दोघांपैकी एक युवक पुरकाजी जवळच्या शकरपुर गावचा रहिवासी आहे. घटनास्थळापासून काही किलोमीटर अंतरावर असलेल्या लिब्बरहेरी येथील उत्तम शुगर मिलमध्ये तो नोकरी करतो.

रुग्णालयात ऋषभसोबत कोण होतं?

हा युवक सकाळी ड्युटीवर चालला होता. या दरम्यान त्याने ऋषभला ओळखलं. डॉ. सुशील नागर यांनी सांगितलं की, ऋषभला हॉस्पिटलमध्ये आणलं, त्यावेळी दोन युवक त्याच्यासोबत होते. त्यांनी योग्यवेळी ऋषभला रुग्णालयात दाखल केलं. ऋषभवर सर्जरी होणार का?

ऋषभला हॉस्पिटलमध्ये आणलं, त्यावेळी त्याची हालत गंभीर होती. पण वेळेबरोबर त्याच्या प्रकृतीत सुधारणा झाली, असं डॉ. सुशील नागर यांनी सांगितलं. ऋषभला मॅक्स हॉस्पिटलमध्ये दाखल केलय. तिथे त्याच्यावर प्लास्टिक सर्जरी होऊ शकते.

अजित पवार कुठं स्वतंत्र लढणार? फडणवीसांसोबतच्या तासभर बैठकीत काय ठरल?
अजित पवार कुठं स्वतंत्र लढणार? फडणवीसांसोबतच्या तासभर बैठकीत काय ठरल?.
काँग्रेसचा 'मविआ'ला जबर धक्का, BMC निवडणुकीच्या तोंडावर मोठी घोषणा
काँग्रेसचा 'मविआ'ला जबर धक्का, BMC निवडणुकीच्या तोंडावर मोठी घोषणा.
राऊत पुन्हा शिवतीर्थवर, राज ठाकरेंसह युती, जागावाटप नेमकी कशावर चर्चा?
राऊत पुन्हा शिवतीर्थवर, राज ठाकरेंसह युती, जागावाटप नेमकी कशावर चर्चा?.
300 GB डेटा अन् 95 हजार फोटो... Epstein वरून पृथ्वीराज चव्हाणांचा दावा
300 GB डेटा अन् 95 हजार फोटो... Epstein वरून पृथ्वीराज चव्हाणांचा दावा.
कुठं बोगस मतदार, कुठं पैशांचं वाटप तर..; अंबरनाथमध्ये मतदानाला गालबोट
कुठं बोगस मतदार, कुठं पैशांचं वाटप तर..; अंबरनाथमध्ये मतदानाला गालबोट.
निवडणूक आयोग नालायक... विजय वडेट्टीवार यांची तीव्र शब्दांत टीका
निवडणूक आयोग नालायक... विजय वडेट्टीवार यांची तीव्र शब्दांत टीका.
BJP पदाधिकाऱ्याचं अजब कांड, मतदारांना पैशांचे आमिष दाखवलं अन् कोंडून..
BJP पदाधिकाऱ्याचं अजब कांड, मतदारांना पैशांचे आमिष दाखवलं अन् कोंडून...
मोदी ऑन बोर्ड E-Mail चा उल्लेख अन्...पृथ्वीराज चव्हाणांचा सनसनाटी दावा
मोदी ऑन बोर्ड E-Mail चा उल्लेख अन्...पृथ्वीराज चव्हाणांचा सनसनाटी दावा.
मराठी अन् मुस्लिम मतदारांच्या ध्रुवीकरणासाठी ठाकरे बंधूंची रणनिती ठरली
मराठी अन् मुस्लिम मतदारांच्या ध्रुवीकरणासाठी ठाकरे बंधूंची रणनिती ठरली.
मोदी आणि एपस्टीनचं काय नातं? एपस्टीन प्रकरणावरून चव्हाणांचा थेट सवाल
मोदी आणि एपस्टीनचं काय नातं? एपस्टीन प्रकरणावरून चव्हाणांचा थेट सवाल.